Categories
विशेष

विविध देशांतील विज्ञान शिक्षण

वार्षिकांक - २०१७

विज्ञान युगातील विज्ञानाच्या शिक्षणाची विविध देशांत काय अवस्था आहे, याचा शोध लेखिकेने या निबंधात परिश्रमपूर्वक घेतलाय. सध्याची विज्ञान शिक्षणपद्धती आनंददायी आहे का, पोटभरू याचे उत्तर या लेखातून मिळेल. विज्ञान शिक्षण घेतलेली मंडळी देखील अंधश्रद्धाळू का याचे उत्तर त्यांच्या शिक्षणात मिळते, असा लेखिकेचा निष्कर्ष आहे. अमेरिकेसारख्या देशात विज्ञान शिक्षणाची अवस्था आनंददायी नाही. शिक्षणक्षेत्राची जगभरातील चिकित्सा आपल्याकडील […]

Categories
विशेष

बुद्धिवाद आणि अध्यात्मवाद

मे - २०१७

बुद्धिवाद हा तर्कशास्त्रावर आधारलेला असतो आणि अध्यात्मवाद कल्पनेवर आधारलेला असतो, हा या दोहोंतला मोठा फरक आहे. ज्ञानाची कसोटी तर्कशास्त्र आहे. अध्यात्मवादात काही ज्ञान आहे आणि ते अंत:स्फूर्तीने मिळते, असा भ्रम धार्मिक लोकांत आढळतो. अंध:स्फूर्ती याला काही अर्थ असला, तर तो इतकाच की, कधी कधी जाणूनबुजून कोणताही विचार केल्याशिवाय आपल्या मनात एखादी कल्पना येते आणि ती […]

Categories
विशेष

निरीश्वरवादाचा आधुनिक उद्गाता : रिचर्ड डॉकिन्स

वार्षिकांक - २०१६

रिचर्ड डॉकिन्स म्हणजे निरीश्वरवादाचा आधुनिक उद्गाता. आपल्या लिखाणातून, व्याख्यानातून, ब्लॉग, ट्वीटर, वेबसाईट अशा सर्व माध्यमांतून धर्मावर मर्मभेदी हल्ला हे त्याचं वैशिष्ट्य. अत्यंत आक्रमकपणे, अत्यंत नेमका हल्ला यासाठी डॉकिन्स प्रसिद्ध. अशा या डॉकिन्सचा थोडक्यात परिचय डॉ. शंतनु अभ्यंकरांनी अंनिवाच्या वाचकांसाठी करून दिला आहे. ब्रिटिशांची वसाहत असलेल्या केनियातील त्याचा जन्म (26 मार्च 1941). आपल्या ‘अ‍ॅन अ‍ॅपेटाईट फॉर […]

Categories
विशेष

आफ्रिकेतील गृहयुद्धात होरपळलेली मुलं

वार्षिकांक - २०१६

जंगल संपत्ती व खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या आफ्रिकी देशांना वसाहतवादी देशांनी मनसोक्त लुटले. त्या देशातील जनतेला धर्म, टोळ्या अंधश्रद्धा यांच्या विळख्यात जखडून मागास ठेवले व गेली अनेक दशके सतत आपआपसात झुंजत ठेवले. या गृहयुद्धाचे सर्वात भीषण परिणाम आफ्रिकेतील लहान मुलांवर झाले. ही लाखोच्या संख्येतील मुले अक्षरशः देशोधडीला लागली. त्यांच्या भीषण दुःखाची कहाणी सांगत आहेत डॉ. […]

Categories
विशेष

अंधारातील वाटा

जुलै - २०१६

अ‍ॅड. अतुल आल्मेडा हे मानवता हाच धर्म मानणारे विचावंत आहेत. येशू ख्रिस्तांचे मानवता, प्रेम आणि विवेकवाद यांचा प्रसार धर्मनिरपेक्ष राहून ते करत आहेत. पूज्य साने गुरुजी ही प्रेरणा मानणारे आल्मेडा ‘अंधारातील वाटा’ या त्यांच्या प्रस्तुत ग्रंथात परखडपणे धर्मचिकित्सा करतात. आजच्या समाजातल्या विविध धर्मांमध्ये कर्मकांडांचा झालेला सुळसुळाट त्यांना अस्वस्थ करतो; त्यामुळे प्रसंगी स्वकियांवर, त्यांच्यातल्या अंधश्रद्धेवर ते […]

