Categories
फसवे विज्ञान

केंद्रिय शिक्षणमंत्र्यांची डिजिटल अंधश्रद्धा

ऑक्टोबर - २०१९

भारत सरकारच्या मानव संसाधन (एच. आर. डी.) मंत्रालयाच्या वेबसाईटवर उच्च शिक्षणाच्या सर्व संस्थांनी भारतात नवज्ञानाच्या निर्मितीवर भर द्यावा व विद्यार्थी संशोधनाचा भुकेला व नव संकल्पनांचा निर्माता व्हावा या अनुषंगाने भारतातील शिक्षणाची दिशा असावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे व ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019’ च्या पहिल्याच पानावर ‘भारताचे शैक्षणिक धोरण हे गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने व्हावे व […]

Categories
फसवे विज्ञान मुलाखत

आपली पुढील लढाई फसव्या विज्ञानाविरोधात असणार!

सप्टेंबर- २०१९

– छद्मविज्ञानाचे अभ्यासक प्रा. स्टेफानो बिग्लिआर्डी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या त्रिदशकपूर्ती समारंभात आंतरराष्ट्रीय विवेकवादी संमेलनाचे एक प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. स्टेफानो बिग्लिआर्डी हे मूळचे इटलीचे असून इफरेन (मोरक्को) येथील अल् अख्वायन विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आहेत. इटली येथील यू.ए.ए.आर. या विवेकवादी संस्थेच्या ‘ल’अतेओ’ या मुखपत्राच्या संपादकीय टीमचे काही आठवड्यांपूर्वीपर्यंत ते सदस्य होते व त्यामध्ये लिहीत होते; […]

Categories
फसवे विज्ञान

विज्ञान परिषदेतील ‘छद्म’विज्ञान

फेब्रुवारी - २०१९

गेल्या महिन्यातील जालंदरच्या 106 व्या भारतीय विज्ञान परिषदेतील (Indian Science Congress) राष्ट्रीय किशोर वैज्ञानिक संमेलनात, न्यूटनला गुरुत्वाकर्षण कसे कळलेच नाही, पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यासाठी तिला आकाशाने कसे चहूबाजूंनी दाबायला हवे, यावर एका वक्त्याने भाषण केले. एका भाषणात, कौरव हे टेस्ट ट्यूब बेबी कसे होते, त्यांचा जन्म ‘स्टेम-सेल’ संशोधनामधून कसा झाला, रावणाकडे 24 प्रकारची विमाने कशी होती, […]

Categories
फसवे विज्ञान

जमिनीखाली दडलंय काय? ‘डाऊझिंग’चे फसवे विज्ञान

सप्टेंबर - २०१८

विज्ञानपूर्व काळात मानव अंधारयुगात वावरत होता. तंत्र-मंत्र, जारण-मारण, गंडेदोरे यांच्या मदतीने दैवी शक्तींना वश करण्याचा त्याचा केविलवाणा प्रयत्न असायचा. तथाकथित अदृश्य आसुरी शक्तींना पळवून लावण्याचे त्यांचे खटाटोप चालायचे; पण अशा विविध अंधविश्वासापासून एकविसाव्या शतकातील माणूस मुक्त झालाय का? गेल्या चारशे वर्षांत विज्ञान आणि तंत्रज्ञानाने घेतलेली गरूडझेप स्तीमित करणारी आहे. अंधारयुगातून बाहेर पडलेल्या मानवाने चंद्रावर पाऊल […]

Categories
फसवे विज्ञान बुवाबाजी

रेडिएशन पॉवरने पैसे ओढणारे भांडे : या फसवणुकीतून एका पैलवानाचा खून

एप्रिल - २०१८

मानवी दैनंदिन जीवन विज्ञानाने व्यापले आहे. त्याचबरोबर आधुनिक जीवनशैलीबरोबर आधुनिक बुवाबाजी फसवे विज्ञान वापरून वेगाने सुसाट धावत आहे. यात चुंबकीय उपचार बेड, मिड ब्रेन, रेडिएशन, धनभारित कंपने, वलये, तरंग, अशा क्लृप्त्या वापरल्या जात आहेत. हे समाजापुढे आव्हान आहे. संत तुकारामांचे ‘मुखे बोले ब्रह्मज्ञान। मनी धन अभिमान।’ या अभंगानुसार धनदौलत, संपत्ती, सौख्य यांच्या अतिमोहाचा प्रभाव अविवेकी […]

