Categories
अघोरी प्रथा महिला

आदिवासी समाजातील कुरमा पद्धतीविरोधात महाराष्ट्र अंनिस करणार प्रबोधन

मे - २०१९

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, धानोरा, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, कुरखेडा, भामरागड तालुक्यातील आदिवासी समाजामध्ये कुरमा पध्दती आढळते. या पध्दतीत महिलांना मासिक पाळीच्या कालावधीत निवासीघरात न ठेवता गोटुल, झोपडी किंवा लगतच्या जंगलात झाडाखाली एकट्याने ठेवले जाते. खाली जमिनीवर झोपविले जाते. या पाच दिवसांत त्यांना घरून जेवण पाठवले जाते किंवा जंगलातील अन्नावर पोट भरावे लागते. असे का वागविले […]

Categories
अघोरी प्रथा महिला

बोहरा समाजातील खतना प्रथा अमानवी – शबनम पूनावाला

जागतिक महिलादिनाच्या अनुषंगाने पुणे शहर अंनिस शाखेच्या महिलांनी ‘बोहरा समाजातील खतना प्रथा’ या विषयावर शबनम पूनावाला यांचे व्याख्यान आयोजित केले होते. शबनम पूनावाला यांचे कुटुंब त्यांच्या सुधारणावादी विचारांमुळे बोहरा समाजातून बहिष्कृत केलेले आहे, तरीसुध्दा त्यांनी आपले सुधारणावादी विचार हिरिरीने मांडणे सोडलेले नाही. गेली काही वर्षे शबनम पूनावाला या बोहरा समाजात असलेल्या खतना प्रथेविरोधात काम करत […]

Categories
महिला मुलाखत

निर्भीड व्हा! – कॉ. उमाताईंचा संदेश

मार्च - २०१८

तीन वर्षांपूर्वी, फेबु्रवारी 2015रोजी कॉ. गोविंद पानसरेंना सनातन्यांनी गोळ्या घातल्या. त्यात त्यांचा अंत झाला. त्यावेळी कॉ. उमा पानसरे यांच्या डोक्यात गोळी घालण्यात आली. दोन गोळ्या खाऊनही त्या वाचल्या; बर्‍या झाल्या आणि पुन्हा सामाजिक कार्यात उतरल्या. महिला दिनाच्या निमित्ताने त्यांची ही मुलाखत. मीना चव्हाण : लाल सलाम उमाताई! कॉ. उमाताई : लाल सलाम! कशी आहेस? मीना […]

Categories
बुवाबाजी महिला

महिला बुवांकडे का जातात?

मार्च - २०१८

महिलांनी महिलांचा घेतलेला शोध! महिलांप्रमाणे पुरुषही बुवा, बाबा, महाराज, ताई यांच्याकडे जातात; पण आपला अभ्यास महिलांपुरता मर्यादित ठेवायचा आणि हा शोध महिलांनीच घ्यायचा, असे ठरवून या ‘पायलट स्टडी’ला म्हणजे प्राथमिक अभ्यासास सुरुवात केली. महिला कार्यकर्त्यांनी आपल्या संपर्कातील, दहा महिलांशी चर्चा करावी, त्यांच्याकडून उत्तरे मिळवावीत आणि नंतर त्याचे एकत्रीकरण करायचे, असे ठरले. ‘महिला बुवांकडे का जातात?’ […]

Categories
महिला

सुटे गिराण

मार्च - २०१८

अशिक्षित बाई ग्रहणाला भीत नाही; पण पदवीधर (तथाकथित शिकलेले) ग्रहणाला घाबरतात, या वास्तवावर आधारित ही सत्यकथा… “आज लवकर आली गं कामाला?” “अवं ती तुमची मैत्रीण, तिचा नवरा नाय का डॉक्टर हाय, ती नाय घरी. तिचं काम नाय आज.” “कोण? सुजाता?” “व्हय, तीच.” “का गं?” “अवं, सकाळी नऊ वाजता गेलती, आता पण जाऊन आली तिच्याकडं, पण […]

