उच्छाद मांडलाय गव्यांनी सर्वत्रत्यांची दहशत आहे प्रचंड लोक आता रानावनात जात नाहीत गावाबाहेर, घराबाहेर पडत नाहीत शेतावर जायचं कधीच सोडलंय त्यांनी आणि हातातोंडाशी आलेली ही पिकं फस्त करून टाकलीत गव्यांनी कळत नाही, कुठून, कसे अचानक येतात हे हिंस्र गव्यांचे कळप गावागावात घुसतात आणि कशी करतात चाल कोणाच्याही अंगावर त्यांचा नाही नेम नसतो कळप नेहमी शिंगे […]
कॅटेगरी: कविता
कुणी कुणाला एक साधे पत्र लिहिले तरी कुणीही गुन्हेगार ठरु शकतो या देशात डेंजरझोनमध्ये उभा आहे देश, मी आणि तुम्हीसुद्धा… तुम्ही बोलायचे नाही धोरणांवर उपस्थित करायचे नाहीत प्रश्न विकासावर. पाशवी बहुमतासोबत नसाल तर उद्या तुम्हीही गुन्हेगारच असाल. तुमचा ऐकला जाणार नाही आवाज. दाबले जातील पद्धतशीरपणे विरोधाचे सूर. अराजक आता फार असणार नाही दूर चिरडून टाकले […]
“सारे धर्मग्रंथ वाचले पानं चाळताना फक्त एवढीच चूक झाली बोटाला जिभेवर न्यावं लागलं मी धर्माला थुक्का लावला आणि मी माणूस झालो. दिवाळीला घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली मला लोकं हरामी घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात म्हणून मी सगळं घरच पांढरंशुभ्र केलं मी जातीला चुना लावला आणि मी माणसात आलो.”
मासिक आणि मानसिक पाळी
“दीदीला पदर आला,” असं आई बाबांना म्हणाली दीदीने बाबांकडे पाहिलं, बाबांनी दिदीकडे पाहिलं दीदीची निरागसता अगदी तशीच… पण बाबांच्या चेहर्यावर काळजी. कायम उघडी असणारी घराची एक खिडकी बाबांनी आज कायमची बंद केली दीदीला कळलंच नाही तिच्या मनात एकच प्रश्न खि.ड.की. बंद का…?
मी अंधारात घुसणार तेवढ्यात उजेड पाय आपटून – आपटून रडू लागला म्हणाला, नको ना जाऊ. मी म्हटलं का? तो म्हणाला, अंधारात भुतं असतात. मी त्याचं बोट धरलं आणि चल म्हटलं आम्ही पुढे जाऊ तसं अंधार नाहीसा होत गेला आणि माणसं दिसू लागली…. ‘देवाने माणूस तयार केला की, माणसाने देव निर्माण केला?’ असं काहीसं मी परवा […]
फुलते त्या प्रत्येकीचे पवित्र निर्माल्यच होईल अशी खात्री देता येत नाही. उमलू न दिलेल्या कित्येक कळ्यांना निर्माल्य हे तर वरदान ठरते बहुधा. बाकी ज्याने ज्याकडे जसे पाहावे तसे ते त्याला दिसते, हा एक जबरदस्त दिलासाच म्हणायचा, शोषक – शोषित दोघांनाही ! त्याग, कृतार्थता, जीवनार्थ तर बरेचदा असते संस्कृतीची निव्वळ सारवासारव. कळ्यांनी कसे कुठे किती फुलावे, […]
स्त्री धर्म
आई गं तू आंदण म्हणून दिलेला तुझा धर्म मी झाकून ठेवलाय दिवा नसलेल्या अंधाराच्या गाभार्यात कारण विस्फारलेली त्याची नजर माझ्या स्वातंत्र्याच्या आडवी येते. म्हणून मी आज धर्मालाच झाकून ठेवलंय… आजही नजरेतले बाण काही बदललेले नाहीत त्याच्या पायातलं वहाण आणि विषयांची भोक्ती म्हणून आजही तो माझ्याकडे तसाच पाहतोय आणि सोशिकतेची मूर्ती ठरवून पुन्हा एकदा पतिव्रतेवर बलात्कार […]
शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा पोवाडा
चाल 1 फुले, शाहू, आंबेडकर हा ऽऽ महात्मे थोर, केला उद्धार, बहुजन दलित शोषितांचा। वारसा त्यांच्या विचारांचा। शिलेदार दाभोलकर त्यांचा रं जी ही जी जी ॥1॥ स्वातंत्र्यसूर्य उगवला हाऽऽ मुक्त जाहला। देश आपुला, गुलामीच्या बेड्या जरी तुटल्या। अंधश्रद्धेच्या परी उरल्या। विकासाचा मार्ग म्हणून अडला रं जी ही जी जी ॥2॥ श्रद्धेची चिकित्सा करा हाऽ बुद्धी […]
हे सत्पुरुषा, एकदाच बाई होऊन बघ कशी असते, कशी वागते अशीच का वागते, तशीच का बोलते, हसते एकदाच उमगून बघ ॥धृ॥ फार वेळ नको! सहा महिन्यातून एकदा तुझी पाळी होऊ दे, अंगावरून लाल-पांढरं भरपूर जाऊ दे पायाच्या तळापासून केसांच्या मुळा पावत कळा सोसून बघ एकदाच सत्पुरुषा…. ॥1॥ कधी दोन दिवस, कधी तीन चार, पाच, सहा, […]
बरं झालं यार ‘डार्विन’ ! तू भारतात जन्म घेतला नाहीस… नाहीतर तुझ्यातील शास्त्रज्ञ तेव्हाच मारला असता आम्ही माकडांनी… तुझ्या मनावर परंपरेचं ओझं देऊन… तुझे सिद्धांत आम्ही बुडवले असते इंद्रायणीच्या पात्रात… नाहीतर तुझ्या शोधावर अग्नीसंस्कार तरी केला असता… तुझ्या उत्क्रांतीचे रहस्य तुलाच सांगता आले नसते रे… तुझ्याप्रमाणेच तुझी प्रयोगशाळा उध्वस्त केली असती… माकडचेष्टा करून… माहिती आहे, […]