Categories
पुरस्कार

वंदना शिंदेना सावित्रीबाई समाजप्रबोधन पुरस्कार

मार्च - २०१४

मुंबईतील व्ही.जे.टी.आय. या 125 वर्ष जुन्या जगप्रसिद्ध अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत असलेल्या व्ही.जे.टी.आय.मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाजप्रबोधन पुरस्कार वंदनाताई शिंदे यांना प्रदान करण्यात आला. 10 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आलेल्या वीरमाता जिजाबाई जयंती महोत्सवात सन्मापूर्वक प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष मा.अविनाश पाटील, मुंबई महानगरपालिकेतील अपक्ष गटनेते मा.मनोजभाई संसारे, महानायकचे संपादक मा.सुनील खोब्रागडे हे मान्यवर उपस्थित होते. सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व रोख 5000 रू. सन्मानपूर्वक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

प्रविण देशमुख