Categories
जादुई वास्तव

सर्वांत छोटा कोण?

ऑक्टोबर – २०१७

-ले. रिचर्ड डॉकिन्स अणुकेंद्र फुटबॉल सारखं नाहीयेच मुळी! तुम्हाला समजावण्यापुरतीच ती उपमा वापरली. केंद्र हे गोल गरगरीत नाही, कुठल्याही विशिष्ट आकाराचं नाही. घन या शब्दासारखाच ‘आकार’ या शब्दाला इतक्या सूक्ष्म जगात काही अर्थ राहत नाही. किती सूक्ष्म आहे हे अणुंचं जग? या वाक्याच्या शेवटी जो पूर्णविराम आहे ना त्यात शाईचे एक ‘शंड़्क’ (एक शंड़्क म्हणजेच […]

Categories
जादुई वास्तव

प्रकरण 4 – हे विश्व बनलंय कशाचं?

जुलै - २०१७

ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात कणादमुनींनी वैशेषिक सूत्रात हे सारं जग अतिसूक्ष्म कणांपासून बनलं आहे आणि त्या कणांची पुढे विभागणी शक्य नाही, अशी कल्पना मांडली. अन्नाचा घास घेता घेता, आता याच्यापेक्षा बारीक बारीक असे कुठवर तुकडे करता येतील, असा विचार त्यांना सुचला आणि त्यातून त्यांनी अविभाज्य अशा अणुची कल्पना मांडली. कणादमुनींसारखीच बारीक बारीक कणांची कल्पना, डेमोक्रेटस या […]

Categories
जादुई वास्तव

इतक्या प्रकारचे प्राणी निर्माण कसे झाले?

जून – २०१७

(मागील अंकावरून पुढे…) एका समूहाची ताटातूट झाल्यावर निर्माण होणार्‍या दोन्ही समूहातील भाषा आपापल्या ठिकाणी, स्वतंत्रपणे, हळूहळू, वेगवेगळ्या प्रकारे बदलत राहतात. तसंच दोन प्रजातींची ताटातूट झाली तरी दोन्ही ठिकाणी ‘डीएनए’तले बदल होतच राहतात. आपापल्या ठिकाणी, स्वतंत्रपणे, हळूहळू, वेगवेगळ्या प्रकारे बदल घडत राहतात. ही ताटातूट अनेक कारणांनी होऊ शकते. समुद्र हे अगदी सहज समजण्यासारखं उदाहरण आहे. दोन […]

Categories
जादुई वास्तव

विविध प्रकारचे प्राणी निर्माण कसे झाले?

मे - २०१७

प्रकरण 3 ही जीवसृष्टी कशी निर्माण झाली ते सांगणार्‍या कितीतरी लोककथा, मिथककथा आहेत. जीवसृष्टीची वैशिष्ट्ये कशी निर्माण झाली हे सांगणार्‍या तर कितीतरी कथा. खारीच्या पाठीवर रेघा का, मोराला पिसारा कुठून आला, पोपटाचा रंग हिरवा कसा झाला या सार्‍यांचा खुलासा करणार्‍या कथाच कथा आहेत. पण इतक्या प्रकार-प्रकाराचे आणि आकार-उकाराचे प्राणी कसे अस्तित्वात आले ते सांगणार्‍या कथा […]

Categories
जादुई वास्तव

प्रकरण 2 – पहिला माणूस कसा तयार झाला?

एप्रिल – २०१७

(मागील अंकावरून पुढे सुरू) जीवाश्म झाले त्यांचे हे आपले पुरातन पूर्वज होते कोण आणि कसे हे कळलं कसं आपल्याला? जीवाश्मावरून. जीवाश्म हे ‘अश्म’ म्हणजे दगडच असतात. मृत प्राण्यांच्या, वनस्पतींच्या आकारात आपोआप ढाळले गेलेले हे दगड. बहुतेक जीव, जीवाश्म न बनताच नष्ट पावतात. जर तुम्हाला जीवाश्म बनायचं असेल तर सुयोग्य अशा मातीत, गाळात तुम्ही मरायला हवं. […]

Categories
जादुई वास्तव

पहिला माणूस कसा तयार झाला?

मार्च - २०१७

प्रकरण 2 डॉ. रिचर्ड डॉकिन्स यांच्या ‘द मॅजिक ऑफ रीअ‍ॅलीटी’ या पुस्तकातील, हू वॉज द फर्स्ट पर्सन’ या प्रकरणाचा मराठी भावानुवाद. अनुवाद : डॉ. शंतनु अभ्यंकर या पुस्तकातल्या बहुतेक प्रकरणांची सुरुवात एका प्रश्नाने होते. प्रश्नाचं उत्तर त्या त्या प्रकरणात दिलं आहे. निदान त्यातल्या त्यात सुयोग्य, विज्ञाननिष्ठ उत्तर दिलंय. पण सुरुवातीला मी मिथक कथांनी, पुराणांनी, दिलेली […]

Categories
जादुई वास्तव

सत्य कोणतं आणि जादू कुठली?

फेब्रुवारी – २०१७

भाग : २ अनुवाद : डॉ. शंतनु अभ्यंकर डॉ. रिचर्ड डॉकिन्स हे सुप्रसिद्ध विवेकवादी वैज्ञानिक. विज्ञान लोकप्रिय करण्याचं त्यांचं कार्य अमोल आहे. अं. नि. वार्तापत्रही हे कार्य करते. अंनिसच्या प्रबोधनाचा हेतू लक्षात घेऊन डॉ. डॉकिन्स यांनी त्यांच्या ‘दि मॅजिक ऑफ रिअ‍ॅलिटी’ या सुप्रसिद्ध ग्रंथाचा मराठीत भावानुवाद ‘अं.नि.वार्तापत्रा’साठी करण्यास डॉ. शंतनु अभ्यंकर यांना परवानगी दिली. जागतिक […]

Categories
जादुई वास्तव

सत्य कोणतं आणि जादू कुठली?

जानेवारी - २०१७

डॉ. रिचर्ड डॉकिन्स हे अमेरिकेतील सुप्रसिद्ध विवेकवादी वैज्ञानिक. विज्ञान लोकप्रिय करण्याचं त्यांचं कार्य अमोल आहे. अं. नि. वार्तापत्रही हे कार्य करते. अंनिसच्या प्रबोधनाचा हेतू लक्षात घेऊन डॉ. डॉकिन्स यांनी त्यांच्या ‘दि मॅजिक ऑफ रिअ‍ॅलिटी’ या सुप्रसिद्ध ग्रंथाचा मराठीत भावानुवाद ‘अं.नि.वार्तापत्रा’साठी करण्यास डॉ. शंतनु अभ्यंकर यांना परवानगी दिली. जागतिक कीर्तीच्या वैज्ञानिकाने अं. नि. वार्तापत्राच्या कार्याला दिलेली […]