Categories
चळवळ निषेध

डॉ. दाभोलकर व कॉ. पानसरे यांच्या मारेकर्‍यांच्या प्रवृत्तीची संगमनेरमध्ये होळी

एप्रिल - २०१५

अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा संगमनेरच्या (जि.अहमदनगर) वतीने पारंपारिक होळी साजरी न करता दुष्ट सनातनी प्रवृत्ती, पर्यावरणपूरक व व्यसनांची होळी दि.6 मार्च 2015 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती पुरस्कार विजेते सोमनाथ कळसकर गुरूजी उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी त्यांनी अशा प्रकारे होळीचा कार्यक्रम घेणे अतिशय स्तुत्य आहे. अलिकडे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर र्‍हास […]

Categories
कविता

माझ्या बापाची अंत्ययात्रा…

एप्रिल - २०१५

तू माझ्या बापाच्या अंत्ययात्रेस होतास काय…..? वेळ नव्हता म्हणतोस! हो असेलही खरं…. नाहीतरी कुठे असतो वेळ तुला अशा ‘किरकोळ’ घटनांकडे लक्ष द्यायला! माझा बाप जेव्हा मोलकरणींसाठी रस्त्यावर उतरायचा तेव्हाही तू असायचास तुझ्या महत्वाच्या कामात ‘बिझी’ मोलकरणींचं काय घेऊन बसायचं त्यांना दोन वेळचं खायला मिळतंच की! माझा बाप जेव्हा कामगारांचा आवाज बनून भांडवलशाहीवर हल्ला बोलायचा तेव्हाही […]

Categories
व्यक्तिविशेष

जग बदलायला निघालेला नंगा फकीर

ऑगस्ट - सप्टेंबर - २०१४

एका रशियन क्रांतीकारकाचे ‘क्रांतीत आम्ही तरूण होतो आणि त्यात आम्ही सहभागी होतो, हे आमचे भाग्य होते.’ अशा आशयाचे प्रसिद्ध वाक्य आहे. त्याचप्रमाणे आम्ही तरूण होतो, आणि डॉ. नरेंद्र दाभोलकरांसारख्या योद्ध्यासोबत अंधश्रद्धा निर्मूलनाची अवघड लढाई लढत होतो असे सांगताना जशी छाती फुलून येते तसेच हा योद्धा या लढाईत शहीद झाला असं म्हणताना उर आणि डोळे भरून […]

Categories
व्यक्तिविशेष

निर्भयी व निगर्वी व्यक्तित्व

ऑगस्ट - सप्टेंबर - २०१४

अंनिस चळवळीबद्दल मला विशेष अशी फारशी माहिती नव्हती मी सर्वसामान्यच होतो. लॉ कॉलेज मध्ये असताना एन.एस.एस.च्या शिबिरात चमत्काराचा कार्यक्रम झाला होता तेव्हा पासून अनिस च्या जवळ येण्यास सुरुवात झाली होती, आपटे प्रशालेत पुण्याची साप्ताहिक मिटिंग व्हायची, त्या मिटिंगच्या वेळी गिरमे, नानावटी, खिलारे, यांच्यात वैचारिक भांडणे व्हायची मिटिंग संपल्यावर कळायचे ती वैचारिक चर्चा असायची, तो पर्यंत […]

Categories
व्यक्तिविशेष

तरूणाईचा प्रेरणास्त्रोत

ऑगस्ट - सप्टेंबर - २०१४

5 जानेवारी 2005 रोजी दाभोलकर सरांशी माझी पहिली भेट झाली. एम.बी.बी.एस.उत्तीर्ण होऊन मी इंटर्नशीप करत होते. नास्तिक विचारसरणी आणि पुस्तके वाचण्याची आवड असल्यामुळे दाभोलकर सरांची काही पुस्तके मी वाचली होती. ते धुळ्याला येणार असल्याने त्यांचे व्याख्यान ऐकता येईल आणि त्यांची स्वाक्षरी घेता येईल एवढी माफक अपेक्षा ठेवून मी कार्यक्रमाला गेले. धुळ्यातील एका बगीच्यात तो कार्यक्रम […]

