खरांगणा पोलिस स्टेशन अंतर्गत वर्धा जिल्ह्यातील आर्वि तालुक्यात येणार्या अकोली जवळील चोरांबा शिवारात 25 एप्रिल रोजी मानवी मृतदेह आढळून आला होता. तपासाअंती हा खुन गुप्त धनाच्या लालसेपायी झालेल्या कासवांच्या वादातून झाला असे तपासाअंती उघड झाले. त्यामुळे 302 चा गुन्हा दाखल झाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वर्धा शाखेच्या वतीने राज्यसरचिटणीस गजेंद्र सुरकार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस स्टेशन […]
कॅटेगरी: अंधश्रद्धा
विदर्भातील भंडारा जिल्ह्यात महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अघोरी विद्या प्रतिबंध अधिनियम 2013 च्या कलम 3 अन्वये दोष सिद्ध झाल्याने भंडारा न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी महेश एस. लोणे यांनी महिला मांत्रिक विश्वकला चिंतामण कांबळे वय 55, पौर्णिमा रवींद्र वाहने(सासू) वय 61 व निर्मल किरण वाहने वय 61 या तिघांनाही कैदेची शिक्षा सुनावली. याप्रकरणी फिर्यादी सौ. राजश्री […]
युवतींची नग्नपूजा आणि पैशांचा पाऊस
पावसाची जोरदार सर पडून गेली की, सगळीकडे पाणीच पाणी होऊन जाते. तसे होण्याचे कारण म्हणजे पावसाच्या रूपाने ढगातून जमिनीवर पडते ते पाणी. अलिकडे काही ठिकाणी गारांचा पाऊस पडतो. परंतु या गारा म्हणजे बर्फ किंवा गोठलेले पाणीच असते. एखाद्या वर्षी समाधानकारक पाऊस न पडण्याची चिन्हे दिसू लागली तर भाविक मंडळी पर्जन्य यागाचे अनुष्ठान करतात. पर्जन्य यागाचा […]
अन् भूत दिसलेच नाही!
अमावास्येची रात्र…. सर्वत्र किर्र काळाकुट्ट अंधार दाटून आलेला…. मध्यरात्र उलटलेली… महामार्गावरील वेगाने जाणारी वाहने…. अचानक एक सुंदर स्त्री अवतरली….तिने गाडी अडविली आणि क्षणात नाहीशी झाली…. हा थरार अनुभवण्यासाठी डोळ्यात तेल घालून बसलेल्या अंनिसच्या कार्यकर्त्यांना पाहता पाहता दिवस उजाडला पण भूत दिसलेच नाही. यावरून पुन्हा एकदा भूत अस्तित्वात नसल्याचे अंनिसच्या कार्यकर्त्यांनी सिद्ध केले आहे. धुळे-सुरत महामार्गावर […]
पुरोगामी म्हणविणार्या महाराष्ट्रात दर दिवशी पुरोगामित्वाचे धिंडवडे काढणार्या घटना घडत आहेत. जादूटोण्याच्या संशयावरून इसमास मारहाण करून मानवी विष्ठा चारण्याचा किळसवाणा प्रकार यवतमाळ जिल्ह्यात वणी तालुक्यातील बोर्डा येथे घडला. विशेष बाब म्हणजे जादूटोणा विरोधी कायद्यासाठी अंनिस पोटतिडकीने लढा देत असतांना सामाजिक न्याय मंत्री ना. मोघेंच्या गृह जिल्ह्यात असा प्रकार घडल्याने मानवाधिकाराचे हनन होऊन माणुसकीचे धिंडवडे काढले […]
एका मांत्रिकाने दिलेल्या सल्ल्यावरून पैशाचा पाऊस पाडण्यासाठी तरूणाने त्याच्या मित्राचा व आईचा नरबळी दिल्याचा प्रकार चाकण येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी चाकण पोलिसांनी त्या तरूणाला अटक केली आहे. त्याला खेड न्यायालयाने 24 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दुर्गाबाई जगताप(वय 50) आणि धनंजय राजू जगताप(वय 22) रा.दोघेही-बतुल आळी, चाकण अशी खून झालेल्या […]
बारा गाड्या कशा ओढल्या जातात?
भुसावळ येथे बारा गाड्या अंगावरून गेल्याने हवालदार ठार, अशी दु:खद बातमी वाचायला मिळाली. एका अंधश्रद्धेनेच ड्युटी बजावणार्या रमेश श्रावण कुंभार या हवालदाराचा बळी घेतला. या घटनेतून तरी आपला समाज अंधश्रद्धेच्या या सामुदायिक मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडेल, आणि डोळस होऊन आत्मचिंतन करेल अशी अपेक्षा आहे. बारा गाड्या ओढण्याचं दैवी बळ प्राप्त झालेला भगत हवालदाराचे प्राण वाचवू […]
संमोहन म्हणजे हिप्नॉटिझम. ‘हिप्नॉटिझम ने उपचार’ अशा मथळ्याखाली अनेक जाहिराती आपण वाचतो. अनेकांनी तर मोठे व्यवसाय यावर उभे केले आहेत. संमोहनाबाबतीत तीन प्रमुख समजुती समाजात पसरल्या आहेत. एक, संमोहनाने डोक्यातल्या पूर्वीच्या स्मृती बाहेर काढता येतात. म्हणजे सर्वच्या सर्व स्मृती या आपणास समजतात. दुसरे, संमोहनाने बाहेर आलेल्या स्मृती अचूक असतात, तीन संमोहनाने खोटेपणा उघड […]
त्सुनामीची लाट, धरण फुटून झालेला हाहा:कार, मोठा भूकंप यासारख्या घटना यामध्ये जीवित व वित्त यांचे प्रचंड नुकसान होते हे खरे; पण अशा घटनांमुळे निर्माण झालेले भय व चिंता अनेक अंधविश्वासांनाही जन्म देतात. 11 सप्टेंबर 2001 चा न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेंड सेंटर वरील हल्ला याला अपवाद नाही. हा हल्ला 9/11 या नावाने प्रसिद्ध आहे. 9/11 नंतर […]
यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील मुरली येथे गुप्तधनाच्या लालसेतून चिमुकलीचा बळी देण्याचा प्रयत्न गावकर्यांच्या सतर्कतेमुळे फसला. त्यात ग्रामस्थांनी दोन आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले; परंतु घाटंजी पोलिसांनी ही घटना गांभीर्याने न घेता आरोपींवर केवळ प्रतिबंधात्मक कारवाई करून मोकळे सोडले. त्यांना जामिनावर सोडून देण्यात आले. त्यामुळे या घटनेबाबत आता वेगवेगळे तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत. प्रत्यक्ष […]