सध्याचे युग हे सोशल मीडियाने प्रभावित केले आहे. विविध प्रकारच्या चर्चा, वाद सोशल मीडियात होत असतात. हा मीडिया वापरण्यात तरुण पिढी अग्रेसर आहे. म्हणून अंनिवाने खास तरुणांसाठी असलेल्या या सदरात चालू घडामोडीवरील चर्चात्मक लेख दरमहा देण्याचे ठरविले आहे. मागील महिन्यातील एखाद्या विषयावरील सोशल मीडियातील चर्चा या सदरात आम्ही देत आहोत. युगानुयुगे ‘ती’ आणि ‘तो’ प्रेमात […]
कॅटेगरी: चिकित्सा
हे असंच चालायचं…
‘हे असंच चालायचं!’ अशी नकारार्थी मानसिकता व्यक्त करणारी वाक्य आपण आपल्या बोलीभाषेत नेहमी वापरतो. अशाप्रकारच्या वाक्यावर दरमहा लिहिणार आहेत… अनिल चव्हाण. रस्त्याच्या कडेला एक चहाची गाडी उभी होती. छोटी-छोटी चाके होती म्हणून तिला गाडी म्हणायचे. फिरून व्यवसाय करावा म्हणून परवानगी घेतलेली पण एकाच जागी उभी होती. तिचे रूपांतर आता चारीबाजूंनी मोठ्या खिडक्या असलेल्या टपरीत झाले […]
प्रार्थनेने आजार बरे होऊ शकतात का?
आजही प्रार्थनेने रोग बरा होऊ शकतो, पाऊस पडू शकतो, अडचणी दूर होऊ शकतात, आंधळ्याला दृष्टी येऊ शकते, पांगळा डोंगर चढू शकतो, असे दावे केले जातात व त्याला भुलून फसणार्यांची संख्याही मोठी आहे. तेव्हा या दाव्यापाठीमागे सत्य काय आहे याचा शास्त्रीय उहापोह प्रभाकर नानाटी यांनी या लेखात केला आहे. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील गर्भधारणेवर संशोधन करणार्या तज्ञांनी […]
धार्मिक टीव्ही चॅनल्सचं मार्केट
आजचे आपले सारे व्यवहार जाहिरातबाजीने व्यापलेले आहेत. अगदी धार्मिक व्यवहारही याला अपवाद नाहीत. सर्वच धर्म चढाओढीने यात सामील झाले आहेत. टी.व्ही.सारखे प्रभावी माध्यमही त्यांना उपलब्ध आहे. प्रत्येक धर्माची चॅनेल्स् आज आपल्या धर्मातील कर्मकांडांची जाहिरातबाजी करीत आहेत. एकप्रकारचे अवैज्ञानिक, अंधश्रद्धांना पूरक असे वातावरण निर्माण करीत आहे. या धार्मिक चॅनेलच्या बाजारीकरणाचा उहापोह करणारा हा लेख…. इस्लामी धार्मिक […]
सबॅस्टियन मार्टिनच्या निमित्ताने…
भारतामध्ये ख्रिस्ती धर्मगुरू म्हणून काम करण्यासाठी सेरामपूर(कलकत्ता) सारख्या काही मान्यताप्राप्त ख्रिस्ती विद्यापीठाचीच धर्मशिक्षणाची पदवी प्राप्त असणे गरजेचे आहे. अशा जागतिक मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर धर्मगुरूच पुढे बिशप किंवा मॉडरेटर, आर्च बिशप म्हणून वरिष्ठ पदावर जातात. अशाच बिशप्सला नव्याने धर्मगुरू म्हणून नेमण्यात येणार्या नवीन पदवीधरांना धार्मिक दीक्षा देता येते व त्यांची वेगवेगळ्या सेवांसाठी किंवा चर्चसाठी नियुक्ती करण्यात […]
बुलढाणा (विदर्भ) शहरापासून पिंपळगाव सराई या गावाच्या हद्दीत सैलानी बाबाचा दर्गा उभा आहे. आमचे पत्रकार मित्र नरेंद्र लांजेवार यांनी या दर्ग्याला भेट देऊन तेथील प्रत्यक्ष वस्तुस्थिती या लेखात वर्णन केली आहे. 1984 मध्ये बबिता सोमाणी बलात्कार प्रकरण याच दर्ग्यात घडले. तद्नंतर येथे उपचारासाठी जाणार्या भक्तांची वर्दळ कमी व्हावी, अशी अपेक्षा होती. पण आजही या दर्ग्यात […]
राधे माँ ची दुसरी बाजू
आध्यात्मिक गुरू ‘राधे माँ’ या आजकाल बर्याच चर्चेत आहेत. आज त्या एक सेलिब्रिटी झाल्या आहेत. त्यांच्याविषयी उलटसुलट बातम्या माध्यमात चर्चिल्या जातात. ‘राधे माँ’चा पंजाब ते महाराष्ट्र हा प्रवास कसा झाला… ‘राधे माँ’ ‘संत’ पदापर्यंत कशा पोहोचल्या… या सर्वांचा धांडोळा तरूण पत्रकार राजा कांदळकर यांनी या लेखामध्ये घेतला आहे. आधुनिक आध्यत्माची ही ‘इंडस्ट्री’ कशी चालते? हे […]
रोगोपचार की (हात) चलाखी?
आधुनिक वैद्यकशास्त्रातील उपचार पद्धत (आवैउप) पूर्णपणे विज्ञानावर आधारित आहे, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. तरीसुद्धा पर्यायी उपचार पद्धतीची (पऊप) भलावण करणारे (हिलर्स) डॉक्टर्स जमातीवर तुटून पडतात व आपलीच पद्धत कशी हितकारक आहे, याचे वर्णन करत असतात. या मंडळींच्या मुद्रित व/वा इलेक्ट्रॉनिक माध्यमातील आक्रमक जाहिरातीकडे लक्ष दिल्यास शासनाने सर्व हॉस्पिटल्सना टाळे ठोकून देशाची आरोग्य व्यवस्था यांच्या […]
जपानमधील सनातन पंथ – ओम शिन री क्यो
(या सत्यकथेतील संस्था, घटना वा विचार यांचे भारतातील तशा गोष्टींशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजू नये.) ओम शिन री क्योने हल्ला केलेले एक स्थानक. ‘ओम’ शब्द उच्चारताच आपल्याला कसे पवित्र, दिव्य, उदात्त, वाटते; कारण आपल्या सर्व धार्मिक वा आध्यात्मिक ग्रंथ, पोथ्या, स्तोत्रे, प्रार्थना, यांची सुरुवात ‘ओम’ या एकाक्षरी मंत्राने होते. पण आज मी हकिगत सांगणार […]
सौंदर्य : मिथक आणि वास्तव
गेली दोन-चार दशके आपल्या देशात सौंदर्य हा एक चर्चेचा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. विशेष करून सौंदर्यासाठीच्या शल्यक्रिया जशा मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्या किंवा सौंदर्यप्रसाधन किंवा फॅशनवरचा खर्च वाढू लागला तसा हा मुद्दा महत्त्वाचा बनू लागला आणि त्याचा अभ्यासही केला जाऊ लागला. हा मुद्दा आता ’खास’ राहिलेला नाही तर तो आम जनतेचा मुद्दा बनलेला आहे. सद्गुण, […]