Categories
अभिवादन

“निरामय कामजीवनाचा” परिचय करून देणारे डॉ. विठ्ठल प्रभू

वार्षिकांक - २०१९

डॉ. विठ्ठल प्रभूंनी स्त्री कामशोषणाविषयी जळजळीत मते मांडली आहेत. कामजीवनासंबंधी आजवर स्त्री आपले विचार मांडत नव्हती, त्यामुळे तिच्या लैंगिकतेसंबंधी पुरुषाच्या मनातले विचार हेच वास्तव मानले गेले व तिचे अधिकाधिक शोषण होऊ लागले. कायदा असूनही हुंडाबळी, बालविवाह, स्त्री–भ्रूणहत्या, लैंगिक छळ, एकतर्फी प्रेम, हत्या, वासनाकांड असे प्रकार वाढताहेत. यावर उपाय? लैंगिक शिक्षण. सेक्सची उत्क्रांती सांगणारं एक पुस्तक […]

Categories
अभिवादन

पडद्यामागचा कार्यकर्ता – वैजनाथ कोरे

वार्षिकांक - २०१९

वैजनाथ कोरे हे सुरुवातीपासून युवक क्रांती दल, राष्ट्रसेवा दल, ‘महाअंनिस’साठी वेळ देत असत. पण सर्वांत जास्त वेळ ते ‘महाअंनिस’ला देत असत. त्याचबरोबर ‘महाअंनिस’ला त्यांनी फार मोठी मदत केलेली आहे, आणि तीही सातत्याने. ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा’च्या वतीने त्यांना ‘आधारस्तंभ’ म्हणून अनेक वेळेला गौरविले होते. ‘महाअंनिस’च्या लातूर शहर शाखेचे अध्यक्ष वैजनाथ केरबा कोरे यांचे शुक्रवार, दि. 11 […]

Categories
अभिवादन

शहीद डॉ.दाभोलकरांचे विचारधन सातासमुद्रापल्याड नेणार्‍या – सुमन ओक

वार्षिकांक - २०१९

डॉ. दाभोलकरांच्या बहुतेक लेखांचा व भाषणांचा अनुवाद सुमन ओक यांनी केला. त्यातूनच डॉक्टरांचा परिचय अमराठी वाचकांना होऊ शकला. डॉक्टरांच्या लेखात व भाषणात अस्सल मराठी शब्दांची व मराठी समाजातील, संतवाङ्मयातील उदाहरणांची रेलचेल असे. मराठी भाषेच्या सौंदर्याला धक्का न लावता इतर भाषांत अनुवाद करत असताना फार मोठी कसरत करावी लागते. परंतु सुमन ओक यांना मात्र या गोष्टी […]

Categories
अभिवादन

सर्वस्व झोकून धाडसाने कार्य करणार्‍या कार्यकर्त्या – अलका चाफेकर

वार्षिकांक - २०१९

स्त्रिया हा अंधश्रद्धेने बाधित असा समाजातील एक मोठा घटक आहे. त्याच वेळी हा घटक मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेचा वाहकही आहे, हे वापरून–वापरून गुळगुळीत झालेले विधान तेवढेच सत्यही आहे. परंतु अंधश्रद्धा निर्मूलनाच्याच काय, पण एकूण समाजबदलाच्या कार्यात झोकून देऊन काम करणार्‍या स्त्रियाही खूप आहेत, याचा नेहमी उल्लेख होतोच, असे नाही. अलका चाफेकर अशा एक कार्यकर्त्या होत्या. ‘होत्या’ […]

Categories
अभिवादन

साथी गिरीशभाई शाह : मूर्तिमंत प्रेरणा आणि बांधिलकी!

