Categories
परिषद

मानवतावादाच्या विकासासाठी विवेकवाद

सप्टेंबर- २०१९

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या त्रिदशकपूर्ती वर्षानिमित्त आयोजितएकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद मुंबई येथे संपन्न महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या त्रिदशकपुर्तीच्या निमित्ताने ‘मानवतावादाच्या विकासासाठी विवेकवाद’ या विषयावरील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन, परिसंवाद, समारोप आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती अशा चार सत्रांमध्ये ही परिषद संपन्न झाली. विदेश; तसेच देशाच्या कानाकोपर्‍यातून आणि महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांतून जवळपास सहाशेच्या आसपास सहभाग […]

Categories
परिषद भाषण

अस्थिरतेच्या कड्यावर…

सप्टेंबर- २०१९

आपण सध्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात जगत आहोत. ही स्पर्धा बर्‍याच कारणांमुळे संथ; पण निश्चितपणे उग्र रूप धारण करीत आहे. प्राण्यांची तगून राहण्याची, संसाधने बळकावण्याची व आपल्या खास हक्काच्या फायद्याची जागा निर्माण करून ती राखून ठेवण्याची मूलभूत नैसर्गिक प्रवृत्ती आणि तत्सम गोष्टी यास कारणीभूत आहेत. गेल्या हजारो वर्षांत मानवप्राणी आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचे आकलन करण्यास शिकला, निसर्गात […]

Categories
परिषद

पनवेल येथे ‘जोडीदाराची विवेकी निवड’ परिषद

मार्च - २०१९

‘जोडीदाराची विवेकी निवड युवा संकल्प परिषद’ पनवेल येथे 10 फेबु्रवारीला छान पार पडली. नोंदणीपासून लक्षवेधी वातावरण, प्रत्येकाने रुक्ष झाडाला बहर आणण्यासाठी नोंदणीनुसार म्हणजे सिंगल असतील तर पानं आणि जोडीने आले असतील तर फुलं लावायची होती. ही छोटी अ‍ॅक्टिव्हिटी; पण प्रवेश केल्यावर सगळ्यांनी ‘एन्जॉय’ केली. पहिल्या सत्रात पाहुण्यांच्या हस्ते झाडाला फूल लावून उद्घाटन करण्यात आले. स्वागत […]

Categories
जो.वि.नि परिषद

जोडीदाराची विवेकी निवड राज्यव्यापी युवा संकल्प परिषद

फेब्रुवारी - २०१९

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ‘जोडीदाराची विवेकी निवड’ व युवा विभागातर्फे या वर्षीपासून 12 जानेवारी (राष्ट्रीय युवा दिन) ते 14 फेब्रुवारी (आंतरराष्ट्रीय प्रेम दिवस) दरम्यान ‘जोडीदाराची विवेकी निवड राज्यव्यापी युवा संकल्प अभियान’ राबविले जात आहे. या राज्यव्यापी युवा संकल्प अभियानाची उद्घाटन परिषद लातूर येथील मुक्ताई मंगल कार्यालय या ठिकाणी संपन्न झाली. 200 युवकांनी व पालकांनी या […]

Categories
परिषद

‘फिरा’ची 11 वी राष्ट्रीय परिषद विशाखापट्टणम येथे संपन्न

जानेवारी - २०१९

फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशन (फिरा) ची 11 वी राष्ट्रीय परिषद नुकतीच आंध्रकेसरी कलाक्षेत्रात, उक्कुनगरम, स्टील प्लांट, विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश) येथे झाली. यामध्ये देशातील बहुतेक सर्वत्र राज्यांतील 50 हून अधिक विविध प्रतिनिधी सहभागी झाले होते. ‘विवेकवादासमोरील आव्हाने’ या मुख्य विषयावर या परिषदेचे आयोजन मानव विकास वेदिका संस्थेने केले होते. परिषदेच्या उद्घाटन सत्रासाठी प्रमुख पाहुणे चार्वाक तत्त्वज्ञानाचे […]

