Categories
पर्यावरण

विश्वाचे आर्त…

जून – २०१५

‘6 जून जागतिक पर्यावरण दिना’ निमित्त विशेष लेख! विश्वाच्या वाळवंटातलं जणू ‘ओअ‍ॅसिस’ तशी, अवकाशातून निळ्या मोत्यासारखी दिसणारी आपली पृथ्वी……. ‘सुजलाम् सुफलाम् मलयज शितलाम् सस्य श्यामलाम्’ अशा स्थितीतून माणसाच्या तथाकथित भौतिक विकासाबरोबर भकास होत चाललेली…. “प्रत्येकाची गरज भागवण्यापुरती नैसर्गिक साधनसंपत्ती पृथ्वीवर नक्कीच आहे, परंतु प्रत्येकाची हाव पुरवण्याइतकी नाही” असं गांधीजींनी पाऊणशे वर्षांपूर्वी म्हटलं होतं, त्याची आठवण […]

Categories
चळवळ पर्यावरण

चंद्रपुरात सामुहिक पर्यावरणपूरक होळी संपन्न

एप्रिल - २०१५

चंद्रपूर येथील ऊर्जानगर वसाहतीत बर्‍याच होळ्या पेटविल्या जात होत्या. त्यात लाकडाचा, टायरचा बराच वापर होत होता. पारंपारिक सण साजरे करीत असताना प्रदूषण सारख्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले जाऊ नये या उद्देशाने म.अं.नि.स शाखा ऊर्जानगर, चंद्रपूर व व्यवस्थापनाने सहकार्याने पर्यावरणपूरक सामुहिक होळीचे आयोजन मागील वर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा करण्यात आले व पर्यावरणावर घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाचे […]

Categories
पर्यावरण

सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट

मार्च - २०१५

गोड चेहर्‍याची 14-15 वर्षाची मुलगी आईच्या गळ्यात पडून लाडे लाडे मम्मी…. असे म्हणत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाहव्वा करत असलेले पाहताना टीव्हीच्या पडद्यासमोर खिळून बसलेल्या 15-54 वयोगटातील स्त्रियांना जाहिरातीतील नॅपकिन्स हवीहवीशी वाटणे स्वाभाविक आहे. परंतु वापरून झाल्यानंतर त्याचे काय करायचे हा प्रश्न संवेदनशील महिलांना नक्कीच भेडसावत राहणार. परंतु हे घाणीतले कपडे जेव्हा कचऱा कुंडीत जातात तेव्हा ती […]

Categories
पर्यावरण

पर्यावरणपूरक गणेश विसर्जनास राज्यात वाढता प्रतिसाद!

ऑक्टोबर - २०१४

ठळक संक्षिप्त आढावा 1) 1992-93 मध्ये अंनिसच्या कोल्हापूर शाखेने केवळ निर्माल्य संकलनाची सुरवात केली. इतर शाखांनीही राज्यभर अनुकरण केले. भाविकांचाही प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. 2) 1996 ला कोल्हापूरमध्येच ‘विसर्जित गणपती दान करा’ उपक्रम पहिल्यांदा सुरू केला. शे-दोनशे गणपती मुर्ती विसर्जनानंतर दान म्हणून मिळाल्या. 1997 मध्ये नाशिकमध्ये 50 गणपती मूर्ती विसर्जनानंतर दान मिळाल्या. त्यांचे विधीवत, भाविकांच्या […]

Categories
उपक्रम पर्यावरण

होळी लहान करा, पोळी दान करा – अंनिसच्या आवाहनास राज्यभर उत्तम प्रतिसाद

एप्रिल - २०१४

पिंपरी–चिंचवड परिसरात सतराशे पुरणपोळ्या दान सण-समारंभ साजरे करताना कालबाह्य रूढी-परंपरांना मूठमाती देऊन होणारे आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय नुकसान टाळायला हवे हाच अंनिसचा उद्देश राहिला आहे. आता तर पर्यावरण संरक्षण हा विषय तर शालेय अभ्यासक्रमाचा भाग झाला आहे. त्यास सर्वजण उत्तम प्रतिसाद देत आहेत. याचा प्रत्यय या वर्षीचा होळी सण साजरा करताना आला. पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात दरवर्षी […]

