महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पूर्व विदर्भातील जिल्हा भेटींचा कार्यक्रम संपवून परतीच्या प्रवासात गोंदिया ते नागपूरदरम्यान रेल्वेत सहा महाविद्यालयीन तरुणी भेटल्या. चेहरे आणि पेहराव यावरून सर्वच जणी सुखवस्तू घरातल्या दिसत होत्या. आजूबाजूच्या लोकांकडे पूर्ण दुर्लक्ष करत तरुणाई आणि मैत्रीत रमलेल्या. चांगल्या अर्थाने बिनधास्त. माझ्या शेजारी एकजण आणि समोरच्या चार जणींच्या सीटवर पाच जणी. नंतर येणार्या कुणाही […]
कॅटेगरी: संवाद
वाटचाल सुरूच राहील… अखंडितपणे!
आदरणीय डॉक्टर, पुन्हा एकदा आपणाशी पत्रसंवाद. तुम्हाला मागेच म्हटल्याप्रमाणे आम्हा सर्वांचा संवाद तर सुरूच असतो ना डॉक्टर तुमच्याशी. संघटनेत काम करताना अनेकदा असे प्रसंग येतात की, मन आपोआप तुमच्याशी संवादी होतं आणि विचारतं तुम्हाला…. ‘आता तुम्ही राहिले असते, तर काय केलं असतं?’ हे फारच स्वप्नाळू वाटेल डॉक्टर….. पण तुम्ही सोबत असल्याची भावना आजही तशीच आहे […]
हे भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारा!
बाबासाहेब, तुमच्या अनेक रूपांपैकी मला आवडलेले सर्वाधिक रूप म्हणजे तुमचे ‘विद्यार्थी’ म्हणून जगणे. ज्ञानाच्या क्षेत्रांत विविध ठिकाणी मिळेल तिथून ज्ञानार्जन करण्याची तुमची ओढ खरोखरीच संपूर्ण जगाला आदर्शवत. तुमच्या या रुपाचाच आदर्श समोर ठेवून अनेक बहुजन विद्यार्थी आपली जयंती अथवा महानिर्वाणा दिवशी सलग 18 तास आपल्या ग्रंथांचे वाचन करतात. आदरणीय बाबासाहेब, तुम्हाला विनम्र अभिवादन, जयभीम! बाबासाहेब, […]
सावित्रीच्या सर्व लेकींना खुले पत्र
‘सावित्रीच्या लेकींनो’, सविनय सादर प्रणाम, स्त्री-पुरुष समानता मानणारा व शक्य ती कृतीत उतरवणारा मी एक परिवर्तनवादी विचारांचा कार्यकर्ता. आज मुद्दाम तुमच्याशी संवाद साधतोय. 8 मार्च ही तारीख कॅलेंडरवर लागली की, तुम्हा सर्व स्त्रियांचे कर्तृत्व बोलताना माझ्यासारख्या असंख्य परिवर्तनवाद्यांचा कंठ दाटून येतो. तुमच्या ‘गौरवाचे पोवाडे’ आम्ही गातो. स्त्री-पुरुष समानता आचरणात आणा असा मोठ्याने गळा काढतो. गार्गी, […]
राजे, क्षमा असावी…
“महाराज, तुम्हाला जाऊन यंदा 333 वर्षे लोटली. गुलामगिरीत पिचलेल्या बहुजन समाजाला हाताशी धरून तुम्ही सर्व जाती-धर्मियांचे स्वराज्य म्हणजेच रयतेचे राज्य स्थापन केलेत. या स्वराज्याचे सुराज्यात रुपांतर करुन बहुजनांच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व आर्थिक मुक्ततेची ग्वाही फिरवण्याची जबाबदारी आपण विश्वासाने बहुजनांच्या पुढच्या पिढीवर निष्ठेने व विश्वासाने टाकलीत. पण माफ करा महाराज, अजूनही स्वराज्याचे सुराज्यात रुपांतर […]
…तेव्हा तू कोठे होतीस?
बंड्याने चिंटूचे थोबाड रंगवले होते आणि चिंटू रडत घरी आला होता. म्हणून चिंटूची आई जाब विचारण्यासाठी बंड्याच्या घरी गेली होती. चिं. आ. (चिंटूची आई) – अहो बंडूची आई, तुमच्या बंडूला जरा ताकीद द्या ना. त्याने आज पुन्हा आमच्या चिंटूला मारले. बं. आ. (बंड्याची आई) – नाही. आमचा बंडू कुणाला मारत नाही. तो शांतताप्रिय मुलगा आहे. […]
आम्ही बदललो – सोनाली कुलकर्णी
तो एक मॅडसारखा खेळ झाला होता. दप्तर घेऊन शाळेला जाताना किंवा परत येताना एखादं तरी मांजर आडवं जायचंच. आमच्या कॉलनीची रचना फार सुंदर. समोरासमोर बंगल्यांची एक शांत हिरवीगार गल्ली. तिथे कुत्री, मांजरी, फुलपाखरं वेगवेगळे पक्षी यांचा मुक्त संचार असायचा. अशा आनंदी वातावरणात मांजर आडवं गेल्यावर उगीचच ‘बॅडलक’ वाटायचं. मोठ्यांच्या किंवा छोट्यांच्या गप्पांमधून ही संकल्पना मनात […]
सर्व साथी सहकारी मित्रांनो, तसेच हितचिंतक आणि जागृत वाचकहो, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या दिवाळी विशेषांकासाठी महाराष्ट्र अं.नि.स.चा कार्याध्यक्ष म्हणून काय लिहावे, याचा विचार करीत असताना लक्षात असं आलं की, शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घृण खुनानंतर अनपेक्षितपणे ज्या जबाबदार्या अंगावर येऊन आदळल्या, त्याला सामोरे जाताना अक्षरश: मागील दोन–अडीच वर्षे सर्वजण दमछाक होईस्तोवर कामामागे धावत आहोत, आता कोठे त्यातून […]
अस्वस्थ तरूणाईचा पत्रसंवाद
प्रिय मित्रा, कसा आहेस? आज फार अस्वस्थ व्हायला झालं म्हणून तुझ्याशी बोलावस् वाटलं… काल कर्नाटकात डॉ.कलबुर्गी सरांचा खून केला दोघाजणांनी सकाळीच. अगदी डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांना मारलं ना तसंच… काही लोक आता त्यांना बदनाम करणारे मेसेज फिरवत आहेत. तुला खर वाटेल त्यांनी सांगितलेलं… डॉ. कलबुर्गी हे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक तर होते पण […]
गण्याचे निबंधलेखन
मास्तरांना पोरांचे निबंध तसे पाठ झाले होते. गेली पंधरा-सोळा वर्ष मास्तरकी करता करता काही ठोकताळे त्यांनी तयार केले होते आणि ते सहसा चुकत नसंत. तुम्हाला आयुष्यात कोण व्हायचं आहे? यावर ते आठवीच्या मुलांना दरवर्षी निबंध लिहायला सांगत. त्यात मुलांनी काय लिहिलं आहे ते मास्तर डोळे मिटूनही सांगू शकत असंत. कारण त्यांचा विषय जसा ठरलेला होता, […]