Categories
संविधान

संविधान, निवडणुका आणि वास्तव

ऑक्टोबर - २०१९

‘या, आपण सारी माणसं, एकमेकांचा आदर करूया, एकत्र राहूया, एकत्र विचार करूया, एकत्र काम करूया, सुख-दुःख वाटून घेऊया, एकमेकांचा आधार बनूया, यातून हे आयुष्य, जग अधिक सुंदर आणि आनंदी करूया.’ असा विचार ही मानवी समाजाची निरोगी आणि निकोप प्रेरणा आहे. यासाठी हजारो वर्षे माणूस प्रयत्नशील राहिला आहे. या प्रयत्नांच्या आड येणार्‍या माणसांच्या किंवा समूहाच्या वैयक्तिक […]

Categories
संविधान

सामाजिक न्याय आणि संविधान

ऑगस्ट २०१९

स्वातंत्र्यानंतर भारत हे राष्ट्र कसे असेल, ते कोणत्या मूल्यांच्या दिशेने पुढे जाईल, येथे कोणती व्यवस्था असेल, या विषयी स्पष्ट कल्पना स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये विकसित झाली होती. स्वातंत्र्यानंतर या देशाचे संविधान तयार होताना त्या सर्व कल्पनांना मूर्त रूप देण्याचे काम संविधान सभेने केले. भारत हे राष्ट्र लोकांनी तयार झाले आहे. ते लोकांच्या सुखासाठी आहेे. लोक आनंदी असणं […]

Categories
संविधान

संविधान : संघराज्य रचना आणि काश्मीर प्रश्न

जुलै - २०१९

‘इंडिया, अर्थात भारत, हा राज्यांचा संघ असेल,’ (India, that is Bharat, shall be a Union of States.) या विधानाने भारताच्या संविधानाची सुरुवात होते. 395 कलमांच्या संविधानातील पहिल्या कलमातील हा पहिला भाग. यानुसार राज्यांची निर्मिती झाली. आज भारतात 29 राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आहेत. या सर्वांचं मिळून जे राज्यक्षेत्र बनतं, ते भारताचं राज्यक्षेत्र आहे. […]

Categories
संविधान

भारतातील समाजवाद : विचार आणि वाटचाल

जून - २०१९

माणूस हा संपत्ती निर्माण करणारा प्राणी आहे. जिज्ञासा, विचार करण्याची क्षमता, करून पाहणं, सतत सुधारणा करत नवं कौशल्य आत्मसात करणं यातून त्यानं प्रचंड संपत्ती निर्माण केली. एक प्रकारे पर्यायी जग निर्माण केलं. ही संपत्ती जगणं सुरक्षित आणि सुखकर, सुखमय करण्यासाठी महत्त्वाची आहे, असं त्याच्या लक्षात आलं. अशी संपत्ती निर्माण करण्यासाठी अर्थातच नैसर्गिक साधन संपत्तीची गरज […]

Categories
संविधान

लोकशाही ‘ग्रेट’ आहे…

मे - २०१९

संविधानाने काय दिले… आम्हाला देशाचा मालक केले भारतात होती राजेशाही सरंजामशाही कुठे ठोकशाही इंग्रजांचाही सत्तेचा फास जनसामान्यापुरते नाडन्यास, राबविली सत्ता त्यांनी ती खास जी जी ॥1॥ भारताचे रूप पालटले राजेरजवाडे संस्थानिक गेले संविधानाच्या लेखणीचा वार गुलामगिरीचे भोग झाले पार लोकशाहीचे स्वप्न साकार जी जी ॥2॥ भारतातील लोकांवर प्रदीर्घकाळ असणारी राजेशाही, सरंजामशाही आणि इंग्रजी सत्ता संविधानाच्या […]

Categories
संविधान

संविधान : धर्मस्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्षता

एप्रिल - २०१९

धर्माच्या दोन बाजू ‘धर्म’… एक अत्यंत संवेदनशील बनलेली संकल्पना. इतिहासातील काही हजार वर्षे या संकल्पनेने मानवी जीवनाची सर्व अंगे व्यापून टाकली आहेत. अफाट सामर्थ्याच्या निसर्गासमोर क:पदार्थ असणार्‍या भयभीत माणसाला समूहशक्तीचा दिलासा धर्माने पुरवला. कष्ट आणि दुःख यांनी व्यापलेले माणसाचे आयुष्य साहित्य, संगीत, शिल्प, वाद्य, नाट्य, नृत्य अशा कलांचा आधार बनून रसपूर्ण बनवले. सण, उत्सवांच्या माध्यमातून […]

Categories
संविधान

संविधान प्रास्ताविका… नवराष्ट्राचे ध्येयविधान

मार्च - २०१९

आपला भारत हा प्राचीन संस्कृती असणारा देश आहे. पाच हजार वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृतीचा दाखला आपण यासाठी देतो. पण त्यापूर्वी किमान चार-साडेचार लाख वर्षांपासून माणसाचा वावर या भूमीवर दिसून आला आहे. भौतिक विकास करत करत इथला माणूस हळहळू डोंगरदर्‍यातून, राना-वनातून गावात, नागरी वस्तीत आला. दरम्यान, भोवतालचा अर्थ लावता-लावता त्याने देव आणि धर्म यांना जन्म दिला. त्यांच्या […]

Categories
संविधान

संविधान सभेची निर्मिती

फेब्रुवारी - २०१९

स्वातंत्र्याच्या प्रदीर्घ लढ्यानंतर आपला देश स्वतंत्र होणार हे निश्चित झाले. इंग्लंडमधून तीन सदस्यांचे कॅबिनेट मिशन भारतात आले. स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्याची चर्चा सुरू झाली. ब्रिटीश सरकारने देशाचा कारभार चालवण्यासाठी प्रांतांची रचना केली होती. आंदोलनांचा परिणाम म्हणून त्यांनी टप्प्याटप्प्याने इथल्या कारभारात भारतीयांना सहभागी करून घेण्यास सुरुवात केली होती. 1946 ला या प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या. प्रांतिक […]

Categories
संविधान

संविधान जागर कशासाठी…?

जानेवारी - २०१९

एकात्मतेची शक्ती कोल्हापूर जिल्ह्यातील दिवंगत नेते, देशभक्त रत्नाप्पा कुंभार हे भारताच्या संविधान सभेचे एक सदस्य होते. संविधान निर्मितीमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांच्या एका वाढदिवसाच्या निमित्ताने तेव्हाचे लोकसभेचे सभापती शिवराज पाटील उपस्थित होते. आपल्या भाषणात देशभक्त रत्नाप्पा कुंभारांचा गौरव करताना त्यांनी आपल्या संविधानाचीही महती सांगितली. एखादा देश दीर्घ काळ एकात्म राहण्याच्या कोणत्या शक्यता असू शकतात हे […]

Categories
संविधान

कुरुंदवाड अंनिसची संविधान स्वयंप्रेरणा परीक्षा

एप्रिल - २०१८

‘अंनिस’च्या कोल्हापूर शाखेने जिल्ह्याचा परिसर नजरेसमोर ठेवून 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2017 या कालावधीत संविधान जागर यात्रेचे नियोजन केले. दि. 6 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 8 वाजता संविधान जागर यात्रा कुरुंदवाडच्या सहकारभूषण एस.के. पाटील महाविद्यालय परिसरात दाखल झाली. हा कार्यक्रम सुरू असताना संयोजकांच्यामध्ये एका वेगळ्या विचाराने घर केले होते. आपण संविधानावर विद्यार्थ्यांची एखादी परीक्षाच […]