Categories
वेचक-वेधक

सत्यसाईबाबांकडे मिळाला महाखजिना!

जुलै - २०११

सत्यसाईबाबा यांच्या पुट्टपर्थी येथील आश्रमातील एक खोली उघडण्यात आल्यानंतर त्यात 98 किलो सोने, 317 किलो चांदी आणि 11 कोटी 56 लाख रूपयांची रोख रक्कम मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. नोटा मोजण्यासाठी सुरवात झाली त्यासाठी तीन मशीन्सचा वापर करण्यात आला. यामध्ये मोठ्या प्रमाणावर विदेशी चलन असून ही सर्व रक्कम पाच जीपमधून स्टेट बँकेत भरण्यासाठी नेण्यात आल्याचे सांगण्यात आले. […]

Categories
वेचक-वेधक

चंद्रास्वामींना 25 लाखांचा दंड

जुलै - २०११

‘फेमा’ कायद्याचा भंग केल्याप्रकरणी स्वयंघोषित गुरू चंद्रास्वामी यांनी आठवडाभरात 25 लाख रूपयांचा दंड भरावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. चंद्रास्वामी यांनी ‘फेमा’ कायद्यातील तरतुदींचा भंग केल्याचा ठपका ठेवून सक्तवसुली संचालनालयाने त्यांच्याविरोधात अनेक खटले दाखल केले आहेत.             सुटीकालीन खंडपीठाचे न्या.बी.एस.चौहान व न्या.स्वतंत्रकुमार यांनी हा आदेश जारी केला. चंद्रास्वामी आणि त्यांचे साथीदार विक्रमसिंग यांनी चार व्यवहारांमध्ये […]

Categories
वेचक-वेधक

आम्ही धर्म मानत नाही!

जुलै - २०११

एकीकडे धर्माच्या नावाखाली एक होण्याची हाक दिली जात असतानाच आम्ही धर्म मानत नाही; म्हणून ‘धार्मिक’ही नाही, असं सांगणार्‍या लोकांची संख्या या जगात वाढत आहे. यासंदर्भात केल्या गेलेल्या पाहणीतूनच ही बाब समोर आली आहे. ‘मी अमक्या एका धर्माचा आहे; मात्र वृत्तीनं मी धार्मिक नाही. यामुळं मी रूढार्थानं धर्म मानत नाही’ असं सांगणार्‍यांची संख्या खूपच मोठी आहे. […]

Categories
वेचक-वेधक

वेधक – वेचक

जून – २०११

हसूरचंपूकरांची धार्मिकतेला मुरड!             वेगळे उपक्रम राबवून सतत चर्चेत असलेल्या हसूरचंपू(ता.गडहिंग्लज, जि.कोल्हापूर) ग्रामस्थांनी यंदा महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धारानिमित्त आपल्या धार्मिकतेलाच मुरड घातली. महालक्ष्मी यात्रेत हजारावर बोकडांचा बळी देण्याची इथली दीडशे वर्षांची परंपरा यंदा ग्रामस्थांनी खंडित करून शाकाहारी यात्रा केली. यामुळे गावचे 25 ते 30 लाखांच्या खर्चाची बचत झाली आहे. या विधायक उपक्रमाची चर्चा सुरू आहे. लैंगिक […]

Categories
वास्तुशास्त्र वेचक-वेधक

वास्तुशास्त्राबद्दल भंपक सल्ले देणार्‍या पाहुण्याला घराबाहेर हाकला!

मे - २०११

तुम्ही पै पै करून साठवलेल्या पैशातून घर बांधता. घर पाहायला हौसेनं अनेकांना बोलावता; पण घरी आलेला एखादा अतिहुशार पाहुणा ‘घराचा दरवाजा या दिशेला का? बाथरूम मध्येच का ठेवले? खिडकीला उभे गज का बसवले? देवघर एवढे लहान कसे? असले काही तरी विचारून तुम्हाला भीती घालू लागला तर अशा पाहुण्याला लगेच घराबाहेर काढा. कारण असली माणसे तुम्हाला […]

Categories
वेचक-वेधक

तीर्थक्षेत्रे की कत्तलखाने?

