Categories
शाखा वार्ता

नागपुरात स्मशान सहल…

जुलै - २०१८

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अंतर्गत असलेल्या शाखा उत्तर नागपूरच्या वतीने ‘शोध भुताचा बोध मनाचा’ वर्ष तिसर्‍या स्मशान सहलीचे अमावस्येच्या रात्री मंगळवार, दि. 15 मे रोजी सायंकाळी 08:30 ते 12:30 पर्यंत वैशाली नगर स्मशानभूमी, नागपूर येथे कार्यक्रम संपन्न झाला. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याच्या उद्देशाने स्मशान सहलीचे आयोजन महा.अंनिस शाखा अध्यक्ष रामभाऊ डोंगरे यांनी केले होते. पथनाट्य ‘अंधश्रध्दा एक बिमारी’ व चळवळीच्या गीतांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे प्रबोधन करण्यात आले. चमत्कार सादरीकरण रामभाऊ डोंगरे आणि मंजुश्री फोपरे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगजितसिंग, प्रमुख पाहुणे सिध्दार्थ गायकवाड, उपायुक्त समाजकल्याण, राज्य सरचिटणीस संजय शेंडे महा. महा. अंनिसचे सर्व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक चित्तरंजन चवरे, तर आभार प्रदर्शन नरेश महाजन, संविधान प्रास्ताविका वाचन पुष्पा बोंदाडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शिवकुमार फुले, दीपक गजभिये, दिलीप जांभुलकर, नारायण भावे, आकाश नंदेश्वर, धनराज चौधरी, आनंद गजभिये, उषा भिवगडे, गिरिजा तांबे, अविनाश डोंगरे, चरणदास गजभिये, कुंदन मेश्राम, पी. टी. वासनिक, आनंद मेश्राम, तृप्ती आटे, प्रणिता तुपे, भाग्यश्री तुपे, नेहा आटे, रॉकी घुटके, अर्चना मेश्राम, सुनीता धवले, आय. ए. पाटील यांनी प्रयत्न केले.