दि. 22 जुलै 2019 रोजी दु. 2.43 मिनिटांनी ‘जीएसएलव्ही मार्क 3’ या प्रक्षेपकाद्वारे तब्बल 9 अब्ज 80 कोटी खर्चाच्या ‘चांद्रयान-2’ चे प्रक्षेपण आंध्र प्रदेशमधील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून यशस्वीपणे झाले आणि तमाम भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून गेलेला होता. चंद्रावर बग्गी उतरवणारा अमेरिका, रशिया आणि चीन नंतरचा ‘चौथा देश’ अशी बिरूदावली लावून घेण्याच्या अनुषंगाने […]
कॅटेगरी: प्रासंगिक
पाव शतकाचा प्रदीर्घ लढा जेव्हा निर्णायक स्थितीला पोचतो, तेव्हा जगभर पसरलेल्या आपल्यासारख्या अनेकांच्या भावना काय असतील, याची आपण कल्पना करू शकतो. 6 सप्टेंबर 2018 ला सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने भारतीय दंडसंहितेचे 377 वे कलम, जे समलैंगिक संबंधांना नैसर्गिक न मानता गुन्हेगारीचे रूप देत होते, त्या कलमाला अंशत: रद्दबातल केले. ‘जोपर्यंत आपल्यातले सारे मुक्त नाहीत, तोपर्यंत आपल्यातील […]
आताचे खरे कावडिया!
विनोद दुआ के साथ… (जन मन धन की बात या ‘दि वायर’ पुरस्कृत मालिकेसाठी निर्भीड पत्रकार विनोद दुआ यांनी कावडियांच्या हिंस्र मानसिकतेविषयी केलेली टिप्पणी. त्यांच्याच शब्दात…) आजकाल कावडियांच्या संदर्भात चर्चा होत आहे. कारण शेकडो-हजारो वर्षापूर्वींची असलेली ही प्रथा, गेल्या 30 वर्षांत त्याला कशाप्रकारे विकृत स्वरूप आलेले आहे म्हणून ही चर्चा होत असावी. या कावडियांच्या मध्ये […]
…अखेर सत्य जिंकले!
‘लढाई दृढ विश्वासामुळेच जिंकली जाते; पैशाने नाही,’ आसारामला जेलची हवा खायला लावणार्या वकिलाने खटल्याचा निकाल ऐकल्यावर काढलेले हे उद्गार आहेत. त्या वकिलाचे नाव आहे, पी. सी. सोलंकी. त्यांनी व्यक्त केलेले हे मनोगत… त्या दिवशी 15 मिनिटांत न्यायमूर्तींनी आपला निकाल वाचून दाखवला. ती 15 मिनिटे माझ्या आयुष्यातील सर्वात तणावपूर्ण होती. एक-एक क्षण एखाद्या पहाडासारखा माझ्या अंगावर […]
ओळख नव्या पाठ्यपुस्तकांची
सामाजिक कार्यकर्त्यांनी संस्कार होण्याच्या काळात शिक्षणाकडे लक्ष द्यावे. आता तरी बहुतेक बुवा–बाबा शालेय विद्यार्थ्यांना टार्गेट करत आहेत. त्यांना आवरणे हेही काम आहेच. पाठ्यपुस्तके बदलण्याच्या निमित्ताने याचा विचार शिक्षक, पालक, नागरिक आणि कार्यकर्त्यांनी केलाच पाहिजे. समाजाच्या विकासात शिक्षणाला प्रचंड महत्त्व आहे. आजपर्यंतच्या ज्ञानाचे संचित पुढच्या पिढीला पोचवण्याचे काम शिक्षण करत असते. समाजातले सर्व गोष्टींचे व्यवस्थापन शासन […]
उच्च न्यायालयाचा संतप्त सवाल 19 एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयात डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या तपासाच्या अनुषंगाने सुनावणी झाली. या दोन्ही खुनांच्या तपासातील दिरंगाईमुळे आपण अॅड. अभय नेवगी यांच्यामार्फत जवळजवळ अडीच वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयामध्ये हा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा म्हणून याचिका दाखल केली होती. आज अखेर या याचिकेवर वीसपेक्षा अधिक वेळा […]
कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची बातमी मला समजली आणि मी एकदमच भूतकाळात गेलो. प्रथमत: माझ्यावरील संस्काराचा भाग म्हणून मी शंकराचार्यांना आदरांजली वाहतो. याच शंकराचार्यांशी संबंधित ते 1980-1981 च्या सुमारास ते सातार्याला असतानाच्या माझ्याशी संबंधित काही घटना आता सद्य:स्थितीत मांडाव्याशा वाटल्याने त्या लिखित स्वरुपात मांडत आहे. कांची कामकोटी पीठाचे स्वामी […]
पुतळे निर्जीव असतात काय?
त्रिपुरातील विधानसभा निवडणुकीत डाव्या आघाडीचे सरकार पराभूत होऊन भाजपप्रणीत आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर आपण स्वीकारलेल्या संसदीय लोकशाहीची ही एक सर्वसाधारण परंपरा आहे. दर पाच वर्षांनी निवडणुका होऊन सरकारे बदलली जातात किंवा जुनीच सरकारे सत्तेवर परत येतात. भारतीय जनतेला राज्यघटनेने बहाल केलेला हा मौलिक अधिकार आहे. नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर ते ज्या […]
हिंसा अंतिम उत्तर नाही
मानवी समाजात अहिंसा हे नेहमीच आदर्श मूल्य राहिले आहे. हे आदर्श मूल्य व्यवहाराच्या स्वरुपात समाजजीवनात अस्तित्वात आले. यासाठी मानवजातीची धडपड आपणास दिसून येते. यासाठी समाजजीवनातून हिंसेचा पूर्ण नायनाट व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न होताना दिसतात. तरीपण हिंसा अक्राळ-विक्राळ स्वरुपात समाजजीवनात प्रकट होत राहते. ‘खरा तो एकचि धर्म- जगाला प्रेम अर्पावे’ हे साने गुरुजींनी किती साध्या-सरळ शब्दांत […]
प्रति, मा. सत्यपालसिंह, मनुष्यबळ विकास राज्यमंत्री, भारत सरकार यांस… सप्रेम नमस्कार, मी विनय र. र. एक निवृत्त विज्ञानशिक्षक आहे. मराठीतून विज्ञानप्रसार करण्याचं काम मराठी विज्ञान परिषद, पुणे विभागात करतो. विज्ञानशिक्षणाबाबत प्रयोग आणि संशोधनही करतो. पत्र लिहिण्यास कारण की, आपण 19 जानेवारीला औरंगाबाद येथील ‘अखिल भारतीय वैदिक संमेलनात’ केलेलं वक्तव्य वर्तमानपत्रात; तसंच अन्य मार्गातून वाचनात आलं. […]