Categories
कविता महिला

हे सत्पुरुषा…

मार्च - २०१८

हे सत्पुरुषा, एकदाच बाई होऊन बघ कशी असते, कशी वागते अशीच का वागते, तशीच का बोलते, हसते एकदाच उमगून बघ ॥धृ॥ फार वेळ नको! सहा महिन्यातून एकदा तुझी पाळी होऊ दे, अंगावरून लाल-पांढरं भरपूर जाऊ दे पायाच्या तळापासून केसांच्या मुळा पावत कळा सोसून बघ एकदाच सत्पुरुषा…. ॥1॥ कधी दोन दिवस, कधी तीन चार, पाच, सहा, […]

Categories
महिला

कळस गाठलाय बुवाबाजीनं, गाडू त्याला विवेकानं

जानेवारी - २०१८

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला सहभाग विभागातर्फे महिला सबलीकरण व प्रबोधन अभियान यंदाही ३ ते १२ जानेवारी २०१८ दरम्यान राबवण्यात आले. अभियानाला यंदाचा विषय होता ‘‘बुवाबाजी आणि महिलांचे लैंगिक शोषण.’’ गेल्या वर्षभरात संपूर्ण भारतात अनेक बुवा व बाबा या गुन्ह्यासाठी पकडले गेले आणि त्यांना शिक्षाही झाली. हे वेगवेगळ्या माध्यमांतून प्रसिद्ध झाले, तेव्हा या बुवाबाजीचं गंभीर […]

Categories
महिला

‘झेप – एक भरारी आत्मसन्मानासाठी’

मार्च - २०१७

‘अंनिस’च्या पनवेल शाखेचा अभिनव उपक्रम दि. 3 ते 12 जानेवारी या दरम्यान दरवर्षीप्रमाणे ‘महिला सबलीकरण प्रबोधन अभियान’ राबविण्याचा विचार करीत असताना सारखं जाणवत होतं की, ‘आपण यापलिकडे जाऊन वेगळं काहीतरी करायला हवं.’ म्हणजे महिलांच्या समूहात, त्यांच्या सोयीने त्यांना एकत्र करून कार्यक्रम करतोय, त्याला चांगला प्रतिसादही मिळतोय; परंतु अधिक मोकळं आणि त्यांच्या भावविश्वाला भिडणारं काहीतरी करावं, […]

Categories
महिला

मुस्लिम व्यक्तिगत कायदा आणि मुस्लिम महिलांच्या समस्या

वार्षिकांक - २०१६

नुकतेच शासनाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून मुस्लीम व्यक्तिगत कायद्यातील तलाक, बहुपत्नीत्व व हलाला पद्धती घटनेशी विसंगत असल्याचे व व्यक्तिगत कायदे मुलभूत अधिकारांच्या विरोधात जाऊ शकत नाहीत व ते बदलण्यासाठी भारतीय विधी आयोगाला शिफारसी करण्यास सांगितले असल्याचे स्पष्ट केले. त्या विरोधात धर्मांध मुस्लीम संघटनांनी प्रचंड गदारोळ उठविला आहे. त्या संदर्भातील मुस्लीम सत्यशोधक मंडळाची भूमिका स्पष्ट […]

Categories
अंधश्रद्धा महिला

मासिक पाळी विषयी पुरातन अंधश्रद्धा

वार्षिकांक - २०१६

आयुर्वेद असो वा आधुनिक वैद्यकशास्त्र असो या दोन्हींचा स्त्रियांच्या आरोग्याकडे अथवा मासिक पाळीकडे बघण्याच्या दृष्टीकोनावर पारंपारिक, धार्मिक विचारसरणीचा फार मोठा प्रभाव आहे. त्यामुळे मासिक पाळी विषयीच्या अंधश्रद्धा पसरण्यास मदतच होते. याचा उहापोह करणारा अरूणा देशपांडे यांच्या ‘एका शापाची जन्मकथा’ या पुस्तकावर आधारित हा लेख. ‘मासिक पाळी’ हा स्त्रीच्या व संपूर्ण मानव जातीच्या पुनरुत्पादन व्यवस्थेचा एक […]