Categories
उपक्रम

निमगुळ अंनिसची स्मशान सहल

एप्रिल - २०१८

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती निमगुळ शाखा व ग्रामपंचायत निमगुळ यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे तालुक्यातील निमगुळ येथे अमावस्येच्या दिवशी अंनिस कार्यकर्तेव ग्रामस्थांनी स्मशान सहल काढली. सुरुवातीला संपूर्ण स्मशानाची साफसफाई केली. नंतर स्मशानभूमीत मरणोत्तर व अवयवदान या फलकाचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी धुळे शाखेचे कार्याध्यक्ष रणजित शिंदे यांनी देहदानाबाबत माहिती देऊन जनजागृती केली. धुळे शाखेचे प्रदीप सोनवणे, दिलीप खिंवसरा, नवल ठाकरे यावेळी उपस्थित होते. निमगुळचे दिलीप खिंवसरा यांनी सुद्धा अवयवदानाबद्दल उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. यावेळी दिलीप खिंवसरा यांचे वडील कांतिलाल खिंवसरा (वय 86) यांनी देहदानाचा संकल्प फॉर्म भरला असल्यामुळे त्यांचा ट्रॉफी व अंनिसचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. स्मशानभूमीत बाबूराव फकिरा सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रबोधनगीते सादर केली. यावेळी अल्पोपहार देण्यात आला. कार्यक्रमाच्या वेळी निमगुळचे सरपंच नवनीत मोरे, उपसरपंच अजित राजपूत, अंनिसचे निमगुळ शाखेचे अध्यक्ष मोहन सोनवणे, हंसराज मोरे, शांताराम मोरे, हर्षल सूर्यवंशी, देविदास सोनवणे, कल्पेश मराठे, राहुल पाटील, जनार्दन सोनवणे, अजय मराठे, इंद्रजित सूर्यवंशी, शांताराम सूर्यवंशी, सौ. सुरेखाताई मोरे यांच्यासह अनेक महिलांची लक्षणीय होती.