डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या शहिदत्वाला ऑगस्ट 2019 ला सहा वर्षे पूर्ण झाली. आजही खटला चालूच आहे. खुन्यांना शिक्षा नाही, तपास यंत्रणा सूत्रधाराला पकडण्यात अपयशी ठरलेल्या आहेत. तपासात काहीच प्रगती होत नाही, याबद्दल न्यायालय तपास यंत्रणांना तीव्र शब्दांत जाब विचारत आहे. पण ‘तपास चालू आहे,’ हे सांगण्यापलिकडे तपास यंत्रणांकडून काहीच होताना दिसत नाही. सरकारी पातळीवर तर तपास […]
लेखक: arc_admin
माझी छायाचित्रे दिवाणखान्यात लावण्यासाठी शोभेची नाहीत. काही ठिकाणी मला म्हणतात, ‘हीच चित्रे का दाखवतो?’ पण मी म्हणतो, ‘मी यांचाच प्रतिनिधी आहे, तुम्हाला मान्य करायचे असेल तर करा.’ पण त्यांना ते मान्य करावेच लागते. कारण समोरचे फोटो सत्यच सांगत असतात. माझी छायाचित्रे सांगत असतात, ‘तुम्ही आमच्या संघर्षात सामील व्हा, आमच्या या न्यायाच्या आणि सन्मानाच्या शोधयात्रेत सामील […]
कला ही समाजाला संवेदनशील बनविते, हे सर्वज्ञात आहे. कलेमध्ये माणसाला मुक्ती मिळवून देण्याचे सामर्थ्य आहे, असे मानले जाते. ती त्याला या लौकिक जगापलिकडे घेऊन जाते. समाजात प्रेम, शांती आणि समतेचे वातावरण निर्माण करण्यात कलेचे योगदान आहे आणि पूर्वीही राहिले आहे. उदाहरणार्थ – भक्तिपंथीय अनेक महान संतकवींनी समाजात आपला प्रेमाचा संदेश पोचविण्यासाठी काव्य आणि संगीताचा उपयोग […]
आदिसांख्य, लोकायत, बुद्ध, बाबासाहेब, हिर्रोक्विटस, प्रोटॅगोरस असे हजारो प्रज्ञावंत इहवादी आहेत. मी या जागतिक तत्त्वज्ञानाच्या परंपरेत उभा असलेला साहित्यिक आहे. अध्यात्म आणि विज्ञान, धर्मविरुद्ध विज्ञान, ईश्वर विरुद्ध विज्ञान, परलोक विरुद्ध इहलोक, विषमता विरुद्ध समता आणि मनू विरुद्ध संविधान असाच तो झगडा आहे. आंबेडकरवादी साहित्यात विज्ञान, इहलोक, समता, संविधान या छावणीतले साहित्य आहे. ज्येष्ठ व विचारवंत […]
माझ्यासारख्या बहुजन समाजातील लेखकाचा प्रवास समाजाकडून व्यक्तीकडे होतो, तर अभिजन वर्गातील लेखकाचा प्रवास व्यक्तीकडून समाजाकडे होतो. बहुजन लेखक आणि अभिजन लेखक यातील हा परस्परविरोधी प्रवास आहे. साहजिकच माझ्या लेखनात अभिजन लेखकासारखे मनोविश्लेषणात्मक, स्त्री–पुरुष संबंध हे विषय न येता सामाजिक समस्या, दु:ख, कामगार कुटुंबातले ताणेबाणे यांचे चित्रण असे. 1975 नंतरच्या काळातील मराठी साहित्य-नाट्य विश्वाला जयंत पवार […]
मानवता आणि विवेकवाद या ध्येयांसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रखर संघर्ष करीत आहे. ज्या विवेकवादाचा आपण अंगीकार केला आहे, त्याची ध्वजा ज्या समाजसुधारकांनी महाराष्ट्रात उंच फडकवीत ठेवली, त्यात गोपाळ गणेश आगरकर यांचे नाव प्राधान्याने घ्यायला हवे. आगरकरांच्या निर्वाणाला 125 वर्षे पुरी होत आहेत. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतीला महाराष्ट्र अंनिस कृतज्ञतापूर्वक अभिवादन करीत आहे. आगरकरांच्या कार्याचे स्मरण […]
महात्मा गांधींचा वारसा
आपल्या देशातील स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींचे कर्तृत्व वादातीत आहे म्हणून त्यांना आपण राष्ट्रपिता म्हणतो; परंतु केवळ स्वातंत्र्य लढ्यातील नेतृत्व इतकेच त्यांचे कर्तृत्व नाही, तर त्यांनी नेतृत्व करताना मांडलेले मानवजातीच्या भल्याचे विचार आणि व्यक्तिगत जीवनातील साधेपणाचा आदर्श हे त्यांचे कर्तृत्व आहे. त्यांच्या विचाराने त्यांनी जगभरातील अल्बर्ट आइन्स्टाइन, नेल्सन मंडेला यांसारख्या महान व्यक्तींना; तसेच अनेक लेखकांना, विचारवंतांना प्रभावित […]
तत्कालीन लेखकांना जे विषय साहित्यनिर्मितीसाठी वर्ज्य होते, ते अण्णा भाऊंच्या साहित्याचे मुख्य विषय बनले. गरिबी, शोषण, आर्थिक विषमता, वेश्या व्यवसाय, झोपडपट्टीतील जीवन, कामगारांचे जीवन, निरक्षरता, जातिभेद आणि ताणतणाव हे त्यांच्या लेखनातील कळीचे मुद्दे होते. अण्णा भाऊंनी हे विषय हाताळेपर्यंत यापैकी अनेक विषयांवर मराठी साहित्यात लेखन व्हायचे होते. अण्णा भाऊंच्या साहित्यात चित्रित झालेली पात्रेही सर्व स्तरातील […]
विवेकी जग शक्य आहे
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याचा विस्तार महाराष्ट्राच्या बहुतेक जिल्हा आणि तालुक्यात झालाच आहे. पण, महाराष्ट्राबाहेरील राज्यातही हा विचार पोहोचला आहे आणि आता याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली आहे. या वर्षीचा अमेरिकेतील मानाचा समजला जाणारा ’अविजित राय करेज अवॉर्ड’ आपल्या संघटनेला प्रदान करण्यात आला. तो स्विकारण्यासाठी अमेरिकेस गेलेल्या आपल्या कार्याध्यक्षांनी, त्यानिमित्ताने केलेल्या भाषणाचा स्वैर अनुवाद […]
स्त्री सन्मानाचा लढा : शबरीमला
10 ते 50 वयाच्या महिलांना मासिक पाळी येते, त्यामुळे त्या अपवित्र आहेत. शिवाय अय्यप्पा ब्रह्मचारी आहे; तेव्हा शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देता येणार नाही, असे महिला प्रवेशबंदीचे समर्थन करणार्या पुरोहितांना सुप्रीम कोर्टाने फटकारले आणि 2018 साली महिलांसाठी मंदिराचे दरवाजे खुले झाले. स्त्री–पुरुष विषमतेविरोधातली लढाई धर्मक्षेत्रातून न्यायक्षेत्रात आली आणि तिने राजकीय क्षेत्रही व्यापले. कोर्टाच्या या निर्णयानंतर […]