Categories
परिसंवाद

जनतेला जागृत करण्यासाठी कलाकारांनी कोषातून बाहेर पडावे! – सुधारक ओलवे

वार्षिकांक - २०१९

माझी छायाचित्रे दिवाणखान्यात लावण्यासाठी शोभेची नाहीत. काही ठिकाणी मला म्हणतात, ‘हीच चित्रे का दाखवतो?’ पण मी म्हणतो, ‘मी यांचाच प्रतिनिधी आहे, तुम्हाला मान्य करायचे असेल तर करा.’ पण त्यांना ते मान्य करावेच लागते. कारण समोरचे फोटो सत्यच सांगत असतात. माझी छायाचित्रे सांगत असतात, ‘तुम्ही आमच्या संघर्षात सामील व्हा, आमच्या या न्यायाच्या आणि सन्मानाच्या शोधयात्रेत सामील […]

Categories
परिसंवाद

कलाकारांचा मानवी मूल्यांवरील विश्वासच कलासंवेदना वाढवतो – शुभा मुदगल

वार्षिकांक - २०१९

कला ही समाजाला संवेदनशील बनविते, हे सर्वज्ञात आहे. कलेमध्ये माणसाला मुक्ती मिळवून देण्याचे सामर्थ्य आहे, असे मानले जाते. ती त्याला या लौकिक जगापलिकडे घेऊन जाते. समाजात प्रेम, शांती आणि समतेचे वातावरण निर्माण करण्यात कलेचे योगदान आहे आणि पूर्वीही राहिले आहे. उदाहरणार्थ – भक्तिपंथीय अनेक महान संतकवींनी समाजात आपला प्रेमाचा संदेश पोचविण्यासाठी काव्य आणि संगीताचा उपयोग […]

Categories
परिसंवाद

कला म्हणजे प्रज्ञानाचे प्रकाशन – डॉ. यशवंत मनोहर

वार्षिकांक - २०१९

आदिसांख्य, लोकायत, बुद्ध, बाबासाहेब, हिर्रोक्विटस, प्रोटॅगोरस असे हजारो प्रज्ञावंत इहवादी आहेत. मी या जागतिक तत्त्वज्ञानाच्या परंपरेत उभा असलेला साहित्यिक आहे. अध्यात्म आणि विज्ञान, धर्मविरुद्ध विज्ञान, ईश्वर विरुद्ध विज्ञान, परलोक विरुद्ध इहलोक, विषमता विरुद्ध समता आणि मनू विरुद्ध संविधान असाच तो झगडा आहे. आंबेडकरवादी साहित्यात विज्ञान, इहलोक, समता, संविधान या छावणीतले साहित्य आहे. ज्येष्ठ व विचारवंत […]

Categories
परिसंवाद

विद्रोह ही तात्कालिक अवस्था नसून, निरंतर चालणारी प्रक्रिया आहे! – जयंत पवार

वार्षिकांक - २०१९

माझ्यासारख्या बहुजन समाजातील लेखकाचा प्रवास समाजाकडून व्यक्तीकडे होतो, तर अभिजन वर्गातील लेखकाचा प्रवास व्यक्तीकडून समाजाकडे होतो. बहुजन लेखक आणि अभिजन लेखक यातील हा परस्परविरोधी प्रवास आहे. साहजिकच माझ्या लेखनात अभिजन लेखकासारखे मनोविश्लेषणात्मक, स्त्री–पुरुष संबंध हे विषय न येता सामाजिक समस्या, दु:ख, कामगार कुटुंबातले ताणेबाणे यांचे चित्रण असे. 1975 नंतरच्या काळातील मराठी साहित्य-नाट्य विश्वाला जयंत पवार […]

Categories
परिसंवाद

धार्मिक दहशतवाद व असहिष्णुता

वार्षिकांक - २०१८

सध्या देशातील वातावरण अतिशय चिंताजनक आहे. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि इतर विचारवंतांच्या खुनासाठी पकडले गेलेले आरोपी हे कट्टर हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित असल्याचे आढळून आले आहे. ‘आमच्या धर्माविरोधी बोललात, तर तुम्हाला संपवून टाकू,’ ही प्रवृत्ती अत्यंत घातक व संविधानविरोधी आहे. आमच्या विचारांच्या विरोधात बोललात, तर तुम्ही देशद्रोही’ सत्ताधारी मंत्री व अनेक नेत्यांची बेताल वक्तव्ये, झुंडशाहीने […]

Categories
परिसंवाद

धार्मिक दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी समविचारी लोकांनी एकत्र येऊन सामायिक कृती आराखडा तयार करावा.