Categories
फसवे विज्ञान

वैज्ञानिक गर्भसंस्कार कार्यक्रम चाहूल भारताच्या नाझीकरणाची

जून – २०१७

थोर इतिहासतज्ज्ञ दामोदर धर्मानंद कोसंबींनी प्राचीन काळातील हिरण्यगर्भ विधीबद्दल लिहिलं आहे. एखाद्या राजाला क्षत्रियपद बहाल करण्यासाठी हा विधी ब्राह्मण पुरोहितांकडून केला जात असे . सोन्याच्या मोठ्या भांड्यात राजाला बसवून मंत्र म्हणून बाहेर काढणे, असे त्या विधीचे स्वरूप होते . सोन्याचे भांडे हे गर्भाशय असून आमच्या मंत्रांनी त्यात बसलेल्या व्यक्तीवर क्षत्रिय कुळाचे गर्भसंस्कार आम्ही केले आहेत […]

Categories
फसवे विज्ञान

छद्मविज्ञानाचे मानसशास्त्र

मे - २०१६

अंधविश्वास आणि छद्मविज्ञान विज्ञानाच्या वाटेवरचे आपलं लक्ष विचलित करतात. वास्तव प्रश्नांना सोपी उत्तरे देतात. चिकित्सेला हुलकावणी देतात. श्रद्धेची भीती घालीत, आपल्या अनुभवाचे सोपे आणि फसवे समर्थन करीत मळलेल्या वाटेवरचे भोळसट प्रवासी बनवतात. उडत्या तबकड्या, बर्म्युडा त्रिकोणात नष्ट होणारी विमाने आणि जहाजे, प्लँचेट वरून आपणाशी बोलणारे मृतात्मे, हे सर्व जर खरं ठरलं असतं, तर असं जग […]

Categories
फसवे विज्ञान

‘मेड इन इंडिया’चं काय?

फेब्रुवारी – २०१६

या महिन्यात विज्ञानाशी संबंधित दोन मोठ्या घटना घडल्या. एक म्हणजे मराठी विज्ञान परिषदेचा सुवर्ण महोत्सव आणि दुसरी घटना इंडियन सायन्स काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन. दखल घ्यायला हवी, असं दोन्हींत बरंच काही घडलं. इंडियन सायन्स काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनाचं उद्घाटन परंपरेप्रमाणे पंतप्रधानांच्या हस्ते झालं. पण ही सायन्स काँग्रेस गाजली ती नोबेल विजेते व्यंकटरामन रामकृष्णन यांनी केलेल्या सडकून टीकेमुळे. […]

Categories
फसवे विज्ञान

चक्रावून टाकणारे फसवे विज्ञान

जानेवारी - २०१६

विविध नावांनी ओळखल्या जाणार्‍या फसव्या विज्ञानाचे स्वरुप चक्रावून टाकणारे आहे. कुणी याला छद्म विज्ञान म्हणतात, तर कुणी असत् विज्ञान; तर कुणी नकली विज्ञान तर कुणी भ्रामक विज्ञान. जगात अत्रतत्र सर्वत्र पसरलेल्या या ऑक्टोपसचे प्रताप केवळ भयचकित करणारे नाहीत तर अनेकांच्या मृत्यूला, दु:खाला, शोषणाला आणि नुकसानीला कारण ठरले आहेत. फसव्या विज्ञानाचा पसारा जितका विविध ठिकाणी, तसे […]

Categories
फसवे विज्ञान

टेलिपथी

जून – २०१५

परामानसशास्त्राबद्दल लोकांमध्ये प्रचंड कुतुहल आहे. टेलिपथी परामानसशास्त्रातील एक प्रकार आहे असे या शास्त्राचे समर्थक म्हणतात. कोणत्याही बाह्य साधनाशिवाय केवळ मनाद्वारे एका व्यक्तीचे विचार दुसर्‍या व्यक्तीला कळणे म्हणजे टेलिपथी. टेलिपथी मध्ये कोणत्याही बाह्यतंत्राचा अगर माहितीचा अवलंब केला जात नाही. एका व्यक्तीच्या मेंदूतून निघालेल्या विचारलहरी दुसर्‍या व्यक्तीचा मेंदू स्वीकारतो व त्या व्यक्तीला पहिल्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय […]