Categories
कायदा जादूटोणा

अमरावती नरबळी प्रकरणातील आरोपींना जादूटोणाविरोधी कायद्यानुसार जबरी सजा

दि. 7 ऑगस्ट 2016 रोजी संत शंकर महाराज आश्रम, पिंपळखुंटा (जि. अमरावती) येथील विद्यामंदिरमध्ये इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेला पीडित बालक कु. प्रथमेश अवधूत सगणे, वय 11 वर्षेहा आश्रमातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या वरील मजल्यावर गंभीर जखमी अवस्थेत मिळून आला होता. त्याचे गळ्यावर अज्ञात इसमांनी धारदार शस्त्रांनी मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पीडिताचे मामा यांचे फिर्यादीवरून […]

Categories
कायदा ज्योतिष

ज्योतिष धंद्याला ग्राहक संरक्षण कायदा लागू होतो

मे - २०१९

अंनिसने गतनिवडणुकांप्रमाणे यावर्षीच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अचूक भाकीत सांगणार्‍या ज्योतिषांकरिता 21 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेले आहे; परंतु गेल्या वेळीप्रमाणे यावर्षीही कोणत्याही ज्योतिषाने अंनिसचे आव्हान स्वीकारलेले नाही. यावरून खरे तर ज्योतिषांचा धंदा हा फसवणुकीचा व जनसामान्यांचे शोषण करणारा आहे, हे स्पष्ट झालेले आहे. तरीसुद्धा अनेक लोक ज्योतिषांकडे जाऊन त्यांना स्वत:चे कष्टाचे पैसे देऊन आपले भविष्य (अंधपणाने) […]

Categories
कायदा

जितके दिवस तपास लांबणार तितके दिवस आपल्या लोकशाहीला धोका

जुलै - २०१८

7 सप्टेंबर 2017 ला बेंगलोर येथे गौरी लंकेश यांचा खून करण्यात आला. गौरी लंकेश या एक कार्यकर्त्या-पत्रकार होत्या. त्यांचे वडील पी. लंकेश हे कन्नड मधील प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक होते. गौरी आपल्या वडिलांचे ध्येयवादी पत्रकारितेचे काम नेटाने पुढे नेत होत्या. धार्मिक कट्टरीकरणाच्या विरोधात निर्भयपणे गौरी लंकेश आवाज उठवत होत्या. ‘लंकेश पत्रिके’च्या अंकाचे काम संपवून घरी […]

Categories
कायदा

सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा प्रशिक्षकांचे प्रशिक्षण

जून - २०१८

राज्यस्तरीय पहिली कार्यशाळा संपन्न 3 जुलै 2017 पासून सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याचा अंमल सुरू झाला. आपल्या देशात असंख्य कायदे आहेत; परंतु त्यांचा प्रचार, प्रसार व अंमलबजावणी प्रभावीपणे न झाल्याने कायद्यामागचा उद्देश सफल होत नाही. जादूटोणा विरोधी कायदा; तसेच सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा हे दोन्ही कायदे महाराष्ट्र अंनिसच्या चळवळीच्या रेट्यातून व गरजेतून झाले आहेत. या कायद्याच्या प्रचार, प्रसार […]

Categories
कायदा

सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा राज्यव्यापी अंमलबजावणी मोहिमेची उत्साहात सुरुवात

जून - २०१८

पहिला टप्पा – 1 ते 12 मे 2018 समाजसुधारकांचा वसा आणि वारसा जोपासणार्‍या महाराष्ट्रात मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी जे काही प्रयत्न झाले, त्यात ‘जातपंचायत’ व त्या आधारे दिले जाणारे न्यायनिवाडे यांना धक्का देण्याचा प्रयत्न किंवा त्याविरुद्ध बंड, मोर्चा, धरणे, आंदोलन, शासनाला निवेदन, जिल्हाधिकार्‍यांना घेराव असा प्रयत्न झाल्याचेही वाचनात नाही. अशा पार्श्वभूमीवर 3 जुलै 2017 रोजी महाराष्ट्र शासनाकडून […]

