Categories
प्रेरणा

आम्हाला तुमचा अभिमान वाटतो

जून – २०१३

            मिलिंद देशमुख हे सध्या महाराष्ट्राचे प्रधान सचिव आहेत. परंतु ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाशी राज्य पातळीवर समिती निर्माण होण्यापूर्वी पुणे येथे जे काम चालू होते तेव्हापासून संबंधित आहेत. ते राहतात देहू रोडला त्यांचे काम चालते पिंपरी चिंचवड शाखेबरोबर परंतु तरीही गेली 25 वर्षे ते पुणे शहर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचेही अत्यंत क्रियाशील कार्यकर्ते आहेत. […]

Categories
प्रेरणा

शून्यातून उदयाला आलेला

जानेवारी - २०१३

मअंनिस चे ज्येष्ठ कार्यकर्ते माधव बावगे, लातूर यांना महाराष्ट्र फौंडेशन अमेरिकेचा ‘समाजकार्य’ पुरस्कार नुकताच त्यांना पुणे येथे प्रदान करण्यात आला. रोख पन्नास हजार रुपये व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल बावगे सरांचे अंनिसकडून हार्दिक अभिनंदन! माधव विश्वनाथ बावगे हे लातूरमधील पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीशी निगडीत असलेले एक झपाटलेले व्यक्तिमत्त्व. चाकूर तालुक्यातील […]

Categories
प्रेरणा

 म.फुलेंची पहिली विद्यार्थिनी मुक्ता साळवे

ऑगस्ट - २०१२

            क्रांतिवीर लहुजी साळवे यांचे आजोबा लहुजी साळवे  त्याकाळी  आजोबाचे नांव नातवाला  ठेवत असल्याने नातू व आजोबा यांची नावे सारखी आली असावीत. त्यांचे वडील राघोजी साळवे यांच्याकडे  पुरंदर  किल्याच्या संरक्षणाची जबाबदारी होती. साळवे घराण्याचे अतुलनीय शौर्य पाहून त्यांना शिवाजी महाराजांनी ‘राऊत’ ही मानाची पदवी दिली होती. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पेठपुरंदर या गावात साळवे घराणे […]

Categories
प्रेरणा

अभिनंदनीय अनुकरणीय – दोन वेगळ्या नोंदीसाठी हे लेखन

मार्च - २०१२

चाळीसगाव येथील डॉ.श्याम महाजन यांचा मुलगा कुणाल याचा विवाह अलिकडेच संपन्न झाला. त्या प्रसंगी त्यांनी विवाह निमंत्रण पत्रिकेत पुढील उल्लेख केला होता. ‘अशा आनंद सोहळ्यात आहेर द्यावासा वाटणे अगदी स्वाभाविक असते, पण आपली उपस्थिती आणि शुभाशिर्वाद इतकंच आम्हाला हक्कानं हवं आहे. आहेरावर जो खर्च आपण करणार होता ती रक्कम आपली इच्छा असल्यास सोबत नमूद केलेल्या […]

Categories
प्रेरणा

रक्तदानातून जात गळाली- माणुसकीला विज्ञानाची जोड मिळाली : एक प्रांजल अनुभव

मार्च - २०१२

          वंश, धर्म आणि जात यांची बंधने किती चिवट असतात! जपानमध्ये घडलेली एक घटना आठवते. एका बाईंना गंभीर आजार बरा होण्यासाठी रक्ताची गरज होती. डॉक्टरांनी तसा सल्लाही दिला होता. पण बाईंनी दुसर्‍या व्यक्तीचे रक्त स्वीकारण्यास नकार दिला; कारण ते तिच्या धर्माविरूद्ध वर्तन झाले असते. अखेर बाईंना जीव गमवावा लागला. प्रख्यात गणिती रामानुजन यांना क्षय झाला […]

Categories
प्रेरणा

एस.के.शिंदे यांचे व्यसनमुक्ती कार्य प्रेरणादायी

सप्टेंबर - २०११

एस.के.शिंदे हे परांडा, जि.उस्मानाबादचे नागरीक. व्यवसायाने माध्यमिक शिक्षक. आण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचाराविरोधी आंदोलनातून प्रेरीत होऊन त्यांनी आपल्या ऑडिटर व शिक्षक या दोनही नोकरीचा मुदतपूर्व राजीनामा दिला. आदर्श गाव योजनेसाठीच्या अटींपैकी व्यसनमुक्तीचे क्षेत्र त्यांना आवडले व त्यांनी या क्षेत्रात पूर्ण वेळ कार्यास सुरवात केली. अवती भोवती शेकडो कुटुंबे व्यसनामुळे उध्वस्त होत होती. ग्रामसभा, व्यसनी कुटुंबाशी प्रत्यक्ष […]

Categories
कायदा प्रेरणा

चासनळी ग्रामसभेने केला अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा

जून – २०११

अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा अद्याप प्रलंबित असला तरी कोपरगाव तालुक्यातील चासनळी ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन गावाकरीता स्वतंत्रपणे अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा तयार केला आहे. चासनळी येथे मागील महिन्यात एका तरूणाचा पौर्णिमेच्या दिवशी अंधश्रद्धेतून बळी गेला. पोलीस यंत्रणेनेही ह्या घटनेचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केला नाही. इतरही अंधश्रद्धा गावात वाढत आहे. यावर उपाय म्हणून गावकर्‍यांनी विशेषत: महिलांनीच तोडगा काढला. गावातील […]

Categories
उपक्रम प्रेरणा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सलग अभ्यास

जून – २०११

अंनिसच्या उस्मानाबाद शाखेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर व म.फुले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून दि.12 एप्रिल 2011 रोजी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात सकाळी सहा ते रात्री बारा असा 18 तास सलग अभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.             या कार्यक्रमाचे उद्घाटन तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.डी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ.प्राचार्य रमेश दापके होते. 18 तासांत डॉ.जर्रा […]

Categories
प्रेरणा

दिशाहीन वास्तुशांतीला फाटा देऊन दिशादर्शक गृहप्रवेश

जून – २०११

अनिष्ट रूढी परंपरेत जखडलेला विज्ञान युगातील माणूस आजही वास्तुशांतीसारख्या कर्मकांडात अडकलेला असताना या दिशाहीन रूढींना फाटा देऊन सर्व समाजाला दिशादर्शक असा गृहप्रवेशाचा कार्यक्रम अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब येवले यांनी यशस्वी करून दाखविला आहे. निमंत्रण पत्रिकेवर पुरोगामी विचाराचे संत इतिहासातील थोर व्यक्तींचे छायाचित्रे छापून शेवटच्या पानावर त्यांचे विचार छापले आहेत. सकाळी […]

Categories
प्रेरणा बालविभाग विशेष

आगळी वेगळी फॅन्सी ड्रेस स्पर्धा : अमेयने केला बुवाबाजीचा भांडाफोड

मे - २०११

डॉ.तृप्ती शहा या दुसरीत शिकणार्‍या अमेयच्या आई. एक सुजाण पालक म्हणून त्यांनी अमेयला अंधश्रद्धेच्या प्रभावापासून मुक्त करण्याचा विचार केला. याचाच भाग म्हणून शाळेच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत त्यांनी अमेयला चमत्काराचा पर्दाफाश करणार्‍या कार्यकर्त्याचा रोल दिला. या आगळ्या वेगळ्या रोलचा प्रभाव एवढा जबरदस्त होता की, अमेयला या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. अमेय व त्याची आई यांच्या या […]