Categories
कथा

 खविसाचा दगड

वार्षिकांक – २०११

– नवनाथ लोंढे             “देहू गावाच्या जवळ, माळवाडीच्या शिवारातील एका शेतात एक भला मोठा खविसाचा दगड आहे. त्याच्याखाली सात रांजण भरून धन पुरून ठेवलं असून, त्याच्यावर अंगावर केस असलेला मोठा नाग, त्या धनाचे रक्षण करीत आहे. व त्या सर्वावर तो आक्राळ विक्राळ ‘खविस’ पहारा करीत आहे.” ही बातमी आदर्श विद्यालय, भारतपूर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समिती […]

Categories
कथा

जुळण

वार्षिकांक – २०११

            चैत्रपाडव्याचं रखरखीत उन. वारा घुमा. वाटा निर्जन. झाडं चुळबुळायची थांबलेली. झुडुपं नुसतीच सापळा सांभाळून उभी. अशा भगभगीत दुपारी मी आंब्याच्या झाडाखाली विश्राम करीत होतो. आंब्याच्या गोंडस फळांचं रूपांतर संख्येत होऊन लागलेलं. अशातच निकमांचा काळू कावळ्यासारखा झपकन् जवळ आला अन् धापा टाकीत कर्कशपणे म्हणाला, ‘काका…ऽऽ… काका…. तिकडं म्हादेवाच्या मंदिराकडं जुळण…. हाये…. जुळण. गोरे काकूनं बोलीवेलंय […]

Categories
कथा

नशा

वार्षिकांक – २०११

            खालच्या गल्लीला बाई बोंबलल्याचा आवाज आला. नवराबायकोचे भांडण झालं असेल, असं समजून मी माझं काम करू लागलो. नाही तरी मला सवयच झाली होती. दिवस असो किंवा रात्र असो बोंब मारल्याचा आवाज नेहमी ऐकायला यायचा. कोणाच्या भानगडीत पडायला नको, म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष करीत असे. मात्र, फार तर जवळचे कोणी असेल, तर मी भांडण सोडवायला […]