Categories
कथा

सदाचाराचा ताईत

वार्षिकांक - २०१७

–हरिशंकर परसाई एका राज्यात गोंधळ उडाला की, भ्रष्टाचार खूप पसरलाय. एक दिवस राजाने दरबारी मंडळींना विचारले़, ‘जनता ओरडायला लागली आहे की, सर्वत्र भ्रष्टाचार पसरला आहे. आम्हाला तर आजपर्यंत कोठेही पाहावयास मिळाला नाही. तुम्हाला कुणाला दिसला असेल तर सांगा. दरबारामध्ये हजर असणारे सर्वच जन म्हणतात़ महाराजांना जर दिसला नसेल तर आम्हाला कसा दिसेल?’ महाराज म्हणाले़, “नाही […]

Categories
कथा

घबाड किंवा लबाडांची युती

वार्षिकांक - २०१७

–हरिशंकर परसाई ‘जैसे उनके दिन फिर गये’ हरिशंकर परसाई यांच्या हिंदी कथेचा स्वैर अनुवाद : बुवा–बाबा, राजकारण यांचे साटेलोटे हा प्रकार नवा नाही . जगभरचे राजे– रजवाडे ते आजकालचे राजकारणी ! यांची पध्दतशीर युती समाजलुटीचे जाळे विणून भोळ्या जनांना लुबाडत समाजात उजळ माथ्याने कसे राज्य करते, याचे खमंग दर्शन आजच्या बुवाबाजीच्या धुमाकूळ घातलेल्या जमान्यात समर्थपणे […]

Categories
कथा

अर्जुना अंगात आला

वार्षिकांक - २०१७

गुढीपाडव्याचा दिवस होता. चिंचगावात वाजंत्री वाजत होती. ढोल, ताशा, पिपाणीने जोर धरला होता. हे सारं वाजंत्रं सखूच्या दारात गोंधळ घालत होतं. काही वर्षांपूर्वी तिचा नऊ-दहा वर्षांचा अर्जुन नावाचा मुलगा वारला होता. त्याचं गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर लग्न लावून त्याला कुठल्या तरी झाडाखाली स्थानबद्ध करायचं होतं .त्यासाठी सखूबाईनं एका लग्नाचा बाजार करून आणला होता. दोन दिवस चमचमीत जेवणावळ […]

Categories
कथा

मूलभूत हक्क आणि भिकारी दोसाध

वार्षिकांक - २०१६

– महाश्वेतादेवी प्रख्यात कार्यकर्त्या – लेखिका महाश्वेतादेवी यांचे या वर्षी 28 जुलै 2016 रोजी निधन झाले. अनुवादक विलास गिते यांनी महाश्वेतादेवींच्या कथांचा अनुवाद केला आहे. महाश्वेतादेवींशी भेट झाली असता ‘आपली, आपण लिहिलेली सर्वांत आवडती कथा कोणती?’ हा प्रश्न त्यांनी महाश्वेतादेवी यांना विचारला होता. यावर महाश्वेतादेवी उत्तरल्या होत्या, ‘माझ्या कथांपैकी माझी सर्वांत आवडती कथा म्हणजे ‘मौल […]

Categories
कथा

देव दाभोलकर

वार्षिकांक - २०१५

निसर्गाचा समतोल म्हणजे काय असतं एकंदरीत; तर सगळ्या घटकांचे एकमेकांशी एक आदर्श प्रमाण असणं. म्हणजे सापांचे मुंगसांशी, पक्ष्यांचे किड्यांशी, हरणांचे वाघांशी, माणसांचे सगळ्यांशी इत्यादी. ते नीट टिकलं की, म्हणायचं पर्यावरण संतुलन. त्यात नित्यनेमाने ढवळाढवळ करून बिघाड करण्याचं काम माणूस नावाचा प्राणी करत असतो. म्हणजे असं की, लोकसंख्या शास्त्रात दर हजारी पुरुषांच्या मागे स्त्रियांचे आदर्श असं […]

