9,10 व 11 ऑगस्टला मुलुंड (मुंबई) येथे भव्य अधिवेशन प्रिय साथी, आपणांशी संवाद साधताना अतिशय आनंद होत आहे. या वर्षी महाराष्ट्र अं.नि.स.च्या शाखा, जिल्हा व राज्य या तीनही स्तरांवरील कार्यकारिणीची निवडप्रक्रिया पार पडली. महत्त्वाचे म्हणजे संपर्ण निवड सर्वसहमतीने होण्याची आपली परंपरा कायम ठेवली. लोकशाही पद्धतीने असली, तरीही कोणीही निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला नाही, ही विशेष […]
कॅटेगरी: कार्याध्यक्षांची डायरी
महाराष्ट्र राज्य निर्मितीला 1 मे 2020 रोजी 60 वर्षे पूर्ण होणार आहेत. म्हणजे आताच्या 1 मे 2019 रोजी आपले राज्य साठाव्या वर्षात पदार्पण करणार आहे. मराठी भाषिकांना भाषावार प्रांत रचनेतुन मिळालेल्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासुन साठ वर्षातील वाटचालीचे अवलोकन होणे गरजेचे वाटते. त्याच दरम्यान ऑगस्ट 2019 मध्ये आमच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला देखिल तीस वर्षे पूर्ण […]
‘संवैधानिक लोकशाही प्रजासत्ताका’ची निवडणूक अंधश्रद्धा निर्मूलन संघटित कार्याचा सलग 30 वर्षांच्या वर्धिष्णु वाटचालीचा वस्तुपाठ जगापुढे उभे करणार्या ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ या संघटनेचा कार्याध्यक्ष म्हणून माझ्यात आनंद, अभिमान आणि समाधानाची भावना आहे. त्यात आता आपल्या संघटित कार्याच्या वाटचालीचे त्रिदशकपूर्ती वर्ष साजरे करायचे आपण ठरविले असताना, तर मी विविधांगी भावना, विचार व अनुभवांना सामोरे देखील जातो […]
शासन प्रशासनासह आदिवासी समाजातील शिक्षित व युवांची जबाबदारी महत्त्वाची धडगावलगतच्या वडफळी गावात चिकीबाई या 53 वर्षीय महिलेचा डाकीण ठरवून नुकताच खून करण्यात आला. कुटुंबातीलच असणार्या व नात्याने दीर असलेल्या सुकलाल पावराने आपल्याच वहिनीचा डाकीण ठरवून खून केल्याचे पोलीस जबाबात कबूल केले आहे. भारतीय दंडविधान कलम 302 व महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत खुनाची नोंद धडगाव पोलीस स्टेशनमध्ये […]
नवे पर्व, नवी आव्हाने…
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला 1 मे 2020 रोजी 60 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यासोबतच देशाच्या स्वातंत्र्य वर्षाला 15 ऑगस्ट 2022 रोजी 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानंतर भारतीय प्रजासत्ताकाला 26 जानेवारी 2025 रोजी 75 वर्षेपूर्ण होणार आहेत. या तीनही महत्त्वपूर्ण घटनाक्रमांच्या पार्श्वभूमीवर समाजपरिवर्तनाच्या कामाचा लेखाजोखा मांडला जाणे आवश्यक वाटते. महाराष्ट्र राज्य हे धार्मिक आणि सामाजिक सुधारणांसाठी […]
पौराणिकता, इतिहास, वर्तमान आणि भविष्यवेध या सार्वकालिक स्थितीतील संदर्भांचा साक्षेपी धांडोळा घेतला तर पुन्हा-पुन्हा हेच निदर्शनास येते की, समाजपरिवर्तनासाठी कुठल्याही स्तरावरील हिंसेच्या पुरस्काराला विरोधच केला पाहिजे. कारण आजपर्यंतच्या मानवी उत्क्रांतीतील विकासाच्या वाटचालीत माणसाने उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर हिंसेचा विनियोग कमी-कमी करीत आणलेला आहे. अर्थात, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या विकासाला संरक्षणात्मक सामग्रीच्या संशोधनाने गती दिली असली, तरी मानवी विवेकाने त्याच्यावर […]
महाराष्ट्र अंनिसला सन 2000 पासूनच ‘सॉफ्ट टारगेट’ म्हणून विरोध सुरू होता. त्यासाठी महाराष्ट्र अंनिस करीत असलेल्या विधायक व कृतिशील चिकित्सेचा भाग म्हणून सण-उत्सवांना कालसुसंगत पर्याय देणार्या उपक्रमांविरोधात विखारी, अनैसर्गिक दाव्यांची प्रचार मोहीम राबविली. गणेशोत्सवातील निर्माल्य दान व विसर्जित मूर्ती दान, फटाकेमुक्त दिवाळी, पर्यावरणपूरक होळी-धुलिवंदन-रंगपंचमी, नागपंचमी निमित्त सर्पविज्ञान प्रबोधनपासून आताचे बकरी ईद निमित्त हिंदू-मुस्लिमांचे रक्तदानपर्यंत जवळपास […]
प्रिय साथी, येत्या 20 ऑगस्ट रोजी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटित कामाचे अध्वर्यु शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा पाचवा स्मृतिदिन आहे. त्या आधी म्हणजे 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र अंनिसच्या त्रिदशकपूर्ती वर्षाची सुरुवात होत आहे. या दोन्ही महत्त्वाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही ‘कार्याध्यक्षाची डायरी’ लिहित आहे. मित्रहो, या दोन्ही घटनांत आपण एक महत्त्वाचा टप्पा पार करीत आहोत. आपल्या नेत्याचा खून […]
‘बाप माणूस’ भाई एन. डी. पाटील सरांबद्दल कृतज्ञता किती अन् कशा व्यक्त करायच्या, हा प्रश्न आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कर्म्य कर्तृत्वच तसे राहिले आहे. मी त्यांना तीन दशकांपासून सतत कार्यरत राहिलेले पाहतो आहे. सर्वमान्य, निष्कलंक, अभ्यासू व चिंतनशिल राहून सातत्याने कार्यरत राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून एन. डी. सर आहेत. ग्रामीण पार्श्वभूमीतून स्वत:ला कष्टाने घडवून आपल्या चिकित्सक […]
कृतज्ञता सोहळा
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष असलेले प्रा. डॉ. एन. डी. पाटील सर येत्या 15 जुलै रोजी वयाची 90 वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यांच्या जन्मदिनानिमित्ताने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा विचार आहे. त्यासाठी महाराष्ट्र अंनिसच्या वतीने ‘ज्येष्ठ नेते भाई एन. डी. पाटील कृतज्ञता सोहळा’ 15 जुलै रोजी कोल्हापुरात आयोजित करीत आहोत. एन. डी. पाटील सर केवळ […]