Categories
कायदा निवेदन

शासनाच्या नव्या प्रस्तावित आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह कायद्यासंबंधी अंनिसच्या मागण्या

जून - २०१८

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने खालील मागण्यांचे निवेदन मा. न्यायमूर्ती सी.एल.थूल यांना सांगली, कोल्हापूर व लातूर शाखेच्या वतीने देण्यात आले. प्रती, मा. न्या. सी. एल. थूल अध्यक्ष, आंतरजातीय विवाह विशेष ड्राफ्टिंग समिती, महाराष्ट्र शासन, मुंबई. विषय : आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह प्रोत्साहन अडचणी व सूचनांबाबत….. महोदय, उपरोक्त विषयास अनुसरून विनम्रपणे कळविण्यात येते की, महामानव डॉ. बाबासाहेबांचे विचार मोठ्या […]

Categories
कायदा

कर्नाटकाच्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यातील वैशिष्ट्यपूर्ण तरतुदी

फेब्रुवारी - २०१८

महाराष्ट्रात डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मृत्यूनंतर राज्य सरकारने जादूटोणाविरोधी कायदा मंजूर केला. त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास मअंनिसने भाग पाडले. हा कायदा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रात देशासाठी पथदर्शक होता. महाराष्ट्रात हा कायदा झाल्यानंतर देशात इतर राज्यात अशाप्रकारे कायदे व्हावेत म्हणून आंदोलने सुरू झाली. आसाम आणि कनार्टक या राज्यांनी यासाठीचा मसुदा महाराष्ट्राचा वापरला. कर्नाटकाने 7 डिसेंबर 2017 पासून या […]

Categories
कायदा

जादूटोणाविरोधी कायद्याच्या केसेस

जानेवारी - २०१८

जादूटोणाविरोधी कायदा मंजूर होण्यापूर्वी एक प्रश्न चळवळीत सातत्याने चर्चिला जायचा की ‘जादूटोणाविरोधी कायदा झाला तर या कायद्याची अंमलबजावणी कशी होईल? मुळात होईल काय? कि हुंडाबंदी सारख्या किंवा तत्सम सामाजिक रूढी परंपरांच्या विरोधात केल्या जाणाऱ्या अनेक कायद्द्यांसारखी याही कायद्याची गत होईल?’ कायदा केवळ कागदावर राहून चालणार नाही, तो वास्तवात आला तरच तो अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे हत्यार […]

Categories
कायदा

महाराष्ट्र अंनिसच्या, जातपंचायत मूठमाती अभियानाची वाटचाल…

सप्टेंबर - २०१७

28 जून 2013 : नाशिक येथे जातपंचायतीच्या दबावापोटी आंतरजातीय विवाह केलेल्या प्रमिला कुंभारकरचा जीव तिच्या बापाने घेतला. 30 जून 2013 : सामाजिक संघटनांचा नाशिक येथे भव्य निषेध मोर्चा. 2 जुलै 2013 : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा ‘जातिअंतासाठी हवा वैज्ञानिक दृष्टिकोन’ हा लेख दै.‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध. 3 जुलै 2013 : लेख वाचून भटक्याजोशी समाजाच्या बहिष्कृत अण्णा हिंगमिरे […]

Categories
कायदा जात पंचायत

जातशोषणाला लागणार लगाम

सप्टेंबर - २०१७

महाराष्ट्रात सामाजिक बहिष्कृत करण्याला मोठा इतिहास आहे. परंतु किरकोळ अपवाद वगळता कुणी त्याबद्दल लिहिलेले नाही. महाराष्ट्रात नामांकित लेखक होऊन गेले; परंतु अण्णा भाऊ साठे वगळता कुणी त्यावर लिहिले नाही. त्यांनी ‘बरबाद्या कंजारी’ ही जातपंचायतीवर कथा लिहिली आहे. अनेक समाज सुधारकांना सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागला. परंतु त्याविरोधात कुणी आवाज उठवला नाही. एकमेव डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]