Categories
आंतरजातीय विवाह

आंतरजातीय विवाहाची चळवळ गतीमान करू या!

मार्च - २०१३

“पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणारी। या, मनामनातून बांधू या एक वाट जाणारी….”             परिषदेचा आशय सांगणारी गाणी इस्लामपूर अंनिसचे कार्यकर्ते मोठ्या जोमाने म्हणत होते. संपूर्ण महाराष्ट्रातून तरूण-तरूणी व कार्यकर्तेलातूरला मुक्ताई मंगल कार्यालयात जमले होते. तरूणाईच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘जोडीदाराची विवेकी निवड राज्यव्यापी युवा संकल्प परिषदेची’ सुरवात दि. 2 फेबु्रवारी 2013 रोजी सकाळी 11 […]

Categories
आंतरजातीय विवाह

एकशे सात आंतरजातीय विवाह लावणारे अंनिस लातूरचे आंतरजातीय विवाह सहाय्य केंद्र

वार्षिकांक – २०१२

          ‘जाती निर्मूलनासाठी आंतरजातीय विवाह’ हे ध्येय समोर ठेवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह करु इच्छिणार्‍या तरुण-तरुणींना पाठबळ देवू इच्छिते. महाराष्ट्र अंनिसची लातूर व कोल्हापूर ही दोन केंद्रे हे काम अत्यंत उत्साहाने आणि शिस्तबद्धपणे गेली 10 वर्षे करित आहेत. या दोन केंद्रांनी असे दोनशे विवाह लावलेले आहेत. या दोन केंद्रांच्या कार्याचा वाचकांना परिचय व्हावा […]

Categories
आंतरजातीय विवाह

जाती विरहित समाजाकडे वाटचाल घडविणारे कोल्हापूरचे आंतरजातीय विवाह सहाय्यता केंद्र!

वार्षिकांक – २०१२

कोल्हापूरचे केंद्र स्थापन होऊन 6 वर्षे झाली आहेत.  6 वर्षात या केंद्राने लावलेल्या विवाहांचे वर्गीकरण पाहिल्यास त्याची व्यापकता लक्षात येईल. एकूण विवाह – 93 लावले. त्यातील आंतरजातीय विवाह – 81 आंतरधर्मीय विवाह – 12  कोल्हापूर जिल्ह्यातील विवाह – 75 कोल्हापूर जिल्ह्यातील बाहेरील विवाह -18 आईवडीलांची मान्यता घेऊन लावलेले विवाह-11 विवाहानंतर पोलिसात तक्रारी झालेले विवाह-09 विवाहानंतर […]

Categories
आंतरजातीय विवाह

आवाहन सहकार्याचे, सहभागाचे, माहिती देण्याचे

ऑगस्ट - २०१२

शोषणमुक्त, समताधिष्ठीत समाज निर्मितीसाठी जात ही अंधश्रद्धा म्हणून व कालबाह्य रुढी-प्रथा-कर्मकांडांना झुगारण्याचा प्रयत्न महाराष्ट्र अंनिसने चालविला आहे. त्याचा कृती कार्यक्रम म्हणून आंतरजातीय, आंतरधर्मिय, सत्यशोधकी, साधे व नोंदणी पद्धतीचे विवाह समितीच्या कार्यकर्त्यांनी मागील पाच वर्षात लावण्याचा द्विशतकी टप्पा नुकताच ओलांडण्यात आला. अतिशय गतिमान, स्पर्धात्मक, चंगळवादी, अस्थिर अशा जागतिक परिस्थितीत अंधश्रद्धेकडे जाण्याचे आकर्षण व कल वाढतो आहे. […]

Categories
आंतरजातीय विवाह परिषद

मालेगाव येथे आंतरजातीय विवाह समर्थन परिषद

मार्च - २०११

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या द्विदशकपूर्ती वर्षानिमित्ताने मालेगाव(जि.हिंगोली) येथील डॉ.अरूण इंगोले सभागृहामध्ये आंतरजातीय विवाह समर्थन परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भीमराव इंगळे हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी संदीप पवार, पोलीस उपनिरीक्षक विष्णूकांत गुट्टे, रामेश्वर अवचार दलितमित्र बबन मोरे, अरविंद साखरकर, शेख समीर, शेख रियाज, बबन बन्सोड, प्रा.डॉ.लता जावळे हे उपस्थित होते. […]

Categories
आंतरजातीय विवाह

लातूर येथे आंतरजातीय विवाह

मार्च - २०११

लातूर शाखेने 65 वा आंतरजातीय सत्यशोधकी पद्धतीचा विवाह सोहळा संपन्न केला. क्रीडा संकुलातील बाबासाहेब परांजपे वाचनालयात वधु विद्या वैजनाथ कल्याणकर व वर विवेकानंद संभाजी आर्य यांचा आंतरजातीय सत्यशोधकी पद्धतीचा विवाह पार पडला.             सत्यशोधकी विवाहाची भूमिका माधव बावगे यांनी सांगून प्रास्ताविक केले. तर गोड आवाजात म.फुलेंनी रचलेल्या मंगलाष्टका रूकसाना मुल्ला यांनी गायल्या. वरास शपथ देण्याचे […]