महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात येऊन सहा वर्षेपूर्ण झाली, तरीही या कायद्याबाबत प्रशासनातील बरेच पोलीस व न्यायपालिकेतील वकील अनभिज्ञ असल्याचे नांदेड येथील एका घटनेतून अनुभवास आले. विशेष म्हणजे या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत नांदेड चर्चेत होते. कारण या कायद्यांतर्गत पहिला गुन्हा; तोही मुस्लिम बाबाचा नांदेड येथे नोंदविण्यात आला आहे. या […]
कॅटेगरी: बुवाबाजी
भानामती, भूत, हडळ, मुलगाच होईल, मुलगी होणार नाही, अशा भूलथापा मारून लोकांकडून पैसे उकळणार्या विश्वास भालचंद्र दाते (रा. जोशीवाडा, यादोगोपाळ पेठ, सातारा) या ज्योतिषाला मुख्य न्यायदंडाधिकारी ए. व्ही. कस्तुरे यांनी एक महिना सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड; दंड न दिल्यास सात दिवस साध्या कैदेची शिक्षा सुनावली. या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी ः ज्योतिषी […]
औरंगाबाद शहरातील फुलेनगर भागात हिवराळे नावाचे 65 वर्षीय इसम गेल्या कित्येक वर्षांपासून वास्तव्यास आहे. त्यांनी स्वत: तीन लग्नं केली असून ते तिसर्या पत्नीसोबत ज्या प्लॉटवर राहतात, तर त्याच प्लॉटच्या उर्वरित जागेवर दोन्ही पत्नी राहतात. विशेष म्हणजे त्यांची दुसरी पत्नी कामधंदा करून मोठ्या सवतीचा सांभाळ करते, हे कौतुकास्पद आहे..! या दोघींशी आपला काही संबंध नाही व […]
‘पैशांचा पाऊस पाडून तुम्हाला पाच ते सात कोटी रुपये मिळवून देतो,’ असे आमिष दाखवून हैदराबादच्या दोघांची औरंगाबादेतील भोंदूबाबाने त्याच्या साथीदारांच्या मदतीने 11 लाखांची फसवणूक केली. हा प्रकार 4 मे रोजी घडला. भोंदूबाबाने मागणी केलेले पैसे देऊनही पैशांचा पाऊस तर पडला नाहीच; पण दोघांना लाखोंचा चुना लागला. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची राजधानी असलेल्या हैदराबाद येथील सत्यनारायण […]
नागपुरातील पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये मुकेश ऊर्फ बाबा टिल्लू डांगोरे (वय 62, रा. रामनगर) व रजनी माहुले (वय 35, रा. बुद्धनगर) यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली व पोलीस कोठडीत टाकले. तंत्रमंत्र आणि जादूटोणा या उपचाराने पुत्रप्राप्ती करून देतो यासाठी मुकेश ऊर्फ टिल्लू बाबाने साथीदार महिलेच्या मदतीने पीडित महिलेकडून 7 लाख रुपये उकळण्याची […]
ट्रॉम्बे पोलीस सध्या उज्जैन येथील एका भोंदूबाबाचा शोध घेत आहेत, ज्याने मुलाचा कॅन्सर बरा करण्याचा बहाणा करत चेंबूर येथील 41 वर्षीय महिलेवर बलात्कार केला. इतकंच नाही तर त्याने दांपत्याकडून 3.5 लाख रुपये लाटले. कॅन्सरग्रस्त 10 वर्षीय मुलाचा गतवर्षी मृत्यू झाला असून दांपत्याने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे दांपत्य उच्चशिक्षित असून […]
गेली 7 वर्षे बनवडी, ता. कराड जि. सातारा येथील प्रसिद्ध दर्ग्यामध्ये स्वत:कडे असलेल्या दैवीशक्तीच्या आधारे भलामोठा जाड जवळपास 80 किलो वजनाचा लोखंडी लंगर उचलण्याच्या चमत्काराचा बहाणा करून अनेक भाविकांना आपल्या जाळ्यात ओढून एखाद्या डॉक्टरप्रमाणे डिस्क्रिप्शन चिठ्ठी लिहून 25 लिंबे, गोडेतेल व शुद्ध पाण्याची बिसलरी बाटली व त्याखाली देणगीची रक्कम लिहून देणारा भोंदू मांत्रिक सद्रुद्दीन सल्लाउद्दीन […]
मानवी दैनंदिन जीवन विज्ञानाने व्यापले आहे. त्याचबरोबर आधुनिक जीवनशैलीबरोबर आधुनिक बुवाबाजी फसवे विज्ञान वापरून वेगाने सुसाट धावत आहे. यात चुंबकीय उपचार बेड, मिड ब्रेन, रेडिएशन, धनभारित कंपने, वलये, तरंग, अशा क्लृप्त्या वापरल्या जात आहेत. हे समाजापुढे आव्हान आहे. संत तुकारामांचे ‘मुखे बोले ब्रह्मज्ञान। मनी धन अभिमान।’ या अभंगानुसार धनदौलत, संपत्ती, सौख्य यांच्या अतिमोहाचा प्रभाव अविवेकी […]
महिलांनी महिलांचा घेतलेला शोध! महिलांप्रमाणे पुरुषही बुवा, बाबा, महाराज, ताई यांच्याकडे जातात; पण आपला अभ्यास महिलांपुरता मर्यादित ठेवायचा आणि हा शोध महिलांनीच घ्यायचा, असे ठरवून या ‘पायलट स्टडी’ला म्हणजे प्राथमिक अभ्यासास सुरुवात केली. महिला कार्यकर्त्यांनी आपल्या संपर्कातील, दहा महिलांशी चर्चा करावी, त्यांच्याकडून उत्तरे मिळवावीत आणि नंतर त्याचे एकत्रीकरण करायचे, असे ठरले. ‘महिला बुवांकडे का जातात?’ […]
जानेवारीच्या अंकात आपण परभणी जिल्ह्यात जादूटोणाविरोधी कायद्याखाली दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती घेतली. या अंकात बीड जिल्ह्यामध्ये जादूटोणाविरोधी कायद्याखाली दाखल झालेल्या काही गुन्ह्यांची माहिती घेऊ. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव आणि त्यामुळे निर्माण होणारे शोषण यांची घट्ट सांगड या गुन्ह्यांच्या तपशिलातून लख्खपणे समोर येते. जून 2015 मध्ये बीड जिल्ह्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी बुवाबाजी चालत असण्याच्या खबरीवरून सापळा […]