Categories
परिषद

तैवान येथील मानवतावादी परिषदेत अंनिसचा सहभाग

जानेवारी - २०१९

एशियन ह्युमॅनिझम कॉन्फरन्सची कार्यशाळा 2018 चे आयोजन काऊशिंग, तैवान येथे ह्युमॅनिस्टीक पास्टा कॅरिऑनिझम व ह्युमॅनिस्ट अ‍ॅण्ड एथिकल युनियन (ह्युमॅनिस्ट इंटरनॅशनल) अंतर्गत इंटरनॅशनल ह्युमॅनिस्ट अ‍ॅण्ड एथिकल यूथ ऑर्गनायझेशन (यंग ह्यूमॅनिस्ट इंटरनॅशनल) च्या सहकार्याने दि. 29-30 डिसेंबर 2018 रोजी हॉटेल त्राम, काऊशिंग तैवान येथे करण्यात आले होते. आशिया खंडातील पाच विविध देशांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. […]

Categories
परिषद

अमेरिकेतील अंनिसच्या अधिवेशनात !

वार्षिकांक - २०१८

अमेरिकेतील अंनिसला अंधश्रद्धा निर्मूलन समिती असं न म्हणता ‘कमिटी फॉर स्केप्टिकल इन्क्वायरी’ असं म्हणतात; पण एकूण बाज तोच. परामानसिक आणि छद्मवैज्ञानिक दाव्यांचा यथायोग्य शास्त्रीय मागोवा घेणे हे या संस्थेचे काम. त्यासाठी अनेक तज्ज्ञ इथे काम करतात. असं काम करणार्‍या लोकांचं जाळंच या संस्थेने तयार केलं आहे. असे दावे तत्परतेने खोडून काढावे लागतात. अशी तयारीची टीम […]

Categories
परिषद

धार्मिक दहशतवाद व असहिष्णुता विरोधी राज्यस्तरीय संकल्प परिषद

ऑक्टोबर - २०१८

सध्या देशातील वातावरण अतिशय चिंताजनक आहे. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि इतर विचारवंतांच्या खुनासाठी पकडले गेलेले आरोपी हे कट्टर हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित असल्याचे आढळून आले आहे. ‘आमच्या धर्माविरोधी बोललात, तर तुम्हाला संपवून टाकू,’ ही प्रवृत्ती अत्यंत घातक व संविधानविरोधी आहे. आमच्या विचारांच्या विरोधात बोललात, तर तुम्ही देशद्रोही, सत्ताधारी मंत्री व अनेक नेत्यांची बेताल वक्तव्ये, झुंडशाहीने […]

Categories
परिषद

जातपंचायत कायदा मागणी परिषद पुणे येथे संपन्न

मे - २०१६

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जातपंचायत मूठमाती अभियानांतर्गत पश्चिम व दक्षिण महाराष्ट्रस्तरीय जातपंचायतविरोधी कायदा मागणी परिषद, श्रमिक भवन पुणे येथे दि. 20 मार्च 2016 रोजी संपन्न झाली. परिषदेमध्ये सुरुवातीला रामनाथ चव्हाण यांच्या कथेवर आधरित तोलन नावाचा लघुपट दाखवण्यात आला. भटक्या समाजातील जातपंचायतीकडून अन्याय्य रूढी परंपरांच्या नावाखाली होणारे स्त्रियांचे शोषण या लघुपटात चित्रीत […]

Categories
परिषद

विजयवाडा येथे नववी जागतिक नास्तिक परिषद संपन्न!

जानेवारी - २०१६

विवेकवादाचे शिक्षण देण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावेत – अविनाश पाटील विजयवाडा : सन 2020 मध्ये तरूणांचा देश म्हणून भारताचा नावलौकिक संपूर्ण जगात होणार आहे. या सर्व तरूणांना विवेकवादी विचाराची शिकवण मिळण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावेत असे मत ‘मअंनिस’चे राज्य कार्याध्यक्ष मा. अविनाश पाटील यांनी ‘9 व्या जागतिक नास्तिक परिषदे’च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून व्यक्त […]