अंनिसच्या उस्मानाबाद शाखेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर व म.फुले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून दि.12 एप्रिल 2011 रोजी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात सकाळी सहा ते रात्री बारा असा 18 तास सलग अभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.डी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ.प्राचार्य रमेश दापके होते. 18 तासांत डॉ.जर्रा काझी यांचे व्यक्तिमत्व विकास, पारडे यांचे इंग्लिश संभाषण कौशल्य या विषयावर व्याख्याने झाले. समारोप जिल्हाध्यक्ष अॅड.देविदास वडगावकर यांच्या उपस्थितीत झाला. त्यांनी वाचन व विवेक याविषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात प्रास्ताविक तृप्ती अंधारे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शितल वाघमारे यांनी केले. या उपक्रमात विविध वयोगटातील सुमारे 150 मुला-मुलींनी सहभाग नोंदविला.
अंनिसच्या उस्मानाबाद शाखेच्या वतीने दि.8 मे 2011 रोजी जिल्हा स्काऊट गाईड कार्यालयात ‘चमत्कार शिका शिबीर’ आयोजित करण्यात आले होते. या वेळी चमत्काराला विरोध का याची सविस्तर मांडणी अॅड.देविदास वडगावकर यांनी केली. वेगवेगळे चमत्कार, मुकुंदराजे निंबाळकर, रविंद्र केसकर, अॅड.रविंद्र मैदाड यांनी शिकविले. शिबीरासाठी 20 तरूणांनी सहभाग दिला होता. शिबीर यशस्वी करण्यासाठी शितल वाघमारे यांनी परिश्रम घेतले.
–अॅड. देविदास वडगावकर, उस्मानाबाद