Categories
प्रासंगिक

9 ऑगस्ट मअंनिसचा वर्धापन दिन साजरा करा!

ऑगस्ट - २०१७

सर्व शाखा व जिल्हा कार्याध्यक्ष आणि प्रधान सचिव यांना जाहीर आवाहन

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटनात्मक कामाला रीतसर व संवैधानिक पातळीवर ऑगस्ट 1989 मध्ये सुरुवात झाली. 9 ऑगस्ट हा क्रांती दिन महाराष्ट्र अंनिसचा वर्धापन दिन म्हणून खालील उपक्रमांपैकी शक्यतेनुसार उपक्रमातून सर्व शाखा व जिल्हा पातळीवर साजरा करावा असे जाहीर आवाहन राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले आहे. 1) सर्व समविचारी कार्यकर्ते नागरिकांना सोबत घेऊन जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करावे. 2) त्यात महाराष्ट्र अंनिसचा व आपल्या शाखेचा स्थापनेपासून कार्याचा आढावा घ्यावा. 3) वक्त्याचे व्याख्यान, कुटुंब मेळावा, शहीद डॉक्टर दाभोलकरांच्या सी.डी. दाखवणे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतील नाविन्यपूर्ण उपक्रमातून प्रभावी पणे साजरा करावा. त्याच्या बातम्या द्याव्यात. फोटो बातम्या सह विविध उपक्रम कार्यवाहना अहवाल पाठवावा.

माधव बावगे, राज्य प्रधान सचिव, महाराष्ट्र अंनिस