अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा संगमनेरच्या (जि.अहमदनगर) वतीने पारंपारिक होळी साजरी न करता दुष्ट सनातनी प्रवृत्ती, पर्यावरणपूरक व व्यसनांची होळी दि.6 मार्च 2015 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती पुरस्कार विजेते सोमनाथ कळसकर गुरूजी उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी त्यांनी अशा प्रकारे होळीचा कार्यक्रम घेणे अतिशय स्तुत्य आहे. अलिकडे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर र्हास होतो आहे. त्यामुळे अवेळी पाऊस पडत आहे. हिरालाल पगडाल यांनी व्यसनांमुळे चांगल्या राजकीय आर.आर.पाटील या धुरंधर व्यक्तीला महाराष्ट्राला मुकावे लागले त्यामुळे व्यसनांपासून सर्वांनी दूर राहिले पाहिजे असे सांगितले. डॉ.सोमनाथ सातपुते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. दुष्ट प्रवृत्तींची होळी करणे ही खरी समाजाची गरज बनत आहे. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्यासारख्या व्यक्तीची हत्या होणे हे समाजाला परवडणारं नाही. कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या हे सुद्धा त्याचेच प्रतिक आहे व दोघांचेही मारेकरी सापडत नाहीत ही खेदाची बाब आहे. सर्वांनी या प्रसंगी खेद व्यक्त केला. प्रा.मा.रा.लामखडे यांनीही आपले विचार मांडले. अंधश्रद्धा निर्मूलन समिती केवळ अंधश्रद्धांचे निर्मूलन करीत नाही किंवा कुणाच्या देवावर घाला घालणारी ही समिती नाही तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती अनेक समाजाचे ज्याच्यापासून शोषण होते अशा रूढी, प्रथा, परंपरा यांच्या आहारी जाऊ नका असे सांगते. शोेषण विरहित समाज निर्मितीचे स्वप्न बाळगून पुढील वाटचाल करीत आहे. गणपती दान करा, निर्माल्य दान करा, होळीची पोळी दान करा, आंतरजातीय विवाह(योग्य पती-पत्नीची निवड) यासारखे उपक्रम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अग्रक्रमाने राबविते आहे व समाजामध्ये आगळावेगळा आदर्श निर्माण करण्याचा समितीचा मानस आहे. अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष अॅड.रंजना पगार-गवांदे यांनी प्रास्ताविकात होळीच्या मागचा उद्देश विषद केला. या प्रसंगी भा.गुं.पा.सह्याद्री विद्यालयाचे व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अशोक गवांदे, हरित सेनेचे विद्यालयाचे सर्व विद्यार्थी सचिन खरात, शाखेचे कार्याध्यक्ष काशिनाथ गुंजाळ यांनी सूत्रसंचालन केले सचिव चित्रकार अरविंद गाडेकर यांनी आभार मानले. याप्रसंगी सर्वच मान्यवरांचे शाखेच्या कार्यकर्त्यांकडून सत्कार करण्यात आले या प्रसंगी शाखेचे कार्यकर्तेसोमनाथ जोर्वेकर, हरिभाऊ उगले, अशिफ शेख, रावसाहेब पराड, पंकज जाधव, देव्हारे सर, प्रा.कमलाकर, सायना येनुगुंदल इ.असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
–अशोक गवांदे, संगमनेर