वार्षिकांक - २०१८

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती आणि भारतीय संविधानाचे समर्थक समस्त समविचारींच्या सहभागाने आजच्या या धार्मिक दहशतवाद व असहिष्णुताविरोधी राज्यस्तरावरील संकल्प परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित असणारे स्वामी अग्निवेशजी आणि उपस्थित सर्व मान्यवर वक्ते व अंनिसचे; तसेच सर्व समविचारी संघटनांचे कार्यकर्ते यांचे मी आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो. ‘धार्मिक दहशतवाद व असहिष्णुताविरोधी संकल्प परिषद’ अशा विषयाला घेऊन पुण्यामध्ये संकल्प […]

Categories
परिसंवाद

‘धर्मचिकित्सेसाठी शास्त्रार्थ’ हीच आपली परंपरा; ती संपवण्याचा धर्मांधाचा डाव!

वार्षिकांक - २०१८

आपण सर्व पृथ्वीवर राहणारे मानव एका कुटुंबाप्रमाणे राहू या, वसुधैव कुटुंबकम्च्या भावनेने ओथंबून जाऊ या, सर्व मिळून वाटचाल करू या, मिळून बोलू या, मिळून मनांना एक बनवू या, मिळून सर्व निर्णय घेऊ या मिळून पृथ्वीच्या सुखाला, सौंदर्याला वाटून घेऊन त्याचा उपभोग घेऊ या या मूल्यांसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करून, विश्वमानवतावादाचे एक अनन्य पुजारी, जातीयता, […]

Categories
परिसंवाद

असहिष्णुतेविरोधात लढण्यासाठी संविधान हे सर्वांत धारदार हत्यार आहे.

वार्षिकांक - २०१८

“मित्रहो, प्रत्येक वक्त्याला वेळ कमी असल्यामुळे भाषणाच्या अगोदर जो दळणाचा कार्यक्रम असतो, तो मी क्रॉस केला. डायरेक्ट बोलूया भाषण आता. आपण ज्या गंभीर विषयावर चर्चा करीत आहोत, ‘असहिष्णुता : आव्हान व उपाय.’ मी दोन टप्प्यात हा विषय मांडणार आहे. कारण जो समाज, जो देश जातीय विषमतेवर उभा असतो, स्त्री – पुरुष भेदाभेदावर उभा असतो, धर्मा-धर्मातील […]

Categories
परिसंवाद

गेल्या चार वर्षांत असहिष्णुतेला राजमान्यता मिळाल्याने धार्मिक दहशतवाद आणि असहिष्णुतेचे संकट प्रत्येक दारात पोचले आहे.

वार्षिकांक - २०१८

धार्मिक दहशतवाद आणि असहिष्णुतेविरोधी ही परिषद संपल्यावर आपण आपापल्या गावी जाणार आहात. कार्यकर्ते म्हणून जेथे आपणास आत्मविश्वास मिळाला आहे, तो घेऊन आपणास आपल्या ठिकाणी मोठं काम सुरू करावं लागेल. प्रत्येक ठिकाणी असा एक मोठा समूह आहे, मोठा गट आहे, ज्याचं पोट हातावर आहे. दोन वेळची भाकरी मिळविण्यासाठी ज्याला खूप यातायात, आटापिटा करावा लागत आहे. अशा […]

Categories
परिसंवाद

संतांनी समतेचा विचार मांडून धार्मिक दहशतवादाला व असहिष्णुतेला विरोध केला

वार्षिकांक - २०१८

ह.भ.प.शामसुंदर सोन्नर महाराज यांनी आपल्या भाषणाची सुरुवात एका सुंदर-सुश्राव्य श्लोकाने केली. संत ज्ञानेश्वरांच्या अभंग पंक्तीही यांनी उद्धृत केल्या. ‘जे अविवेकाची काजळी। फेडोनी विवेकदीप उजळी। ते योगिया पाही दिवाळी निरंतर॥’ धार्मिक दहशतवाद आणि अहिष्णुतेविरोधी परिषद घेण्याचे कारण नमूद करताना त्यांनी वारकरी संप्रदायाच्या स्थापनेचा संदर्भ दिला. ज्या-ज्या वेळी समाजात असे असहिष्णू वातावरण तयार झाले किंवा होत असते, […]