Categories
भांडाफोड

‘गुरूमाँ’चा साईबाबांशी थेट संवाद!

ऑगस्ट २०१९

‘माझ्यामध्ये दैवी शक्ती आहे. थेट साईबाबांशी संवाद, संपर्क साधून लोकांना, त्यांच्या अडचणीतून सुटका करते, भूतबाधा, करणी दूर करते, कोर्ट प्रकरण सोडवते,’ असे खोटे दावे करून फसवणूक करणार्‍या किरण दारूवाला ऊर्फ ‘गुरूमाँ’ (रा. शिवाजी नगर, लोअर परेल) या महिलेला मुंबईतील अंनिस कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या. याची सुरुवात फसवणूक झालेल्या महिलेच्या वडिलांनी […]

Categories
भांडाफोड

कोल्हापुरात शास्त्री महाराजास अटक व कोठडी

जुलै - २०१९

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोल्हापूर शाखेच्या बैठकीत विविध उपक्रम, बुवा-बाबा यांच्या बाबत तक्रारी, झालेले कार्यक्रम याबाबत चर्चा होते. एकदा उपस्थित कार्यकर्त्याने एक जाहिरात दाखवली, सदरची जाहिरात त्यास वृत्तपत्रातून मिळाली होती. जाहिरातीत म्हटले होते – “हनुमानाचे भक्त श्री. शास्त्री महाराज कोल्हापुरात प्रथम आलेले आहेत, हे महाराज चेहरा पाहून भविष्य सांगतात, कोणत्याही समस्येवर त्यामध्ये पती-पत्नीमधील तणाव, संतानसुख, […]

Categories
भांडाफोड

भक्ताशी समलिंगी संबंध ठेवणार्‍या बाबावर गुन्हा

जून - २०१९

टिटवाळा येथील भोंदू बाबाच्या विरुद्ध जादूटोणाविरोधी कायदा व भारतीय दंड संहितेअंतर्गत तक्रार दाखल टिटवाळा येथील प्रसिद्ध वैष्णोदेवी मंदिरातील मुख्य पुजारी, भोंदू बाबा ललजितसिंग जोशन उर्फ ‘मंजू माताजी’(पुरुष असूनही ‘माताजी’ असे म्हणवितो.) याच्याविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत तक्रार दाखल करायची आहे, म्हणून नितिन म्हात्रे नावाचा तरुण अंनिसच्या कायदा विभागाच्या सहकार्यवाह अ‍ॅड. तृप्ती पाटील यांना गेल्या वर्षी एका पत्रकाराच्या […]

Categories
भांडाफोड

उघडेबाबाचे पलायन

एप्रिल - २०१९

के.ई.एम. हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये सुरू होता दरबार दिनांक 4 ऑक्टोबर 2018 रोजी ‘झी 24 तास’ वाहिनीवर केईएम रुग्णालयात अस्थिभंग उपचार विभागामागे चालत असलेल्या भोंदू उघडेबाबा ऊर्फ मनोहर खंडू साळुंके याची भोंदूगिरीची बातमी थडकली. हा बाबा 1987 पासून ‘केईएम’सारख्या प्रतिष्ठित रुग्णालयामध्ये ठाण मांडून होता. दर गुरुवारी अमावस्या-पौर्णिमेला तिथे दरबार भरायचा. त्यात तो तोडगे, अवैज्ञानिक उपाय सुचवायचा. वरील […]

Categories
भांडाफोड

हजरतच्या दैवी शक्तीचे आमिष दाखवून दोन मुलींवर बलात्कार

एप्रिल - २०१९

कॉलेजचा अभ्यास अवघड जात असल्याने मुलगी कॉलेजला सतत गैरहजर राहत होती, या कारणास्तव त्या मुलीला कॉलेजच्या परीक्षेला बसता आले नाही. या गोष्टींमुळे आई बेचैन झाली. आपल्यावर काहीतरी संकट कोसळले अथवा मुलीला काहीतरी बाधा झाली आहे, या समजुतीने कोंढवा (पुणे) येथील एका दैवी शक्तीवाल्या महिलेकडे घेऊन गेली. या दैवी शक्तीवाल्या महिलेने दैवी शक्तीची भीती दाखवून या […]

