Categories
पुरस्कार

मअंनिसला केरळच्या युक्तीवादी संस्थेचा फ्री थॉट अ‍ॅवॉर्ड

जून - २०१९

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम दिवसेंदिवस वाढत असून आता एका विशिष्ट टप्प्यावर येऊन पोचले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन यापासून सुरू झालेले संघटनेचे काम आज विविध अंगांनी विस्तारले आहे. कोणत्याही कारणाने खंड न पडता गेली 30 वर्षे सातत्याने हे काम विशिष्ट ध्येयाने, नाविन्यपूर्ण पद्धतीने, उपक्रमशीलता राखून, लोकसहभागातून, विवेकी आणि मानवतावादी समाजनिर्माणासाठी काम करीत आहे. महाराष्ट्रात तर या […]

Categories
पुरस्कार

फ्रीडम फ्रॉम रिलिजन फौंडेशन, अमेरिकेचा ‘अविजीत रॉय धैर्य पुरस्कार’ महाराष्ट्र अंनिसला जाहीर

जून - २०१९

1978 साली स्थापन झालेल्या ‘फ्रीडम फ्रॉम रिलिजन फौंडेशन, अमेरिका’ या संस्थेचा ‘अविजीत रॉय धैर्य पुरस्कार’ हा 5000 अमेरिकन डॉलर्सचा पुरस्कार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीस जाहीर झाला असून या संस्थेच्या 52 व्या राष्ट्रीय अधिवेशनात 18 ते 20 ऑक्टोबर 2019 दरम्यान मॅडिसन, विस्कॉन्सीन येथे प्रदान केला जाणार आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मअंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांना […]

Categories
पुरस्कार

श्रीनिधी चॅरिटी, सांगली या संस्थेचा महाराष्ट्र अंनिसला पुरस्कार

जून - २०१९

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला श्रीनिधी संस्था, सांगलीचा रुपये 21 हजारांचा ‘समाजसेवा पुरस्कार’ नुकताच रोटरी क्लब, सांगलीच्या सहकार्याने दिला गेला. त्यानिमित्ताने श्रीनिधी या संस्थेने राबविलेल्या अभिनव उपक्रमाचा थोडक्यात परिचय वाचकांना करून देत आहोत. सन 2015 मध्ये जेव्हा लंडनला गेले, तेव्हा मुले नोकरीला बाहेर पडल्यावर दुपारचा वेळ आम्ही दोघे सर्व रस्त्यांवरून पायी फिरण्यात घालवत असू. मोठमोठे पार्क, […]

Categories
पुरस्कार

परिवर्तनाचा विचार पुढे घेऊन जाणे हेच सामाजिक कार्यकर्त्यांचे कर्तव्य – डॉ. बाबा आढाव

ऑगस्ट - २०१८

महाराष्ट्र अंनिसचा पहिला प्राचार्य डॅडी देशमुख स्मृती पुरस्कार सर्पमित्र बाळ काळणे यांना प्रदान समाजाची वाटचाल तपासण्यासाठी चिंतनशीलता व कलात्मक सर्जनशीलता हे मापदंड असताना आज ती दुर्लक्षित होत असल्याची खंत प्रसिध्द विचारवंत डॉ. बाबा आढाव यांनी अकोला येथे व्यक्त केली. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती व डॅडी देशमुख परिवाराच्या वतीने पहिला प्राचार्य डॅडी देशमुख स्मृती विदर्भस्तरीय कार्यकर्ता […]

Categories
पुरस्कार

कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार ‘अंनिस’ ला प्रदान

ऑगस्ट - २०१७

जयसिंगपूर येथे पार पडला शानदार सोहळा डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंदराव पानसरे, प्रा. कलबुर्गी यांचा खून धार्मिक उन्मादात राहून काम करणार्‍या लोकांनी केला. विवेकाचा आवाज बुलंद करून जाती-धर्म आणि शोषणमुक्त, कल्याणकारी, समतेचे राज्य उभे राहावे, हे दाभोलकर व कॉ. पानसरे यांनी पाहिलेले स्वप्न साकार करावयाचे असल्याचे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील […]

Categories
पुरस्कार

‘सुधारककार गोपाळ गणेश आगरकर राष्ट्रीय प्रबोधन पुरस्कार’ निखिल वागळे यांना प्रदान

एप्रिल – २०१७

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे दर दोन वर्षांनी देण्यात येणारा ‘सुधारककार गोपाळ गणेश आगरकर राष्ट्रीय प्रबोधन पुरस्कार’ निखिल वागळे यांना प्रदान करण्यात आला…! तसेच ’जोडीदाराची विवेकी निवड’ या उपक्रमाअंतर्गत अनेक अडचणींना तोंड देत विवाहबद्ध होऊन वेगळी वाट चोखाळणार्‍या नंदना गजभिये आणि तुषार शिंदे या नवदांपत्याला राज्य सरचिटणीस नितीन राऊत यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा ‘नरहरी राऊत […]

Categories
पुरस्कार

सुमनताई ओक यांना मअंनिसचा सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार प्रदान

सप्टेंबर - २०१५

ज्येष्ठ विवेकवादी कार्यकर्त्या सुमनताई ओक, पुणे यांना यावर्षीचा महाराष्ट्र अंनिसचा सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार पुण्याच्या अधिवेशनामध्ये देण्यात आला. डॉ. शैला दाभोलकर आणि कुलगुरु डॉ.पंडीत विद्यासागर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी दिपक गिरमे, प्रभाकर नानावटी, डॉ. राजेंद्र कांकरिया, सविता शेटे,मेघा पानसरे इ. उपस्थित होते.

Categories
पुरस्कार

अ‍ॅड.अतुल अल्मेडा यांना महाराष्ट्र अंनिसचा सुधारककार आगरकर पुरस्कार प्रदान

मार्च - २०१४

वसई येथील प्रसिद्ध कायदेतज्ञ व समाजसुधारक अ‍ॅड. अतुल अल्मेडा यांना ‘सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार’ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप 11000 रूपये रोख, शाल व सन्मानपत्र असे आहे. हा पुरस्कार दि. 8 फेब्रुवारी 2014 शनिवार रोजी सायंकाळी 6 वाजता चेतना महाविद्यालय, वांद्रे येथील सभागृहात विशेष समारंभपूर्वक देण्यात आला. याप्रसंगी प्रसिद्ध […]

Categories
पुरस्कार

वंदना शिंदेना सावित्रीबाई समाजप्रबोधन पुरस्कार

मार्च - २०१४

मुंबईतील व्ही.जे.टी.आय. या 125 वर्ष जुन्या जगप्रसिद्ध अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत असलेल्या व्ही.जे.टी.आय.मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाजप्रबोधन पुरस्कार वंदनाताई शिंदे यांना प्रदान करण्यात आला. 10 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आलेल्या वीरमाता जिजाबाई जयंती महोत्सवात सन्मापूर्वक प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष मा.अविनाश पाटील, मुंबई महानगरपालिकेतील अपक्ष गटनेते मा.मनोजभाई संसारे, […]

Categories
पुरस्कार

आय.बी.एन. लोकमत या वाहिनीचा महाराष्ट्र अंनिसला प्रेरणा पुरस्कार!

मार्च - २०१४

20 फेब्रुवारी 2014 रोजी रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे आय.बी.एन. लोकमत तर्फे प्रेरणा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, निवृत्त एअर चीफ मार्शल अनिल टिपणीस व इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. कृषी, क्रीडा, उद्योग, शिक्षण, साहित्य अशा विविध क्षेत्रातील एक ज्येष्ठ व एक तरूण […]