Categories
कथा

नरेंद्र कॉलिंग नरेंद्र

वार्षिकांक - २०१५

“काय काम केलंय रे फरहान अख्तरनं त्यात! कस्ला बधिर दिसतो! एकदम!” संज्या पाण्याचा ग्लास खाली ठेवत म्हणाला. तो फरहान अख्तरचा डायहार्ड फॅन आहे. त्यामुळे ‘भाग मिल्खा भाग’ आला तरी तो त्याचे यच्चयावत चित्रपट प्रेमाने उगाळत बसतो. ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’ हा याचा ऑल टाईम फेवरिट. मला वाटतं, आजच्या पिढीचाच तो प्रॉब्लेम आहे. आम्ही मनानं दुभंगलेलेच आहोत. […]

Categories
कथा

अखेरचा जोगता

वार्षिकांक - २०१५

गुंडाप्पा हा गोपाळपाणी गावचा अखेरचा जोगता. तो अगदी परवापर्यंत धोंडूबाईच्या दारी जोगवा मागायला येत असे. दारापाशी उभा राहून तो म्हणे, ‘आई, जोगता आला!’ धोंडूबाई पितळेची थाळी घेऊन येई आणि त्याला जोगवा देई- तांदूळ, काही फळं, हळदीची पूड. परवा जोगता म्हणाला होता, “आई! एवढं देऊ नका हो! अलिकडे फार थकल्यासारखं होतं. धकवता येत नाही.’ गुंडाप्पाकडे बांबूच्या […]

Categories
कथा

डागंवरचं भूत

वार्षिकांक - २०१५

कोंबड्यानं पहाटे पहाटे पाच वाजता बांग द्यायला सुरवात केली, तसं शेतकर्‍याच्या कष्टाच्या दिवसाला सुरवात झाली. दूध दुभत्या गायी-म्हशीला, औताच्या रेडे, बैलांना गवत घालणे, गायी-म्हशीची धार काढणे, धार काढून झाल्यावर वासरांना दूध पाजायला सोडणे, शेण काढणे, दूध डेअरीमध्ये पोच करणे. अशा कामाला सुरुवात होते. नारायण पाडवे हा शेतकरी अजून काही अंथरूणातून उठला नव्हता. आदल्या दिवशी चांगलं […]

Categories
कथा बालविभाग

धाडसी शिवराज

वार्षिकांक - २०१५

शिवराज हा इयत्ता 8 वी मध्ये शिकणारा विद्यार्थी. माझी आणि शिवराजची ओळख याच शैक्षणिक वर्षाच्या जून महिन्यापासून झाली. तो इयत्ता 7 वी पास झाला आणि इयत्ता 8 वीत हायस्कूलमध्ये दाखल झाला. माझा 8 वीला अध्यापनाचा विषय सामान्य विज्ञान. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता असल्याने व मुळातच विज्ञान शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांना अधिकाधिक विज्ञाननिष्ठ व धाडसी बनविण्याचा मनोमन […]

Categories
कथा बालविभाग

देवरसी विठ्ठल बापू

वार्षिकांक - २०१५

‘अंनिस’चे कार्यकर्ते विजय पवार, सुनील पाटील आणि राजाराम म्हस्के यांचा कार्यक्रम आम्ही शाळेत आयोजित केलेला होता. आम्ही नऊ शिक्षक, दोनशे विद्यार्थी, काही पालक कार्यक्रम भान हरवून पाहत होतो. अंधश्रद्धेने माणूस कसा पिडला आहे. तो कसा अंधश्रद्धेच्या जोखडात अडकवला जातो आहे आणि त्यावर भोंदूबाबा कसे स्वत:चे पोट भरत आहेत, हे ‘अंनिस’चे कार्यकर्ते छोट्या नाटकाच्या रूपात दाखवीत […]