Categories
पर्यावरण

 पोपटपंची विकासाच्या टायटॅनिक बोटी

ऑगस्ट - २०१३

            सध्याचं विकासाचे धोरण कसं धोकेदायक हे स्पष्ट करणारा हा लेख भविष्य काळातील उर्जेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेतो व विकासाच्या धोरणात काय बदल हवा याचे मूलगामी उपाय सांगतो. वि.पो.: म्हणजे? मग करायचं तरी काय? पेट्रोलियम संपलं की सर्व संपलंच म्हणा की!             होय! सध्याचं तथाकथित औद्योगिकरण, शहरीकरण, महानगरीकरण ही अतिऊर्जा प्रधान जीवनपद्धती कालबाह्य होऊन उद्ध्वस्त […]

Categories
पर्यावरण

 पोपटपंची शहरी विकास आणि वैश्विक विज्ञान : काही अपचनीय सत्ये

जुलै - २०१३

            महाराष्ट्र सरकारच्या अधिकारी गु्रपने विज्ञानग्राम अंकोली(जि.सोलापूर)ला भेट दिली. शेतीच्या क्षेत्रफळापेक्षा घनफळ महत्वाचे हा मुद्दा स्पष्ट झाल्यावर अरूणशी झालेली चर्चा पुढे चालू राहिली. (संदर्भ : मागील अंकावरून पुढे चालू)             देशपांडे सर! तुम्ही शांत व्हा! मला माहिताय की आम्हा खाकी डोक्यांमुळं तुम्ही किती संतापलाय! पण काही मार्ग निघतोय का? काही मार्ग निघाला नाही तर असंतोषाचा […]

Categories
पर्यावरण

पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची अंनिसची त्रिसूत्री

जुलै - २०१३

पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी महाराष्ट्र अंनिस गेली 20 वर्षेकार्यरत आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालय व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी आदेश दिल्यामुळे महाराष्ट्राच्या पर्यावरण विभागानेही 3 मे 2011 रोजी याबाबत स्पष्ट आदेश काढले. मात्र समितीने पर्यावरण मंत्री ना.संजय देवतळे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करूनही त्याची अंमलबजावणी होत नाही असा गेल्या दोन वर्षातील अनुभव आहे.             मुख्य अडचण […]

Categories
पर्यावरण

 पर्यावरण सांभाळा-प्रदूषण टाळा

जून – २०१३

नवीन वाढते शहरीकरण, पाणीटंचाई, पर्यावरणाचा र्‍हास हे प्रश्न बिकट होत आहेत. धुळवडीला पाण्याची नासाडी करणे ह्या प्रश्नाचा यंदा गांभीर्याने विचार केला जात आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली सहा/सात वर्षेसर्वच सण पर्यावरणपूरक साजरे करा असा प्रचार करत आली आहे. त्याला हळूहळू अनेक संघटनांकडून प्रतिसाद मिळू लागला आहे. पाणी ही सर्व प्राण्यांची प्रथम गरज आहे. ते […]

Categories
पर्यावरण संपादकीय

पाणी रे पाणी!

मे - २०१३

पाणी रे पाणी तेरा रंग कैसा या चित्रपट गीतातील पाण्याच्या रंगाचा सवाल महत्वाचा नाही. पण पाण्याच्या बाबतीत सध्या जे भीषण संकट घोंघावते आहे त्याचा गंभीरपणे विचार करायला हवा. नुकताच एक बापू नागपूर व मुंबईत पाण्याचे फवारे शक्तीमान यंत्राने आपल्या भक्तावर उडवून गेला. त्याच्या पाण्याच्या फवार्‍याने भक्तांचे आजार पळून जाणार आहेत म्हणे! दुष्काळी भागात पाण्याविना पशू-पक्षी […]