Categories
व्यक्तिविशेष

जीवन फुलवणारी प्रेरणा

ऑगस्ट - सप्टेंबर - २०१४

“मंझील उन्हीको मिलती है, जिनके सपनोमे जान होती है,पंखोसे कुछ नही होता, होसलो से उडान होती है.।” डॉ.दाभोलकरांचे व्यक्तिमत्व चांगले होते यात संशयच नाही. पण दाभोलकर कशासाठी होऊन गेले हे पाहायला हवे, जगात असे खूप सारे लोक आहेत की, ज्यांना आपल्यातील कार्यक्षमता न कळता किड्या मुंगीसारखे जन्माला येतात व मरून जातात. माझ्या जगण्याचा हेतू काय […]

Categories
व्यक्तिविशेष

साधीशी कौतुकाची थापही कामाची प्रेरणा देणारी….

ऑगस्ट - सप्टेंबर - २०१४

आयुष्याचे दोन टप्पे बालपण व तरूणपण घरच्या पारंपारिक ब्राह्मणी संस्कारात गेले, त्यामुळे सण, उत्सव, व्रतवैकल्य हे नित्यनेमाने घरात चालत होते, अर्थात चालत आलेले संस्कार म्हणून पुढे चालविले जात होते, त्यात कट्टरपणा नव्हता. अशा घरात श्रद्धा किंवा अंधश्रद्धा यांचा विचारच मनात आला नाही. पुढे शाळेची नोकरी सांभाळताना नोकरीच्या उत्तरार्धात शाळेतील इतर शिक्षकाकडून अंनिसचे विचार कानावर आले. […]

Categories
व्यक्तिविशेष

सनातनी विचारांचा मुकाबला विवेकाने करण्याचा निर्धार

ऑगस्ट - सप्टेंबर - २०१४

8 ऑगस्ट 2001 ला डोंबिवली येथे विज्ञानबोध वाहिनीच्या उभारणीसाठी पार पडलेल्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात आम्हा पालघर शाखेच्या कार्यकर्त्याची डॉ.नरेंद्र दाभोलकरांशी प्रथम भेट झाली. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? श्रद्धा अंधश्रद्धा, मन मनाचे आजार, बुवाबाजी इ. विषयांची मांडणी सतत 4 ते 5 तास ती ही रंजकपणे करणारे दाभोलकर माझ्या लक्षात राहिले ते त्यांनी सांगितलेल्या प्रबोधनकारांच्या एका कवितेमुळे. […]

Categories
व्यक्तिविशेष

साधेपणा

ऑगस्ट - सप्टेंबर - २०१४

रायगड जिल्ह्यातील अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण. या ठिकाणी फेब्रुवारी 2013 मध्ये राज्यव्यापी कार्यकारिणीची बैठक अलिबाग जवळच्या वरसोलीतील पर्णकुटी येथे आयोजित करण्यात आली होती. डॉ. नरेंद्र दाभोलकर गेल्या वीस वर्षांत अलिबागला दोन तीन वर्षाआड तरी यायचेच. पण या राज्यकार्यकारिणी बैठकीचे वेळी मला डॉ. दाभोलकरांच्या निरसलतेची व साधेपणीची जाणीव प्रकर्षाने झाली. बैठकीच्या दुसर्‍या दिवशी सकाळी मी जेव्हा […]

Categories
व्यक्तिविशेष

तुम्ही आम्हाला हवे आहात!

ऑगस्ट - सप्टेंबर - २०१४

डॉक्टर तुम्ही आम्हाला हवे आहात आमचे पूर्ण कुटुंब पोरके झाले. तुमच्या आठवणींनी रडू आवरता येत नाही, रडता रडता अंगावर शहारे येतात. त्या दिवशी तुमच्या बातमीने कानावर विश्वासच बसेना. काय? कसे? एक ना अनेक प्रश्न मनात आले. आजदेखील त्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत. 17 ऑगस्टला तुमच्या कार्यक्रमाच्या दिवशी पुणे अंनिसचे अध्यक्ष माधव गांधी यांच्या लग्नाला 50 […]