Categories
भांडाफोड

‘दत्तयोगी’ भगवानबाबाचा भांडाफोड भंडारा मअंनिसची कामगिरी

मार्च - २०१९

तब्बल चार महिन्यांपासून ज्या ढोंगीबाबाला पकडण्यासाठी योजना आखावी लागली, तो ‘दत्तयोगी’ भगवानबाबा अखेर सापडला आणि त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील या बाबाच्या आडून अनेकांनी आपले धंदे सुरू केले होते. मुळात भंडारा शहरात राहणार्‍या या बाबाला एका व्यक्तीने पवनी तालुक्यातील रामनगरला नेले. अंगावर एकही कपडा नसलेला हा बाबा पुत्रप्राप्तीसाठी व रोग बरा करण्यासाठी अल्पावधीतच […]

Categories
भांडाफोड

तांत्रिक विद्या करून लोकांना फसविणार्‍या गनी कादर बाबाचा भांडाफोड

फेब्रुवारी - २०१९

भूतबाधा व इतर तत्सम आजारांवर अघोरी प्रकार करणार्‍या; तसेच भीती दाखवून अंधश्रध्द व्यक्तींचे शारीरिक व आर्थिक शोषण करणार्‍या तांत्रिक बाबाचा भांडाफोड महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या औरंगाबाद येथील कार्यकर्त्यांनी केला. औरंगाबाद येथील हरसूल गावात गनी कादर पठाण नावाचा एक साठ वर्षे वयाचा तांत्रिक बाबा लोकांना झालेली भूतबाधा बाहेर काढणे, दुर्धर आजार बरे करणे, गुप्तधन शोधणे असे […]

Categories
भांडाफोड

सातार्‍यात आप्पा-शरणाप्पाचा पर्दाफाश

ऑक्टोबर - २०१८

दैवी चमत्काराचा दावा करून स्वत:च्या अंगात असलेल्या दैवी शक्तीव्दारे दर अमावस्या, पौर्णिमा व शुक्रवारी स्वत:च्या घरात दरबार भरवून अनेक अडचणीत असलेल्या भक्तांना लाखो रुपयांना गंडा घालणारा भोंदू आप्पा शरणाप्पाचा पर्दाफाश सातारा अंनिस व कराड पोलिस यांनी प्रत्यक्ष दरबारात धाड टाकून केला. मूळचा कर्नाटक राज्यातून आलेल्या या भोंदूने ओंड (ता. कराड, जि. सातारा) येथे चांगलेच बस्तान […]

Categories
भांडाफोड

चर्चच्या बिशपकडून लैंगिक अत्याचार

ऑक्टोबर - २०१८

एके काळी एअर इंडियाची ‘केरला नन्स, नन् ऑफ माय बिजिनेस्स’ ही जाहिरात भरपूर गाजली होती. त्याकाळी लक्षणीय प्रमाणात ख्रिश्चन्स असलेल्या केरळ राज्यात चर्च, प्रीस्ट्स व नन्सबद्दलच्या जोक्सना उधाण आले होते. परंतु नंतरच्या काळात याच राज्यातील कष्टकर्‍यांनी परदेशात जाऊन मोठ्या प्रमाणात परकीय चलनात भर घातली. राज्यातील साक्षरतेचे प्रमाण जवळजवळ शंभर टक्के असल्यामुळे एक सुसंस्कृत राज्य म्हणून […]

Categories
भांडाफोड

…अखेर चमत्काराचा केला भांडाफोड

सप्टेंबर - २०१८

जग एकविसाव्या शतकात वावरत आहे. विज्ञानाच्या सहाय्याने वेगवेगळे शोध लावले जात आहेत, तरीही आपण चमत्कारावर विस्वास ठेवतो, हे अविवेकी माणूस असल्याचे लक्षण आहे. थोडाफार काळ लोटला की नवनवीन चमत्कार घाडतात व दर्शनाला भक्तांच्या रांगा लागतात. ‘जगातील कोणताही चमत्कार हा एक तर रासायनिक अभिक्रिया, भौतिक अभिक्रिया किंवा हातचलाखी असते; तो मुळी दैवी चमत्कार नसतो….! शिर्डीतील व्दारकामाईत […]