अंनिस कोल्हापूर शाखेच्या वतीने इंदूबाई लोखंडे या महिलेचे जटा निर्मूलन, भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालयात करण्यात आले. सदर महिलेचे प्रबोधन करण्याचे काम अंनिस महिला संघटक सीमा पाटील यांनी केले. या महिलेची मुलगी रतन कवाळे यावेळी उपस्थित होती. यावेळी अंनिस शहर प्रधान सचिव निशांत शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश वडणगेकर, गीता हासूरकर, कॉ. बाबा यादव, श्रीपती मगर आदी उपस्थित होते.
–रमेश वडणगेकर, कोल्हापूर