मे - २०११

भारतातील अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी काही विशिष्ट दिवसांना कमालीचे धार्मिक महत्व असते. त्या दिवशी अक्षरश: लाखो लोक त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जमतात. हल्ली तर दळणवळणांच्या सुलभ सोयीमुळे या तीर्थक्षेत्रांवर प्रचंड गर्दी होत आहे. मात्र त्या प्रमाणात त्या तीर्थक्षेत्रांवरील सुविधा अत्यंत अपुर्‍या असतात. त्यामुळे तेथील त्रोटक सुविधांवर प्रचंड ताण पडून विविध अपघात, रोगराई पसरते. पण त्यापेक्षाही तेथील गर्दीमुळे […]

Categories
वेचक-वेधक

मुख्यमंत्र्यांची श्रद्धा की अंधश्रद्धा?

मार्च - २०११

कर्नाटक राज्यात सध्या मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचे पद धोक्यात आलेले आहे. विरोधक काही त्यांना शांत बसू देत नाहीत. यावर येडीयुरप्पांनी योग्य तो मार्ग काढावा. अशी अपेक्षा असताना ते सध्या अंधश्रद्धेच्या आहारी गेले आहेत. त्यांच्या गुरू महाराजांनी सांगितल्यानुसार ते त्यांच्यावर आलेले संकट म्हणजे काळीजादू अथवा करणी आपल्यावर केली आहे असे समजत आहेत. विरोधक स्वत: सत्तेवर येण्यासाठी आपल्यावर […]

Categories
वेचक-वेधक

  ‘लोकमत’ विरूद्धचा सनातनचा खटला कोर्टाने फेटाळला

मार्च - २०११

‘दै.लोकमत’विरूद्ध अब्रूनुकसानीचा आरोप करून दहा कोटी रूपयांची नुकसान भरपाई मागणार्‍या सनातन संस्थेचा खटला फोंडा येथील वरिष्ठ श्रेणी न्यायालयाने फेटाळून लावला आहे.             ‘वैफल्यामुळे आश्रमातून साधक गायब, सनातनचा करिश्मा’ या मथळ्याखाली 7/11/2009 रोजी दै.लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे आपली बदनामी होत असल्याचे सांगून सनातनने ‘दै.लोकमत’चे संपादक राजू नायक, तसेच दैनिकाच्या प्रकाशकांविरूद्ध अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला होता. या […]

Categories
वेचक-वेधक

मुलीस पळवून नेणार्‍या साधूला दोन वर्षे कारावास

मार्च - २०११

पुसद(जि.यवतमाळ) येथे अल्पवयीन मुलीस पळवून नेणार्‍या महादेव संपत लोखंडे(वय 65 रा.टिटवन) या कथित साधूला जलदगती न्यायालयाचे न्यायाधीश ए.एम.वैद्य यांनी दोन वर्षे सश्रम कारावास व दोनशे रूपयांची दंडाची शिक्षा ठोठावली.             आरोपी महादेव संपत लोखंडे याची मागील दहा वर्षांपासून फिर्यादीच्या चिखली कॅम्प येथील घरी ये-जा होती. काही दिवस तो मुक्कामी राहत असे. 24 जानेवारी 2010 रोजी […]

Categories
वेचक-वेधक

जादूटोण्याच्या संशयावरून महिलेवर प्राणघातक हल्ला

मार्च - २०११

            श्रद्धेचे रूपांतर अंधश्रद्धेत झाले तर घरच नव्हे तर समाज उद्ध्वस्त होतो. असाच काहीसा प्रकार नागपूर जिल्ह्यातील भांडेवाडी परिसरात उघडकीस आला. जादूटोण्याचा आरोप लावून वस्तीतील काही लोकांनी एकत्र येऊन एका महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना कळमना पोलीस स्टेशन अंतर्गत घडली.             नागपूर येथील भांडेवाडी, हनुमाननगर येथील मायाताई ताराचंद डोंगरे हिच्यावर जादूटोणा करते, तुला काळी जादू […]