Categories
अंधश्रद्धा

शाळकरी मुलीच्या मृत्यूनंतर जळगाव अंनिसने उतरवले नागरिकांच्या मनातील ‘भूत’

ऑक्टोबर - २०१९

भूतबाधा झाल्याच्या संशयावरून कजगाव (ता. भडगाव) येथील 14 वर्षीय शाळकरी मुलीस कनाशी येथील एका मंदिरात उपचारासाठी नेले होते. याच परिसरात संबंधित मुलीने विजेच्या खांबावर चढून उडी घेतल्याने तिचा जीव गेला. मुलीच्या अंगात असलेल्या भुताने जीव घेतल्याचा समाज नागरिकांनी करून घेतला होता. दरम्यान, या घटनेची चौकशी करून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी शनिवारी, 14 सप्टेंबर रोजी कजगाव […]

Categories
अंधश्रद्धा

सतीची गावपळत

जुलै - २०१९

वाघणगाव हे रत्नागिरी जिल्ह्यातील लांज्यापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेलं गाव. गावची वस्ती 1500. सुमारे 500 माणसं मुंबईत. गावात वाड्या चार, कुणबी समाजाच्या डोंगरेवाडी आणि नेमणेवाडी या दोन वाड्या; एक सुतारवाडी आणि एक बुद्धवाडी. सुमारे 300 वर्षांपूर्वी विशाळगडावरून लांज्याला जाणार्‍या रेडीज नावाच्या खबर्‍याचा खून झाला. त्याचा शोध घेत आलेल्या त्याच्या पत्नीला वाघणगावाजवळ प्रेत सापडलं. अग्निसंस्कारासाठी अपरात्री […]

Categories
अंधश्रद्धा

जादूटोण्याच्या संशयावरून निर्माण झालेला दोन कुटुंबातील वाद गडचिरोली अंनिसने मिटवला

जून - २०१९

सावली तालुक्यातील डोनाडा या गावात श्री पत्रूजी मानगुडदे या कुटुंबाबरोबर त्याच गावातील एका अन्य कुटुंबाकडून जादूटोण्याच्या संशयावरून नेहमी वाद होत असे. दुसर्‍या कुटुंबातील; परंतु त्यांच्याच नात्यात असलेल्या एका (काल्पनिक नाव छगन) मुलाचे आधी लग्न झाले होते. त्याच्या पहिल्या पत्नीने घटस्फोट घेऊन दुसरा घरोबा केला. पहिली पत्नी सुटण्याला कारणीभूत पत्रूजी मानगुडदे परिवार आहे, असे त्यांना टेकेपार […]

Categories
अंधश्रद्धा

सातारा अंनिसने केले एका महिलेला जटामुक्त

जून - २०१९

खरं सांगायचं तर आता बरंच मोकळं-मोकळं वाटतंय… अशा सद्गदित शब्दांत निर्मला लोकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या जटामुक्तीनंतर परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्र, सातारा येथे बोलत होत्या. यावेळी जटामुक्त महिलेबरोबर मुलगी रूपाली ही होती. ती म्हणाली, आईची 21 वर्षांपूर्वी केसं चिकट झाली आणि घरच्यांनी जटा आल्याचे घोषित केले. तेव्हापासून जटाचे ओझे हळूहळू वाढत गेले. अलिकडे आईला […]

Categories
अंधश्रद्धा

धनप्राप्ती व्हावी म्हणून काकानेच दिला ‘प्रतीक’चा नरबळी!

फेब्रुवारी - २०१९

महाराष्ट्रातील आजपर्यंतच्या घटनांचा अभ्यास करून माचणूर (ता. मंगळवेढा) येथील अपहरण झालेल्या प्रतीक शिवशरण (वय 9) याचा नरबळी दिल्याचे पोलिसांनी समोर आणले आहे. दीर्घकालीन आजारातून बरे व्हावे आणि धनप्राप्ती व्हावी, यासाठी प्रतीकचा नरबळी देण्यात आला. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले असून प्रतीकचा काका भारत दगडू शिवशरण व संत दामाजीपंत साखर कारखान्याचा माजी संचालक नानासाहेब […]