ऑक्टोबर - २०१९

अंनिसचे काम तळमळीने करणारे, निर्गवी, सहृदय, दानशूर, कार्यतत्पर, विनम्र, इतर समविचारीनाही मदत करणारे, प्रसिद्धीपासून दूर रहाणारे, पर्यावरणवादी अशी स्वभाव वैशिष्ट्ये असणारे मुंबई जिल्हा अंनिसचे अध्यक्ष आदरणीय गिरीशभाई शहा यांचे दि. 25 सप्टेंबर 2019 रोजी मुंबई येथे निधन झाले. गिरीशभाई ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असतानाही ते सांगली–कोल्हापूर येथील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदत पाठवायचे नियोजन करत होते. तिथे डॉक्टर […]

Categories
अभिवादन

राजा ढाले : ‘पँथर’चा लास्ट समुराई

ऑगस्ट २०१९

मानवजातीच्या इतिहासात शोषित समुदायांचे विद्रोह जननायकांना जन्म देतात, जे त्यांच्या न्यायपूर्ण विद्रोहाला चिरंतन मानवी मूल्यांची नैतिकता प्रदान करतात. या नैतिकतेचा कधीच पराभव होत नाही. ती प्रत्येक काळात वेगवेगळ्या रुपात शोषितांच्या विद्रोहाला बळ पुरवते, नवे जननायक, नवे विचारवंत निर्माण करते. या विद्रोहाच्या गाभ्याशी चिरंतन मानवी मूल्य असल्याने ही लढाई माणसाचे माणसाकडून होणारे शोषण नष्ट करणार्‍या दीर्घकालीन […]

Categories
अभिवादन

‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर

जुलै - २०१९

गोपाळ गणेश आगरकरांचे 125वे स्मृतिवर्ष सुरू आहे. त्या निमित्ताने हा लेख प्रसिद्ध करीत आहोत. सुधारककार गोपाळ गणेश आगरकर (14 जुलै 1856 ते 17 जून 1895) ‘सुधारक’अग्रणी गोपाळ गणेश आगरकर यांचा यंदा 125 वा स्मृतिदिन आहे. मला आठवतंय की, मी शाळेमध्ये असताना वि. स. खांडेकरांचा एक लेख आम्हाला अभ्यासक्रमाला होता. त्याचं क्रांतिकारी शीर्षक होतं, “देव न […]

Categories
अभिवादन

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे

जुलै - २०१९

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा आरंभ 1 ऑगस्टला होत आहे. त्यानिमित्ताने कॉ. अण्णा भाऊ साठेंवरचा लेख प्रसिद्ध करीत आहोत. “ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित-श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे,” असे वरिष्ठ वर्णाला आणि वरिष्ठ वर्गाला ठणकावून सांगणार्‍या अण्णा भाऊंचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. अण्णा भाऊंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 चा! गाव वाटेगाव! शेती […]

Categories
अभिवादन

वार्तापत्राचे माजी सहसंपादक डॉ. आशुतोष मुळे यांचे निधन

जुलै - २०१९

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे माजी सहसंपादक डॉ. आशुतोष मुळे यांचे दिनांक 2 जून 2019 रोजी अन्ननलिकेच्या कॅन्सरच्या आजाराने अकाली अवघ्या 51 व्या वर्षी निधन झाले. व्यवसायाने डॉक्टर असलेले आशुतोष फिनोलेक्स या कंपनीत 1993 पासून वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. अलिकडे काही वर्षांपासून त्यांच्याकडे जनसंपर्क अधिकारी पदाचाही कार्यभार होता. या काळात त्यांनी कंपनीच्या सीएसआर धोरणांतर्गत ग्रामीण भागात […]

Categories
अभिवादन

निधन वार्ता

जुलै - २०१९

बंडोपंत दातरंगे महाराष्ट्र अंनिसचे नाशिकचे ज्येष्ठ कार्यकर्ते महेंद्र दातरंगे यांचे वडील बंडोपंत दातरंगे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुले, एक मुलगी, सुना-नातवंडे असा परिवार आहे. निधनासमयी त्यांचे वय 92 वर्षेहोते. त्यावेळच्या नाशिक नगरपालिकेत उच्च पदावर कार्यरत राहून त्यांनी त्यांच्या सेवेत कामाचा वेगळा ठसा उमटविला होता. कवितालेखन, वाचन व श्रवण करणे हा त्यांचा आवडीचा […]