20ऑगस्ट 2019रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला सहा वर्षे पूर्ण होत आहेत. पहिले नऊ महिने महाराष्ट्र पोलिसांनी खुनाचा तपास केला; परंतु तपासात कोणतीही प्रगती न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्ह्याचा तपास 9मे 2014रोजी सीबीआयकडे सोपविण्यात आला. डॉक्टरांचा खून झाला त्या पद्धतीनेच पुढे 16फेब्रुवारी रोजी कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, त्यात त्यांचा 20फेब्रुवारी 2015रोजी […]
कॅटेगरी: डॉ. दाभोलकर खून तपास
खून तपास प्रतिक्रिया
मारेकरी सापडावेत, ही इच्छाशक्तीच नाही – डॉ. एन. डी. पाटील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांचे मारेकरी सापडावेत, अशी सरकारची राजकीय इच्छाशक्तीच नसल्याचा आरोप ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी केला. गैरकृत्य करणार्या धर्मांध संघटनांवर बंदी घाला, अशी आमची मागणी असतानाही सरकार काहीच करीत नाही. […]
तपासाचा बाँब फुटणार काय?
अंनिसचे कार्यकर्ते कायद्यावर विश्वास ठेवतात. विवेकाने आणि संयमाने प्रतिक्रिया देतात. नुकताच खुनी पकडल्याच्या बातम्या आल्या आहेत; पण खुनी पकडला तरी आम्ही जवाब मागतो आहोत. मास्टरमाईंडपर्यंत कधी पोचणार? खुनी पकडला ही चांगली बाब आहे. त्याबद्दल अभिनंदन; पण मास्टर माईंडपर्यंत पोचले पाहिजे. आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे हवेत. मिळवलेले पुरावे न्यायालयात मांडले पाहिजेत. मगच शिक्षा होणार आणि न्याय […]
खून तपास “जैसे थे”
20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात ‘मॉर्निंग वॉक’ घेताना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेला 20 ऑगस्ट 2018 रोजी पाच वर्षेपूर्ण होत आहेत. पाच वर्षांनंतर देखील डॉ. दाभोलकरांचे खुनी पकडण्यामध्ये तपास यंत्रणांना यश आलेले नाही. डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतर पुरोगामी कार्यकर्ते व विचारवंतांच्या खुनाची मालिकाच सुरू झालेली आहे व जोपर्यंत मारेकरी व त्यामागील […]
गौरी लंकेश यांचे मारेकरी तातडीने पकडा, डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंदराव पानसरे आणि प्रा.कलबुर्गी यांचे मारेकरी आणि त्या मागचे सूत्रधार हे अजून फरार असताना त्याच पद्धतीने गौरी लंकेश यांचा खून होणे ही अत्यंत वेदानादाई गोष्ट आहे. त्यांच्या मारेकर्यांना तातडीने पकडले जावे आणि या खुनाचा डॉ. दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या खुनाशी काही संबंध आहे का […]
शांतता, तपास चालू आहे…
येत्या वीस ऑगस्टला डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घृण खुनाला चार वर्षे पूर्ण होतील. अजून त्यांचे मारेकरी आणि त्या मागचे सूत्रधार शासन पकडू शकलेले नाही. गेल्या चार वर्षांमध्ये तपासाच्या अनुषंगाने घडणार्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर असंख्य लोकांच्या मनामध्ये अशी शंका निर्माण होते आहे की, खरंच या शासनाला डॉ. दाभोलकरांचे मारेकरी पकडण्यामध्ये रस आहे का? कारणे अगदी सहज दिसून येणारी आहेत. […]
महाराष्ट्र अंनिस 20 जुलै ते 20 ऑगस्ट दरम्यान करणार ‘जवाब दो’ आंदोलन… डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाला 20 जुलैला 47 महिने पूर्ण झाली आहेत. कोल्हापूर येथील सत्र न्यायालयाने कॉम्रेड पानसरे यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी समीर गायकवाड याला नुकताच सशर्त जामीन दिला आहे. महाराष्ट्र अंनिस न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करते. परंतु डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि […]
‘20 जून 2016 रोजी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला 34 महिने पूर्ण होऊनही तपास अजून पूर्ण न झाल्याचा निषेध म्हणून ‘महाराष्ट्र अंनिस’तर्फे राज्यभरात तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत. खुनाला जबाबदार सनातन आणि हिंदू जनजागरण समितीवर कायदेशीर कारवाई करून संस्थेच्या फरार साधकांचे फोटो सर्व पोलीस स्टेशनमध्ये लावावेत व त्यांचा त्वरित शोध घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसतर्फे […]
पावणेतीन वर्षांच्या दिरंगाईनंतर सीबीआयने सनातन संस्था आणि हिंदू जनजागरण समितीचा साधक असलेल्या डॉ. वीरेंद्र तावडे याला 10 जून 2016 रोजी अटक केली. सीबीआयने पुणे येथील सेशन कोर्टामध्ये सांगितल्याप्रमाणे डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंदराव पानसरे आणि प्रा. डॉ. एम. एम. कलबुर्गी या तिघांच्याही खुनांच्या तपासामध्ये प्रमुख संशयित म्हणून डॉ. वीरेंद्र तावडे याला अटक झाली आहे. अटकेआधी […]
तपासाचे पुढे काय झाले?
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर तपासाची चक्रे फिरू लागल्याचे सरकारकडून सांगण्यात येते, पण दोन वर्षांनंतरही तपासाची प्रगती काय, याबद्दलचा संभ्रम कायम आहे. तो दूर व्हावा, यासाठी कायदेशीर मार्गाने चाललेल्या प्रयत्नांची माहिती देतानाच, हे प्रयत्न हा दाभोलकरांचे कार्य पुढे नेण्यासाठीच्या संघर्षांचाच एक भाग कसा ठरतो, हे सांगणारा लेख. . 20 ऑगस्ट रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या […]