Categories
संतविचार

संतांची विवेकी दिवाळी…

ऑक्टोबर - २०१९

मी अविवेकाचि काजळी । फेडोनि विवेक दीप उजळी । ते योगिया पाहे दिवाळी । निरंतर ॥ देशात मंदीच्या झळा सामान्य नागरिकांना जाणावू लागल्या आहेत. राज्यात काही भागात या वर्षी आलेल्या महापुराने ही दाहकता अधिकच अधोरेखित होत आहे. अर्थात महापुराचे संकटही नैसर्गिक होते की अविवेकी वागण्याचा तो परिणाम होता, यावरही आता चर्चा सुरू आहे आणि त्यात […]

Categories
संतविचार

देवाचा धाक संपविणारी पंढरीची वारी

जुलै - २०१९

“टाळ-मृदंगाच्या गजरात वेगवेगळ्या संतांच्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने त्या सावळ्या विठूरायाला भेट्ायला निघाल्या आहेत. जात-धर्म, स्त्री- पुरुष, गरीब- श्रीमंत हे सर्व भेद गळून पडले आहे. अवघा रंग एक झाला, असे संपूर्ण वातावरण आहे. ही वारी म्हणजे सामाजिक समतेचे जगातील सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणावे लागेल. विशेष म्हणजे देवाबद्दलचा पूर्वी जो धाक होता, तोही संपून देव सोयरा, सखा, जीवलग […]

Categories
संतविचार

दुष्काळात यज्ञ घालून पाऊस पाडता येत नाही

जून - २०१९

संपूर्ण महाराष्ट्र सध्या दुष्काळामध्ये होरपळत आहे. अशा दुष्काळाच्या काळातही काही लोकं सर्वसामान्य लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांची लूट करण्याचा प्रयत्न करतात. या लुटीचे प्रमुख माध्यम आहे यज्ञ. पाऊस पडत नसेल, तर यज्ञ करावा, असा सल्ला ही मंडळी देत असतात; परंतु वारकरी संतांनी मात्र यज्ञाच्या माध्यमातून होणार्‍या शोषणातून समाजाला मुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. योग-याग करून […]

Categories
ज्योतिष संतविचार

संत म्हणतात, भविष्य एक थोतांड

मे - २०१९

विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. आकाशातील ग्रह आणि तारे ही ग्रहमाला आहे. त्याचा भविष्याशी काहीही संबंध नसल्याचे विज्ञानाने स्पष्ट केले आहे, तरीही आजही त्याच ग्रहांच्या आधारांवर भविष्यं सांगितली जात आहेत. रवी, अर्थात सूर्य नावाचा ग्रह असल्याचे सांगून त्याच्या आधारे भविष्य सांगितले जाते. मात्र सूर्य हा ग्रह नसून तो तारा हा आहे, हे आता स्पष्ट झालेले […]

Categories
संतविचार

शेंदरी हेंदरी दैवते…

एप्रिल - २०१९

अंधश्रद्धेच्या विरोधात वारकरी संतांनी मोठ्या प्रमाणात जनजागरण केल्याचे दिसून येते आहे. त्यातून समाज मोठ्या प्रमाणात जागृत होत होता; किंबहुना अधिक धाडसाने विधान करायचे झाले तर महाराष्ट्रात ज्या चळवळी उभ्या राहिल्या, त्यांच्या मुळाशीसुद्धा संतविचार होता, असे म्हणायला मोठा वाव आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अनेक व्याख्यानांत संतांची वचने पाहायला मिळत होती. संतांनी विवेकाचा अखंड जागर केला. […]

Categories
संतविचार

विवेकी विचारांची पायवाट

मार्च - २०१९

वारकरी चळवळ जातिभेद आणि कर्मकांडाच्या अंधारात चाचपडणार्‍या समाजाला वारकरी संतांनी ज्ञानदीप दाखविला. त्यावेळच्या व्यवस्थेच्या विरोधात बंडाचे निशाण फडकवीत असतानाही त्यांच्या भाषेत क्रोध नव्हता, तर करुणा होती. हजारो वर्षांच्या जातिभेदाच्या भिंती धडाधड पाडून टाकीत असताना त्यांनी कुठे क्रांतीची भाषा केली नाही. सामाजिक विषमतेच्या आजारावर उपचार करीत असताना त्यांनी वरून मलमपट्टी केली नाही; अंतरंगात शिरून बदलाची प्रक्रिया […]

Categories
संतविचार

मीरा प्रभू रैदास शरण ले

मार्च - २०१८

मीराबाई संत रैदासांची शिष्या होती. आपण गुरूचा खूप शोध घेतला, अखेर संत रैदासात मला माझा गुरू मिळाला. त्यांच्या त्यागाला, ज्ञानाला मी शरण गेले, अशा आशयाची मीराबाईंची अनेक पदे आहेत. अशा पदांच्या आधाराने लोक रैदासांना मीराबाईंचे गुरू म्हणून मानत आलेले आहेत. काहीजणांचे मत आहे, मीराबाई आणि राणी झांशी या वेगवेगळ्या आहेत; पण बहुतेक अभ्यासकांचे मत आहे, […]

Categories
संतविचार

कह रैदास खलास चमारा

जानेवारी - २०१८

आपल्या अभंगाच्या पदातून, आपल्या गीतातून, सामाजिक वास्तवतेवर प्रहार करणारे संत रैदास (संत रोहिदास) आपल्या अभंगाच्या पदाचा, गीताचा शेवट ‘कह रैदास चमारा’ अशा ओळीने करत. असा जातिवाचक उल्लेख काही जण सहजपणे घेतील, तर काहीजणांना तो आक्षेपार्ह वाटेल. पण या ओळीच्यामागे रैदासांची जी भावना आहे, ती सामाजिक वास्तवाची त्यावेळेची आणि आजची स्थिती लक्षात घेऊनच समजून घेतली पाहिजे. […]

Categories
संतविचार

विवेकवादी साहित्यिका : बहिणाबाई चौधरी

वार्षिकांक - २०१७

शंभर वर्षांपूर्वी जेव्हा अजूनही गावात बैलगाडी हेच प्रवासाचे साधन होते, रॉकेलचा दिवा प्रकाशासाठी वापरला जात होता, घरातल्या जात्यावरच धान्य दळावे लागत होते आणि आजारपणावर देवाचा अंगारा हेच एकमेव औषध होते, अशा काळात एक अंगठेबहाद्दूर महिला नवर्‍याच्या मागे कच्ची–बच्ची सांभाळत समाजाचा अनुभव उघड्या डोळ्यांनी मांडते आहे, दैववाद, ज्योतिष आणि मायावादही नाकारते आहे आणि बजावते की, अरे […]

Categories
संतविचार

अनुभव मंटप – बसवप्रणित उपासना स्वातंत्र्य

ऑक्टोबर – २०१७

शतकानुशतके शूद्र, पंचम व स्त्रियांना देवालयात प्रवेश नव्हता. त्या देवालय व्यवस्थेवर बहिष्कार घालून, पुरोहितशाहीला चपराक देत बसवण्णांनी इष्टलिंगरुपात प्रत्येकाच्या जवळच देव दिला आणि देहचि देवालय असल्याचे ठामपणे सांगितले. बहिष्कृत समाजाला धार्मिक उपासनेचे स्वातंत्र्य इष्टलिंगाच्या रुपात मिळाले. शरण षण्मुख शिवयोगी म्हणतात : ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र कोणीही असो, कोणत्याही जातीत जन्मलेला असो, गुरुकारुण्य प्राप्त करून अंगावर […]