चंद्रपूरपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेले चोरगाव अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले पाहून येथे कार्यरत असलेले शिक्षक बंडू फुलझेले यांच्या पुढाकाराने मुख्याध्यापक वर्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावाला प्रबोधित करण्याकरिता पी. एम. जाधव यांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यक्रमाने सुरुवात करण्यात आली. याच कार्यक्रमात या गावातील आंतरजातीय विवाहित जोडप्याचा सत्कार करण्यात आला. यापुढे असेच संत व समाजसुधारक यांचे प्रेरणादायी विचार लोकांमध्ये रुजविण्यासाठी […]
कॅटेगरी: परिवर्तन
सत्यनारायण पूजा ते अंनिस कार्यकर्ता…
मी त्यावेळी इयत्ता दहावीमध्ये शिकत होतो. बहीण भावामध्ये मी सर्वांत मोठा होतो. आम्ही नाभिक समाजाचे असल्याने घरी वडिलांचे सलून होते. माझे वडील धार्मिक वृत्तीचे होते. ते ‘शिवलीलाअमृत’ रोज वाच असत. एके दिवशी आमच्या सलूनमध्ये एका फिरत्या देवर्षी पिंगळ्याने आमच्या वडिलांना सांगितले की, दर अमावस्येला तुम्ही सत्यनारायणाची पूजा घाला. तुमची भरभराट होईल. आमच्या गावातील गणपुले काका […]
अंनिस कार्यकर्त्याचा स्तुत्य उपक्रम
कृष्णात आणि माझी ओळख तशी नवीनच; पण माझे लेख वाचून ते संपर्कात आले आणि आपला हा प्रवास सगळ्यांसोबत ‘शेअर’ करायला तयार झाले. कृष्णात हा कोल्हापूरला प्राथमिक शिक्षक आहेत. तर स्वाती आय.टी. क्षेत्रात नोकरी करते. कृष्णात आणि स्वाती दोघेही अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. कृष्णातचे विचाराने प्रगल्भ व्यक्तिमत्त्व आणि भाषेवर प्रभुत्व. त्यांनी त्यांचा प्रवास सहजसुंदर […]
नामजपाचा नाद सोडला…
माझ्या लहानपणी वाचायला, ऐकायला मिळालेल्या बहुतेक गोष्टी पौराणिक असायच्या आणि त्या वयात त्या अगदी खर्या वाटायच्या. मारिचानं हरिणाचं रूप घेतलं, हनुमानानं झेप घेऊन समुद्र ओलांडला वगैरे गोष्टी अचंबित करायच्या; पण त्यावर विश्वासही बसायचा. मोठ्या माणसांच्या गप्पा ऐकताना कुणाला तरी साक्षात्कार झाला. कुणाला प्रत्यक्ष रामानं, कृष्णानं किंवा देवीनं दर्शन दिलं, तेव्हा रोमांच यायचे. प्रत्यक्ष देवाचं दर्शन […]
…आणि मी वास्तुशास्त्र नाकारले
– अरविंद पाखले मी बांधकाम व्यावसायिक आहे. कुतुहलापोटी वास्तुशास्त्रावरील एक पुस्तक वाचले. आणि नकळत या शास्त्राकडे आकर्षित झालो. माझ्या घरात वास्तुशास्त्राप्रमाणे बदल केले. पण अनुभवांनी माझा भ्रमनिरास झाला. माझ्या घराची रचना पूर्ववत केली आणि वास्तुशास्त्र या अंधश्रद्धेबाबत लोकांचे प्रबोधन करू लागलो. हे कसे घडले? प्रथम वास्तुशास्त्राची माहिती घेऊया. या शास्त्रात दिशांना महत्त्व आहे. पूर्व – […]
ज्योतिषी ते अंनिस कार्यकर्ता
‘धार्मिक ते विवेकवादी’ असा प्रवास झालेल्या काही अंनिस कार्यकर्त्यांचा जीवनप्रवास अं. नि. वार्तापत्रातून आम्ही ‘बि’घडलो या सदरातून दरमहा प्रसिद्ध करणार आहोत. कार्यकर्त्यांचा विवेकी जीवनप्रवास वाचून वाचकांना यातून प्रेरणा मिळेल. मी प्रकाश तमण्णा हिरेमठ. वय वर्षे 43. रा. कोल्हापूर. व्यवसाय पौरोहित्य करणे. गेली 20 वर्षे मी पौरोहित्य करीत होतो, गेल्या 4 वर्षांपासून मी ज्योतिष (भविष्य) सांगणे […]
‘धार्मिक ते विवेकवादी’ असा प्रवास झालेल्या काही अंनिस कार्यकर्त्यांचा जीवनप्रवास अं. नि. वार्तापत्रातून ‘आम्ही ‘बि’घडलो’ या सदरातून दरमहा प्रसिद्ध करणार आहोत. कार्यकर्त्यांचा विवेकी जीवनप्रवास वाचून वाचकांना यातून प्रेरणा मिळेल. माझा जन्म सांगली जिल्ह्यातील एका खेडेगावात मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. खेडेगाव असल्यामुळे पावलोपावली अंधश्रद्धा होत्या. मांजर आडवे गेले तर पुढच्या कामाला जायचे नाही, पाल अंगावर पडली तर […]
रेड्याची मान बळीप्रथेतून कायमची सुटली
जत तालुक्यातील हळ्ळी येथील यात्रेत दीडशे वर्षांपासून दहा रेड्यांचा बळी देण्यात येतो. मात्र अंनिसच्या पुढाकाराने यावर्षीपासून या बळी प्रथेला मूठमाती मिळाली असून, गावकर्यांनी बळीप्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता रेड्याच्या बळीऐवजी नैवेद्याचे पूजन करून यात्रा संपन्न झाली. त्यामुळे या परिसरातील रेड्यांची मान बळीप्रथेतून कायमची सुटली आहे. हळ्ळी या गावात चंद्रदुर्गा देवीची यात्रा होते. या […]
प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी आणि म. अं. नि. स. चे हितचिंतक गजानन(नाना) गोळे यांचे गेल्या 11 एप्रिल रोजी मुंबईत वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार निधनानंतर कुठलेही धार्मिक कर्मकांड करण्यात आले नाही व समाज प्रबोधनाचे कार्य करणार्या चार संस्थांना देणग्या देण्यात आल्या. महाराष्ट्र अंनिस त्यापैकी एक. नाना गोळे यांचे चिरंजीव विनीत गोळे यांनी वडाळा येथील […]
अमावस्येलाच अडकले ‘ते’ रेशीमगाठीत
अमावस्येला कोणत्याही शुभकार्याचे नियोजन केले जात नाही. या ‘अशुभ’ दिवसाला ‘शुभ’ करण्याचा निर्णय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कराड येथील कार्यकर्त्याने घेतला. मंगळवार दि. 16 अमावस्येला ‘मुहूर्ता’वर मुलगा अजित आणि हेमा हे लग्नाच्या रेशीम बंधनात बांधले गेले अन् त्यांनी वैवाहिक जीवनाला प्रारंभ केला. अमावस्या ही नैसर्गिक कालचक्रासाठी अत्यावश्यक असल्याचे विज्ञान सांगत असले तरी आपल्या समाजात अनेक गैरसमज […]