Categories
विशेष

हे महाराष्ट्र देशा…

मे - २०१६

1 मे, महाराष्ट्र दिनानिमित्त विशेष लेख हे महाराष्ट्रा, तुझ्या निर्मितीला आता जवळजवळ 56 वर्षे झाली. श्रमिकांच्या लढ्यातून उभा राहिलेला हा कष्टकर्‍यांचा महाराष्ट्र 109 जणांच्या बलिदानातून साकार झाला. अजूनही हा लढा संपला नाही. ‘बेळगाव-कारवार सहित संयुक्त महाराष्ट्र,’ ही घोषणा आजही इथला मराठमोळा महाराष्ट्रीयन देत असतो. हे महाराष्ट्रा, तुझ्या निर्मितीवेळीच ‘महाराष्ट्र मराठ्यांचा की मराठीचा?’ असा सवाल उभा […]

Categories
विशेष

सापेक्षता : अर्थ आणि अनर्थ

मार्च - २०१६

1905 साली आइनस्टाइनने विवक्षित सापेक्षता सिद्धांत प्रसिद्ध केला. त्यानंतर दहा वर्षांनी म्हणजे 1915 साली त्याचा व्यापक(जनरल) सापेक्षता सिद्धांत प्रसिद्ध झाला. या सिद्धांताचे मानवी संस्कृतीवर भौतिक आणि नैतिक क्षेत्रात दूरगामी परिणाम झाले. सध्याच्या जागतिक परिस्थितीचा विचार करता गुरुत्वलहरीपेक्षाही हे परिणाम समजून घेणे अधिक महत्वाचे आहे आणि हाच या लेखाचा विषय आहे. सापेक्षतावादाचा आशय : विवक्षित सापेक्षता […]

Categories
विशेष

कुटुंबप्रमुखरूपी छत्र हरवले

ऑगस्ट - सप्टेंबर - २०१४

20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी 8.30 ची वेळ मी कॉलेजला जाण्यासाठी आवरले होते, तर खाली पार्किंगमध्ये गाडी स्वच्छ करायला गेले होते. उदय वर आल्यावर माझ्या रूममध्ये आले आणि कसेबसे खाली बसले. मी विचारले ‘काय झाले? चक्कर येत आहे का?’ उदय काहीच बोलत नव्हते मी पुन्हा विचारले ‘काय झाले?’ तेव्हा सर हळूच म्हणाले, डॉक्टर गेले. माझ्या […]

Categories
विशेष

आपुलकीचं नातं

ऑगस्ट - सप्टेंबर - २०१४

2003 साली जानेवारी महिन्यात मी हर्षदा बरोबर रजिस्टर पद्धतीने विवाहबद्ध झालो. त्यातून वाचलेले 21 हजार रूपये मी बँकेत एफ.डी.करून ठेवले. लग्नानंतर माझे वडील, मी, बायको व आई एकत्र राहू लागलो. हे सर्व लिहिण्याचे कारण डॉक्टर व डॉक्टरांचे कुटुंबीय यांचं मोलाचं सहकार्य व साथ आम्हाला सतत लाभली. कुटुंब म्हटलं की, भांडणे, रागलोभ, अडीअडचणी आल्याच. पण माझ्या […]

Categories
विशेष

कार्यकर्त्यांना मदतीचा हात

ऑगस्ट - सप्टेंबर - २०१४

डॉ. नरेंद्र दाभोलकर संघटनेचे काम करणार्‍या कार्यकर्त्यांचा कुटुंबाला कायम वेगवेगळ्या प्रकारे मदत करीत असत. एखादा कुटुंबप्रमुख ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबातील प्रत्येकाकडे जातीने लक्ष देतो. त्यांची सुख-दु:खे आजारपण याकडे लक्ष देतो. त्याचप्रमाणे डॉ. दाभोलकरसुद्धा संघटनेत काम करणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्यांकडे कायम लक्ष देत. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला ते आपल्या कुटुंबातीलच एक आहेत असेच वाटायचे. याचा प्रत्यय आम्हाला सुद्धा आला […]