भारतीय समाज धर्मभोळेपणाने कर्ज काढून चारधाम, बारा ज्योतिर्लिंग, अमरनाथ यात्रा, गंगास्नान करण्यात धन्यता मानतो. या मनोवृत्तीचे विडंबन करताना महात्मा बसवण्णा म्हणतात- जलाशय पाहुनी डबकी मारतात वृक्षाला पाहुनी प्रदक्षिणा घालतात आटणारे पाणी, वाळणार्या झाडांना आपलेसे करणारे तुम्हाला कसे जाणतील, कुडलसंगमदेवा. (ब. व. क्र. 580) गंगास्नानाने अथवा वटवृक्षाला प्रदक्षिणा घातल्याने सत्यदर्शन होणार नाही. बाह्य अवडंबरापेक्षा अंतरंगशुद्धी महत्त्वाची […]
कॅटेगरी: संतविचार
अनुभव मंटप – देहचि माझे देवालय
या चराचर सृष्टीत ईश्वराचे अस्तित्व ओतप्रोत भरले आहे, असे सांगणार्या धर्मांनी त्या ईश्वराला मंदिर, मठ-पीठ, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा या चौकटीत बंदिस्त केले. ही सर्व त्या-त्या धर्माची प्रार्थनास्थळे म्हणून निर्माण झाली असली, तरी कालांतराने त्या व्यवस्थेत अनेक विकृती निर्माण होऊन ही ठिकाणे पुरोहित-पुजारी, मठाधीश, पाद्री, मुल्ला-मौलवी यांची सत्ताकेंद्रे बनली. जिथे विश्वकल्याणासाठी प्रार्थना केली जायची, त्या केंद्रांतून […]
अनुभव मंटप – शरणांचा पंचांगावर प्रहार
जातिव्यवस्थेशी झुंजणारे महात्मा बसवण्णा यांच्या पुरोगामी वचनांची ओळख वाचकांना या सदरातून करून देत आहोत… भारतीय संस्कृती म्हणजे फक्त वैदिक संस्कृती असा आभास निर्माण करून भारतीय संस्कृतीचे नित्य स्तोत्रपठण करणार्यांनी इथल्या बहुसंख्य भारतीय समाजाला ज्ञानापासून वंचित ठेवून त्यांचे निरंतर शोषण करण्यासाठी ज्या असंख्य युक्त्यांची शृंखला तयार केली, त्यातील एक मुख्य कडी म्हणजे पंचांग होय. अगदी जन्मापासून […]
जातिव्यवस्थेशी झुंजणारे महात्मा बसवाण्णा यांच्या पुरोगामी वचनांची ओळख वाचकांना या सदरातून करून देत आहोत… भारतीय समाजातील वैदिक व्यवस्थेचा डोलारा पवित्र व अपवित्रतेच्या थोतांड कल्पनांवर उभा आहे. अगदी पंचमहाभुतांमध्येही त्यांनी पवित्र-अपवित्रता प्रस्थापित केली आहे. ब्राह्मण राहत असलेली भूमी पवित्र आणि शूद्र राहत असलेली भूमी अपवित्र, आचमनाचे जल पवित्र आणि शौचाचे जल अपवित्र, यज्ञातील अग्नी पवित्र आणि […]
जातिव्यवस्थेशी झुंजणारे महात्मा बसवाण्णा यांच्या पुरोगामी वचनांची ओळख वाचकांना या सदरातून करून देत आहोत… मध्ययुगीन कालखंडात भारतीय समाज हा जातिवर्णव्यवस्थेच्या चातुर्वर्णात विभागला गेला होता. त्यातही विभिन्न जाती, उपजातीत समाज छिन्नविछिन्न झाला होता. ‘जात’ ही मानवनिर्मित व्यवस्था असून ती केवळ एका विशिष्ट समुदायाचे हितसंबंध जोपासण्यासाठी, समाजात भेद पसरविण्यासाठी अस्तित्वात आणली गेली व टिकविण्यात आली. याचे सखोल […]
जाती व्यवस्थेशी झुंजणारे म. बसवाण्णा यांच्या पुरोगामी वचनांची ओळख वाचकांना या सदरातून दरमहा करून देत आहोत. अग्नीस देव मानून घरी विप्र करितसे हवन, घर त्याचे पेटता आग भडकून नहाणीचे पाणी नि रस्त्याची धूळ टाकून बोलवितो सर्वांना बोंब ठोकून कूडलसंगमदेवा निंदितात हो, वंदायचे विसरून॥ महात्मा बसवण्णा हे मध्ययुगीन कालखंडात समग्र क्रांती घडवून आणलेले युगपुरुष होत. विशेषत: […]
पुणे – कपाळी अष्टगंध, डोईवर केशरी पटका, हाती टाळ अन् मुखी लाडक्या विठोबाचे नाव… हरिनामाची पताका फडकवत मृदंगाच्या निनादावर जागर चालला होता… विवेकाचा, विचाराचा अन् संघर्षाचा. नोकरीवर जाण्याच्या गडबडीतही गुरुवारी सकाळी प्रत्येक जण थोडासा थबकत होता… उत्सुकतेने क्षणभरासाठी का होईना ऐकत होता. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला गुरुवारी सहा महिने पूर्ण झाल्याने पुरोगामी परंपरेची आठवण करून […]