‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा (2019)’ नुकताच प्रकाशित झाला. भारतीय इतिहासाबाबतच्या एका विशिष्ट दृष्टिकोनावर हा मसुदा आधारलेला आहे. ‘नालंदा, तक्षशीला यासारखी विद्यापीठे आपल्याकडे होती, म्हणजेच आपल्या शिक्षणव्यवस्थेचा इतिहास जाज्वल्य आहे आणि त्याचे पुनरुज्जीवन केले पाहिजे,’ असा हा दृष्टिकोन आहे; परंतु ‘बहुजन समाजाला, तसेच स्त्रियांना, साक्षरतेचा आणि शिक्षणाचा हक्क आपल्या शिक्षणव्यवस्थेने नाकारला होता,’ याकडे हा दृष्टिकोन कानाडोळा […]
कॅटेगरी: चिकित्सा
वटपौर्णिमा हे विषमतेला उघडपणे समाजमनात रुजवणारं व्रत आहे. तरीही खेडेगावातील स्त्रिया असोत की, मुंबई सारख्या महानगरातील, त्या अशिक्षित असोत की, अति उच्चशिक्षित प्रत्येक स्त्री त्याच श्रद्धेने ते व्रत करीत असते. यामागे स्त्रियांची नेमकी मानसिकता काय असते, हे समजून घेण्याचा प्रयत्न पनवेल शाखेने वटपौर्णिमेनिमित्ताने केला. पनवेल हा नवी मुंबई या आधुनिक शहराचाच एक भाग. येथे देशाच्या […]
संगीत उपचार आता शालेय अभ्यासक्रमात इ. 11 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आता संगीत-वादन-नृत्य कलांचा समावेश असणारा ‘भारतीय संगीत’ विषय सुरू होत आहे. प्राचीन परंपरा भारताला संगीताची प्राचीन परंपरा आहे. लोकगीतांपासून शास्त्रीय संगीतापर्यंत, आदिवासी नृत्यापासून कथ्थक नृत्यापर्यंत, मंजुळ सनईपासून कान फोडणार्या ढोलाच्या दणदणाटापर्यंत अनेक मार्गांनी इथली संगीत परंपरा संपृक्त झाली आहे. आता त्यात पाश्चात्य संगीतानेही प्रवेश […]
मोक्षाचा बाजार : काशी-वाराणशी
मी कोण? मला आत्मा आहे का? आत्म्याला पूर्वजन्म, पुर्नजन्म आहे का? मृत्यूनंतर त्याचे काय होते? अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यात वेळ खर्च करण्यापेक्षा, आहे हे जीवन सुखी–आनंदी करा. त्यासाठी अष्टांग मार्गाचा अवलंब करा, असे प्रतिपादन गौतम बुद्धांनी केले. आत्मा–परमात्मा, स्वर्ग–नरक सर्व पुरोहितांनी दक्षिणा मिळविण्यासाठी रचलेल्या भाकडकथा आहेत. तेव्हा “भस्मिभूतस्य देहस्य, पुनरागमनम् कुत:” – मेल्यावर, देह जाळल्यावर […]
भेंडवळ भविष्यवाणीला शास्त्रीय आधार नाही
– महाराष्ट्र अंनिसचे स्पष्टीकरण पाऊस, पीक परिस्थिती, हवामान, राजकीय, आर्थिक व सामाजिक परिस्थिती यांचा वेध घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या भेंडवळच्या घटमांडणीच्या भाकिताला कोणत्याही प्रकारचा शास्त्रीय आधार नसल्याचे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एका अभ्यासगटाने जाहीर केले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ या गावातील घट मांडणीची प्रथा बघण्यासाठी व या मांडणीमागील निष्कर्षांचे विश्लेषण करण्यासाठी महाराष्ट्र […]
धार्मिक व्यक्तीचा मेंदू..?
‘न्यूरोसायकॉलॉजिया’ नावाच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधानुसार मेंदूतील एक भाग, प्रिफ्रंटल कॉर्टेक्स, योग्य काम करेनासा झाल्याने धार्मिक मूलतत्त्ववाद निर्माण होतो. मेंदूच्या या भागाला धक्का पोचल्याने माणसाच्या आकलनातील लवचिकता आणि विचारासंबंधीची उदारमनस्कता कमी होते. कुतूहल व सृजनशीलतेवर परिणाम होऊन अपरोक्षरित्या धार्मिक मूलतत्त्ववाद वाढीस लागतो. समाजात पसरलेल्या, खर्या समजल्या जाणार्या, पारलौकिक घटना आणि व्यक्तिरेखा म्हणजेच माणसाच्या धार्मिक श्रद्धा […]
गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताचा जनक कोण? या प्रश्नाचे शाळकरी मुलंसुद्धा ‘न्यूटन’ असेच उत्तर देणार. परंतु हे खोटं ठरवण्याचा ‘महान’ पराक्रम एका शिक्षणमंत्र्यांनी केला आहे. आयझॅक न्यूटनच्या आधी गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचा शोध ब्रह्मगुप्त दुसरा याने लावला असल्याचा वादग्रस्त दावा राजस्थानचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी केला. राजस्थान विद्यापीठात दि. ८ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या एका कार्यक्रमात देवनानी यांनी हा दावा […]
गोमटेश महामस्तकाभिषेक : एक चिंतन
कर्मकांडे नाकारणारे जैनधर्मीय अलिकडे कर्मकांडे करू लागले. महावीरांनी उपदेशलेल्या कर्मानेच मनुष्य उच्च-नीच होऊ शकतो, या विचाराविरुद्धच हे लोक कर्मकांडे करीत आहेत. वैदिक व्यवस्थेच्या प्रभावातून जैन धर्माने ही व्यवस्था स्वीकारली आहे. मग तो यज्ञ असो अगर अभिषेक; पार्श्वनाथांनी ब्राह्मण कर्मठांचा यज्ञ बंद पाडला, विधिपूजा बंद पाडली. हा इतिहास काय सांगतो व आपण काय करतो, हेच यांना […]
औषध नसलेले औषध होमिओपॅथी
होमिओपॅथी हे छद्मविज्ञान आहे. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि इतर विविध देशांत होमिओपॅथीच्या वापराबाबत कडक निर्बंध आणि कायदेकानून आहेत. जगभर झालेल्या डबल ब्लाईंड क्लिनिकल नैदानिक चाचणीत होमिओपॅथीला पुरावे मिळाले नाहीत. होमिओपॅथी डॉक्टर्स व्यवसायात अॅलोपॅथीचा सर्रास उपयोग करतात. खिद्रापुरे हा होमिओपॅथी डॉक्टर. धंदा चालत नाही म्हणून कदाचित असेल, त्याने अविवेकी लोकांची गरज ओळखून स्त्री-भ्रूण हत्येचा मार्ग धरला. […]
‘स्त्री – पापाचे द्वार?’
‘हे असंच चालायचं!’ अशी नकारार्थी मानसिकता व्यक्त करणारी वाक्ये आपण आपल्या बोलीभाषेत नेहमी वापरतो. अशा प्रकारच्या वाक्यांचा समाचार या सदरात घेणार आहोत… ‘स्त्री हे पापाचे द्वार आहे,’ हे वाक्य म्हणजे पुरुषांनी स्त्रीवर मिळविलेल्या विजयाची पताका आहे. ही पताका फडकवत शेकडो वर्षे स्त्रियांना गुलामीत ठेवता आले. या वाक्याचा अर्थ विविध धार्मिक ग्रंथांतून सतत पसरत असतो. अर्थात, […]