“सरकारी शाळेत विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होत नाहीत अशा शाळांमधून नक्षलवादी दहशतवादी तयार होतात” हे विधान स्वत:ला आध्यात्मिक गुरू म्हणवून घेणार्या श्री श्री रवीशंकर यांनी जयपूर जवळील आदर्श विद्यामंदिर शाळेच्या मैदानावरील कार्यक्रमात केले. या विधानावर अनेक ठिकाणी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या मग या गुरूंनी सारवासारव करणारी उत्तरे दिली. समाजातून ज्या प्रमाणात विरोध व्हायला पाहिजे होता त्या प्रमाणात […]
कॅटेगरी: चिकित्सा
प्रत्येक समाजात अंधश्रद्धा आहेत तशी ती मुस्लिम समाजातही आहे. मागच्या आठवड्यात माझ्या शेजारी अशीच एक मयत झाली. त्यांच्या दोन्ही किडन्या खराब झाल्यामुळे तो मेला. प्रेत दवाखान्यातून घरी आणले. आता वाद चालू झाला. प्रेताचे तोंड कोणत्या दिशेने ठेवायचे? कोणी म्हणायचे किबला म्हणजे मुस्लिमांची नमाज पडायची दिशा पूर्वेकडे आहे; त्या बाजूला तोंड करा. कोणी म्हणाले; हज करायचे […]
हिंदुत्वाची प्रयोगशाळा-नवा कुंभमेळा
छत्तीसगड या राज्यात भा.ज.पा.सत्तेवर असल्यामुळे त्यांनी तिथे हिंदुत्वाची प्रयोगशाळा उभारली आहे. ‘धार्मिक कामकाज’ हे खाते निर्माण करून त्यावर एक मंत्री नेमलेले आहेत. त्यांनी राजीम या गावी भारतातील पाचवा कुंभमेळा घेण्याचे ठरवले आहे. राजीम हे निसर्ग सौंदर्याने नटलेले गाव महानदी, सोन्दूर आणि पैरी या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले आहे. तिथे दरवर्षी माघ पौर्णिमेला मोठी यात्रा […]
‘सत्यशोधक’ एक सत्यशोधन
गो.पु.देशपांडे लिखीत व अतुल पेठे दिग्दर्शित ‘सत्यशोधक’ हे नाटक सातारा व कोल्हापूर या दोन ठिकाणी पाहिले. सफाई कामगारांच्या मदतीने परिश्रमपूर्वक नाटक बसवण्याचे श्रेय लेखक व दिग्दर्शक यांच्या जमेच्या बाजू आहेत. महात्मा फुलेंच्या विचारांचा वेध घेण्याचा प्रयत्न या नाटकात केलेला दिसतो. या अगोदर गो.पु.नी महात्मा फुलेंचे साहित्य इंग्रजीमध्ये रूपांतरीत केले आहे व अतुल पेठे हे सामाजिक […]
आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या प्रेरणेने लक्षावधी लोक आर्ट ऑफ लिव्हिंगची विचारसरणी आणि त्या अनुषंगाने त्यांना शिकविलेली जीवनसरणी आचरणात आणत असून अनेकांची जीवने पूर्णत: बदलली असून ते सुखी आणि आनंदी झाली आहेत हे ऐकून आणि वाचून मी अत्यंत प्रभावित झालो होतो. दोंडाईचे येथेच सहा दिवसांचे प्राथमिक शिबीर आयोजित करण्यात येत असल्यामुळे […]
जैन धर्मियांची काशी : सम्मेद शिखरजी
झारखंड राज्यातील सम्मेद शिखरजी या पर्वताच्या शिखरावरून वीस जैन तीर्थंकर मोक्षास गेले असे मानतात. हे ठिकाण जैन धर्मियांसाठी अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. परंतु आज या तीर्थक्षेत्रावर अक्षरश: अंधश्रद्धेचा बाजारच भरलेला आहे. येथील पवित्र पाणी, चमत्कारिक माती, गांजाची शेती, नवसाला पावणारा पारसनाथ, विविध रंगांच्या कपड्यांचा चमत्कार आणि पवित्र पर्वतावर नक्षलवाद्यांचे बंकर्स या सार्या गोष्टींचा तेथे […]
आध्यात्मिक केंद्र व आध्यात्मिक पुरूष किंवा गुरू यांना भक्तांनी वा शिष्यांनी प्रश्न विचारू नयेत अशी आपली परंपरा. पण इथेच सगळा घोळ आहे. कारण एका खर्या अध्यात्माबरोबर शंभर फसवी अध्यात्मे तयार होतात. म्हणून खरे अध्यात्म व फसवे अध्यात्म यातील फरक समजावून घेणे अनिवार्य होते. प्रतीवर्षी आमच्या विशेषांकात एका आध्यात्मिक केंद्राचा चिकित्सक लेखाजोखा घेतला जातो. यावर्षी नाशिक […]