Categories
निषेध

सत्यपाल महाराजांच्यावरील चाकू हल्ल्याचा जाहिर निषेध!

जून – २०१७

हल्ल्यामागचा सुत्रधार शोधा! – अंनिस मुंबई येथील 12 मे 2017 रोजीच्या बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमात सप्तखंजिरी वादक, पुरोगामी कीर्तनकार सत्यपाल महाराज यांच्यावर चाकूहल्ला झाला. कुणाल किशोर जाधव या माथेफिरूने स्टेजवर येऊन महाराजांच्या पोटावर चाकूने वार केले. या हल्ल्यात महाराज किरकोळ जखमी झाले. सत्यपाल महाराजांच्यावर झालेला हा हल्ला पुरोगामी संत परंपरेवर हल्ला असून फुले, शाहू, आंबेडकरांच्या सुधारणावादी […]

Categories
निषेध

डॉक्टरांचा खून तपास दिरंगाईचा महाराष्ट्रभर तीव्र निषेध

सप्टेंबर - २०१५

मोर्चा, धरणे, रॅली, मॉर्निंग वॉक आणि राष्ट्रपतींना पत्रे लिहून महाराष्ट्राने केला निषेध! सातारा : शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला दोन वर्षेपूर्ण होऊनही मारेकर्‍यांचा तपास लागलेला नाही किंवा तपासामध्ये काहीही प्रगती दिसत नाही. तसेच कॉ. गोविंद पानसरे यांच्याही खुनाला सहा महिने होऊनही तपासाची गती शून्य आहे. चळवळीतील दोन मोठे आधारस्तंभ गमावूनही संपूर्ण महाराष्ट्रातून व इतर […]

Categories
निषेध

पानसरे हत्येच्या निषेधार्थ मुंबईत भव्य मोर्चा

एप्रिल - २०१५

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे व उमा पानसरे यांच्यावर कोल्हापूर येथे दि.16 फेबु्रवारी रोजी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये कॉ.गोविंद पानसरे दि.20 फेबु्रवारीला उपचारादरम्यान मरण पावले. गोविंद पानसरे यांच्या हल्ल्यासंदर्भात महाराष्ट्रभर प्रतिक्रिया उमटल्या, लोक रस्त्यावर उतरून शासनाचा निषेध करीत राहिले. कोल्हापूर येथील विविध माध्यमातून निषेध झाला. कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा मोर्चा काढण्यात आला व […]

Categories
चळवळ निषेध

डॉ. दाभोलकर व कॉ. पानसरे यांच्या मारेकर्‍यांच्या प्रवृत्तीची संगमनेरमध्ये होळी

एप्रिल - २०१५

अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा संगमनेरच्या (जि.अहमदनगर) वतीने पारंपारिक होळी साजरी न करता दुष्ट सनातनी प्रवृत्ती, पर्यावरणपूरक व व्यसनांची होळी दि.6 मार्च 2015 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती पुरस्कार विजेते सोमनाथ कळसकर गुरूजी उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी त्यांनी अशा प्रकारे होळीचा कार्यक्रम घेणे अतिशय स्तुत्य आहे. अलिकडे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर र्‍हास […]

Categories
निषेध

अंनिसच्या रिंगणनाट्याचे दिल्लीत सादरीकरण

मार्च - २०१५

डॉ. दाभोलकरांच्या खुनाचा निषेध हा धरणे, आंदोलने, मोर्चे, उपवास या माध्यमातून डॉक्टर दाभोलकरांच्या खुनाचा व्यक्त करण्याबरोबर सांस्कृतिक वेदना अभिव्यक्तीचा मार्ग म्हणून अंनिसने महाराष्ट्र अंनिस लोकरंगमंच या व्यासपीठाची अतुल पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मिती केली! ‘सॉक्रेटिस ते दाभोलकर व्हाया तुकाराम’ हे महाराष्ट्र अंनिसच्या इस्लामपूर शाखेने बसवलेले राजा शिरगुप्पे, एकनाथ पाटील, संजय बनसोडे लिखित, विजय पोवार, योगेश कुदळे […]

Categories
निषेध

20 ऑगस्टला पुण्यात भव्य मोर्चा व निषेध सभा

ऑक्टोबर - २०१४

आम्ही प्रकाशबीजे, रूजवीत चाललोवाटा नव्या युगाच्या, रूळवीत चाललो॥जे शिल्पकार सारे, येत्या नव्या युगाचेत्यांची स्मृती मनाशी, जागवीत चाललो॥ हे अंनिस लोकरंगमंचाचे गीत सकाळी 7 वाजता महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर एकसाथ हजारो कार्यकर्तेगात होते. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनास एक वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त राज्यातील हजारो कार्यकर्तेएकत्र येऊन डॉक्टरांना आदरांजली वाहत होते. त्यांना सामाजिक कार्यकर्ते, सिने, नाट्य […]

Categories
निषेध

20 ऑगस्ट निषेध दिनानिमित्त महाराष्ट्रात झालेले कार्यक्रम

ऑक्टोबर - २०१४

डॉ. दाभोलकरांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्रातील अंनिस संघटना तसेच इतर समविचारी संघटना यांनी विविध मार्गांनी अभिवादन कार्यक्रम घेतले. महाराष्ट्राबाहेर पंजाब, केरळ, आंध्र व कर्नाटक राज्यातही अभिवादन सभा झाल्या. या सर्व कार्यक्रमातून डॉक्टरांच्या कर्तृत्वाचे दर्शन तर झालेच. पण त्यांच्या खुनाचा तपास न लागल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला, या निमित्ताने अंनिस समाजात कशी रूजली आहे व […]

Categories
निषेध

जातीभेद गाडून टाका!

जून – २०१३

दि.16 डिसेंबर 2012 रोजी रात्री जामनेर, जि.जळगाव शहरात आणखी दोन निरागस मुलांचा बळी  जातीव्यवस्थेमुळे गेला. याबाबत माहिती अशी की, जामनेर शहरामध्ये एक शेतकरी मध्यमवर्ग कुटुंब आनंदाने राहत होते. त्यांना दोन मुली व एक मुलगा होता. त्यापैकी एका मुलीचे लग्न झालेले असून ती सुखी आहे. दोन नंबर मुलीचे शिक्षण बी.फार्म झालेले होते व ती शहरात जॉबही […]