चंद्रपूर येथील ऊर्जानगर वसाहतीत बर्याच होळ्या पेटविल्या जात होत्या. त्यात लाकडाचा, टायरचा बराच वापर होत होता. पारंपारिक सण साजरे करीत असताना प्रदूषण सारख्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले जाऊ नये या उद्देशाने म.अं.नि.स शाखा ऊर्जानगर, चंद्रपूर व व्यवस्थापनाने सहकार्याने पर्यावरणपूरक सामुहिक होळीचे आयोजन मागील वर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा करण्यात आले व पर्यावरणावर घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.राजू बुरडे साहेब, मुख्य अभियंता यांचे हस्ते होळी पेटवून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली व वाईट प्रवृत्ती म्हणून हुंडाप्रथा, अंधश्रद्धा, स्त्रीभृणहत्या, भ्रष्टाचार, आतंकवाद यांच्या फलकाचे दहन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होळीमध्ये करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौरभ हटकर, युवा सामाजिक वक्ते यांनी पर्यावरणावर व महापुरूषांवर बोलताना महापुरूषांनी पर्यावरणाची काळजी कशी घेतली यांचे संदर्भ देऊन आपल्या धडाकेबाज शैलीने श्रोत्यांची मने जिंकली. यानंतर कवी दिवाकर देशमुख व कवी किशोर मुगल यांनी काव्यवाचन कार्यक्रमात श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. अध्यक्षीय भाषणात मा.राजू बुरडेसाहेब, मुख्य अभियंता यांनी पर्यावरणाचे महत्व सांगून प्रदूषण कमी करणारा उपक्रम म्हणून आयोजकांचे अभिनंदन केले. मंचावर उपस्थित मान्यवर उपमुख्य अभियंता हरणेसाहेब, सोनीसाहेब, घुगेसाहेब, आष्टीकर साहेब, वारजूरकरसाहेब कल्याण अधिकारी, पी.एम.जाधव(कार्याध्यक्ष, अंनिस चंद्रपूर), सौ.बुरडे, सौ.हरणे, सौ.आष्टीकर, सौ.कांबळे हे होते. कार्यक्रमाचे संचालन दुरेंद्र गेडाम यांनी तर आभार प्रदर्शन मुरलीधर राठोड यांनी केले व नंतर होळीमध्ये दान केलेल्या पुरणपोळ्या पांढरी येथे अनाथ मुलांना वाटप करण्यात आल्या. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता नारायण चव्हाण, किसन अरदळे, नरेंद्र रहाटे, लिना चिमूरकर, रमन रायपुरे, देवराव कोंडेकर, शिवाजी नागरे, अनुप पाल, ज्ञानेश्वर बेसेकर, बलवंत ठाकरे, केशव कुळमेथे व मित्रमंडळ यांनी परिश्रम घेतले. विशेष सहकार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर कर्म.सोसायटी व कामगार मनोरंजन केंद्र, ऊर्जानगर यांनी केले.
–पी.एम.जाधव, चंद्रपूर