10 ते 50 वयाच्या महिलांना मासिक पाळी येते, त्यामुळे त्या अपवित्र आहेत. शिवाय अय्यप्पा ब्रह्मचारी आहे; तेव्हा शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देता येणार नाही, असे महिला प्रवेशबंदीचे समर्थन करणार्या पुरोहितांना सुप्रीम कोर्टाने फटकारले आणि 2018 साली महिलांसाठी मंदिराचे दरवाजे खुले झाले. स्त्री–पुरुष विषमतेविरोधातली लढाई धर्मक्षेत्रातून न्यायक्षेत्रात आली आणि तिने राजकीय क्षेत्रही व्यापले. कोर्टाच्या या निर्णयानंतर […]
कॅटेगरी: स्पेशल रिपोर्ट
रत्नागिरीचा नटरंगी पाटीलबाबा
चार महिन्यांपूर्वी देशात रामरहीमच्या प्रकरणाने खळबळ माजली होती. आणि त्याचवेळी महाराष्ट्रात रत्नागिरीच्या पाटील बाबाच्या काही आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मिडिया व टीव्ही चॅनेल्सवर प्रसारित झाल्या. या व्हिडीओमध्ये बाबा महिलांना अर्वाच्य शिवीगाळ करताना, तरूणीसोबत नृत्य करताना दिसतो आहे. अशा या नटरंगी पाटीलबाबाच्या आश्रमास प्रत्यक्ष भेट देऊन लिहिलेला हा रिपोर्टाज खास अंनिवाच्या वाचकांसाठी…! आपल्या देशाला बाबा-बुवा-महाराज यांची नव्याने […]
देशात सर्वांत मोठी जातपंचायत म्हणून हरियाणातील खाप पंचायतीला ओळखले जाते. या पंचायतीचा संपूर्ण हरियाणावर प्रभाव आहे. ‘खाप’ची हिंसक कार्यपद्धती व अजब फतवे यामुळे त्या देशभर नेहमीच चर्चेत असतात. सगोत्र विवाह आणि आंतरजातीय विवाहाला या खाप पंचायती कडाडून विरोध करतात. असे विवाह करणार्यांवर बहिष्कार टाकले जातात; प्रसंगी त्यांची हत्या होते. ‘ऑनर किलिंग’मध्ये हरियाणा देशात नंबर एक […]
शोध अंबेचा
देवीच्या प्रथा बदलतात गाथा बदलतात देवीचा प्रसाद बदलतो नैवेद्य बदलतो देवीचे रूप बदलते नाव बदलते नाती बदलतात पती बदलतात साथी बदलतात माथी बदलतात रीती बदलतात बदलत नाही ती भाविकांची भक्ती! आणि पुजार्याची शक्ती! असे का होते? असे कसे होते? त्याचा हा शोध …. शोध अंबेचा! कोल्हापूरची प्रसिध्दी अनेक गोष्टीसाठी आहे. पण सामाजिकदृष्ट्या राजर्षी शाहूंची नगरी, […]
आमी जिआय थाकीबो बिसारू!
स्त्रियांना ‘चेटकीण’ ठरवून समाजातून बहिष्कृत करण्याचे, मारहाण करण्याचे; अगदी ठार मारण्याचेही प्रकार देशभरात विविध ठिकाणी घडत असतात. ‘महाराष्ट्र अंनिस’ या प्रथेविरोधात जोरदार संघर्ष करत आहे. पण आसाममध्ये या प्रथेची तीव्रता खूपच आहे. आजही असंख्य स्त्रिया आणि पुरुष या प्रथेला तेथे बळी पडत आहेत. यामुळे आसाममध्ये डायन प्रथेविरुद्ध कायदा अस्तित्वात येत आहे. आसाममधील या अघोरी प्रथेचा […]
शंकराचार्यांची राखीव जागा
आपल्याला शंकराचार्यांच्या शृंगेरी मठाला भेट द्यायची आहे. असा फोन आल्यापासून मी माहिती मिळवायला सुरवात केली. अनेकजणांकडे चौकशी केली. दोघांनी कोल्हापुरातल्याच शंकराचार्यांच्या मठाला भेट द्यायला सांगितले. एकाने आद्य शंकराचार्यांचे चरीत्र वाचण्याचा सल्ला दिला. तर आठ दहा जण असे निघाले की, त्यांनी “कोण शंकराचार्य?” असा मलाच प्रश्न केला. आद्य शंकराचार्य : “शंकराचार्य म्हणजे आद्य शंकराचार्य! प्रत्यक्ष परमेश्वरानेच […]
रे रोड येथील मीरा दातारचा दर्गा
मी आणि संजय सावरकर मुंबईच्या रे रोड या रेल्वे स्टेशन जवळच्या दर्ग्यात जायला निघालो. गुरूवारी दुवा देतात म्हणून गुरूवारच्याच संध्याकाळी जायचे ठरले होते. जळगावच्या दर्ग्यात मी जाऊन आलो होतो. तेथेही गुरूवारचाच दुवा देतात. मुस्लिम धर्मात शुक्रवार पवित्र दिवस मानला जात असताना दोन्ही ठिकाणी गुरूवारचा दिवस का निवडत असावेत याचे आश्चर्य आम्हा दोघांना वाटत होते. […]
शहानूर बाबाचा दर्गा, चिपळूण
रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणपासून सुमारे 10 कि.मी. अंतरावरचं अलोरे गाव. गावच्या वस्तीपासून लांब अंतरावर ‘शहानूरबाबा सेवाधाम’ या गोंडस नावाखाली असलेला शहानूर बाबाचा दर्गा. (हा शहानूर बाबा मुळचा औरंगाबाद जिल्ह्यातल्या चिकोडीच्या जवळचा. तिथली समाधी दरवर्षी आकारानं थोडी-थोडी वाढते अशी वदंता.) दर्ग्याच्या प्रवेशद्वाराशी असलेल्या कमानीतून ठळक अक्षरात दिसणारी पाटी : “येणार्या भाविकांनी आपल्या घरी अडचणीचे दिवस […]
सांगली शहरापासून फक्त बारा किलोमीटरवर येरळा नदीच्या काठावर मिरज आणि तासगाव दोन तालुक्यांच्या हद्दीवर वसलेलं नांद्रे हे तसं खाऊन-पिऊन सुखी असलेल्या ऊस बागायतदारांचं गाव. राजकीय, शैक्षणिक, सामाजिक इत्यादी सर्वच क्षेत्रात जागरूकतेचा वारसा या गावाला लाभलेला आहे. गावात जातीय सलोखा नांदतोय. गावच्या वेशीवरच असलेल्या हजरत ख्वाजा कबीर दर्ग्याचे भक्तगण सार्या जाती धर्मातले आहेत. असं जरी […]
सातपुड्याच्या कुशीत वसलेलं नंदूरबार परिसर हा आदिवासी बहुल भागात मोडतो. जिल्ह्यात डाकीणीच्या प्रश्नाची धग कायम असतांनाच आणखीच नवीन असणार्या अंधश्रद्धांच्या प्रकाराचा पेव आल्याने चीड आहे. सातपुडा पर्वताच्या पंचक्रोशीत विराजमान तळोदा तालुक्यातील धानोरा ते आमलाड या दोन गावांदरम्यान असणार्या दर्ग्यात सध्या जो प्रकार पहायला मिळतो, तो ही यापैकीच एक. ‘पीर सैय्यद गुमानअली चिश्ती’ असे […]