Categories
अंधश्रद्धा

अंधश्रद्धेचे बळी

वार्षिकांक - २०१८

प्रयत्नांती परमेश्वर हे देखील कष्टप्रद असते. त्या मानाने जादू, मंत्र–तंत्र, पूजापाठ, उपास, उपासना सारे सोपे असते. दरिद्री, नाडलेल्या जीवाला वास्तवाकडून काहीच आशा नसतात. झटपट प्रश्न सोडविण्याची खात्री देणार्‍या विनाकष्ट भाग्य उजळविणार्‍या, गुप्तधन शोधून देण्याचा दावा करणार्‍या अवास्तव अंधश्रद्धा दारिद्य्राने त्रस्त, थकलेल्या (आणि श्रीमंतीने मस्त माजलेल्या) मनांना विलक्षण भुरळ घालतात. स्वतःचा विचार करताना अघोरी प्रकारांची भीती […]

Categories
अंधश्रद्धा

झाडाचे फळ खाल्ल्यानंतर मुलगा होतो मौलवीचा दावा; अंनिसचे आव्हान

ऑक्टोबर - २०१८

खुलताबाद येथील हजरत शेख शाह जलालउद्दीन गंजे रवा सफरवर्दी दर्ग्याजवळ आशेच्या झाडाचे फळ खाल्ल्यास मुले होतात, असा दावा करणारे मौलाना मोहम्मद समीर मुजावर यांचे ‘स्टिंग ऑपरेशन’ महाराष्ट्र अंनिसच्या शहाजी भोसले, प्रशांत कांबळे, सुनील उबाळे व सुनील चोतमल या कार्यकर्त्यांनी केले. त्याबाबत ग्रामीण पोलिस अधीक्षक आरती सिंग यांना निवेदन दिले गेले व त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई […]

Categories
अंधश्रद्धा

आफ्रिकेतील अंधश्रद्धा

एप्रिल - २०१८

मागच्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग शहरात होणार्‍या ‘ग्लोबल मुव्हमेंट फॉर मेंटल हेल्थ’च्या द्विवार्षिक बैठकीला उपस्थित राहण्याचे मला आमंत्रण आले होते. जगभरातील मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या विविध संस्था-संघटनांची ही शिखर संस्था आहे. आफ्रिकेत जायची संधी मिळाली आहे तर तिचा उपयोग करून तेथील “अंधश्रद्धा आणि विवेकवादी चळवळीची सद्य:स्थिती” याचा देखील अभ्यास करायचे असे मी जातानाच ठरवले […]

Categories
अंधश्रद्धा महिला

मासिक पाळी विषयी पुरातन अंधश्रद्धा

वार्षिकांक - २०१६

आयुर्वेद असो वा आधुनिक वैद्यकशास्त्र असो या दोन्हींचा स्त्रियांच्या आरोग्याकडे अथवा मासिक पाळीकडे बघण्याच्या दृष्टीकोनावर पारंपारिक, धार्मिक विचारसरणीचा फार मोठा प्रभाव आहे. त्यामुळे मासिक पाळी विषयीच्या अंधश्रद्धा पसरण्यास मदतच होते. याचा उहापोह करणारा अरूणा देशपांडे यांच्या ‘एका शापाची जन्मकथा’ या पुस्तकावर आधारित हा लेख. ‘मासिक पाळी’ हा स्त्रीच्या व संपूर्ण मानव जातीच्या पुनरुत्पादन व्यवस्थेचा एक […]

Categories
अंधश्रद्धा

जागतिकीकरण आणि अंधश्रद्धा निर्मूलन

ऑगस्ट - २०१६

अंधश्रद्धांचा महापूर डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी त्यांच्या मृत्यूच्या अगोदर काही महिने हा लेख लिहिला होता. उत्तम कांबळे यांनी संपादित केलेल्या व सुगावा प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ‘जागतिकीकरणातील सांस्कृतिक संघर्ष’ या पुस्तकातील हा लेख आम्ही ‘अंनिवा’ वाचकांसाठी पुन:प्रकाशित करीत आहोत. जागतिकीकरण आणि अंधश्रद्धा निर्मूलन या विषयांची सैद्धांतिक मांडणी डॉक्टरांनी या लेखात केली आहे. समाजजीवनाची गती आणि प्रगतीच्या काही […]