Categories
परिषद

यात्रेतील पशुहत्याविरोधी प्रबोधन परिषद नाशिक येथे संपन्न

मार्च - २०१३

            दि.14 फेबु्रवारी 2013 रोजी दुपारी 12 ते 2.30 ह्या वेळेत नाशिकच्या मराठा विद्याप्रसारक समाजाच्या गंगापूर रोडवरील समाजकार्य महाविद्यालयात सदर परिषद संपन्न झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देशमुख यांनी मान्यवरांचे गुलाबपुष्प व पुस्तक देऊन स्वागत केले. त्यानंतर यात्रेतील पशुहत्येबाबत दुष्परिणाम दर्शविणार्‍या पोस्टरचे फलक अनावरण करून, परिषदेचे प्रमुख पाहुणे दै.सकाळ समुहाचे मुख्य संपादक व संचालक उत्तम कांबळे […]

Categories
परिषद

महाराष्ट्र विवेकवाहिनी  व्यसनविरोधी युवा संकल्प परिषद

मार्च - २०१२

            नुकतीच पुणे येथे विवेकवाहिनी राज्यव्यापी व्यसनविरोधी युवा संकल्प परिषद झाली. प्रारंभी महाराष्ट्रातील विविध कॉलेजमधून आलेल्या विवेकवाहिनीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी चळवळीची प्रबोधनांची गाणी सादर केली. महाराष्ट्र विवेकवाहिनीचे राज्य समन्वयक डॉ.हमीद दाभोलकर यांनी परिषदेचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी ‘बलशाली युवा महाराष्ट्रासाठी, चला व्यसन बदनाम करू या’ ह्या मोहिमेमागची पार्श्वभूमी नमूद केली तसेच विवेकवाहिनीने राबवलेल्या व्यसनविरोधी मोहिमेचा आढावा घेतला. […]

Categories
परिषद मानसमित्र

चला मानसमित्र बनूया!

जानेवारी - २०१२

मानसिक आरोग्य व अंधश्रद्धा निर्मूलन राज्यव्यापी प्रबोधन व कृती परिषद चाळीसगांव येथे उत्साहात संपन्न! वेळ सकाळची, आठ-साडेआठची. हवेत बर्‍यापैकी गारठा. स्थळ आयबीएन-लोकमतवरील वृत्तांमुळे चर्चेत आलेला चाळीसगावचा दर्गा. दर्ग्याच्या संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य आणि वातावरणात मलमुत्राचा विशिष्ट वास. दर्ग्याभोवतीच्या परिसरात भटक्यांची पालं पडलेली. त्यांच्या पालाबाहेर चुली पेटलेल्या. चुलीवर शिजत असलेल्या अन्नाचा वासही त्या विशिष्ट वासाबरोबर वातावरणात […]

Categories
आंतरजातीय विवाह परिषद

मालेगाव येथे आंतरजातीय विवाह समर्थन परिषद

मार्च - २०११

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या द्विदशकपूर्ती वर्षानिमित्ताने मालेगाव(जि.हिंगोली) येथील डॉ.अरूण इंगोले सभागृहामध्ये आंतरजातीय विवाह समर्थन परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भीमराव इंगळे हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी संदीप पवार, पोलीस उपनिरीक्षक विष्णूकांत गुट्टे, रामेश्वर अवचार दलितमित्र बबन मोरे, अरविंद साखरकर, शेख समीर, शेख रियाज, बबन बन्सोड, प्रा.डॉ.लता जावळे हे उपस्थित होते. […]