Categories
कथा

देवपण हरवलेलं मंदिर

वार्षिकांक – २०१३

आजीनं आपल्या बहिणीच्या नातीला- साक्षीला सगळा गाव फिरवून दाखवला. गावातली सगळी मंदिरं दाखवली. बाग दाखवले, साखर कारखाना दाखवला. जवळचा रामलिंगचा डोंगर दाखवला. दाखवलं नाही ते मुख्य गावाबाहेरचं मोठं मंदिर. तशी साक्षी म्हणाली, “आजी सगळं दाखवलंस पण ते गावाबाहेरचं मंदिर नाही दाखवलंस…. चल. आपण तेही मंदिर बघूया!” ‘छे छे! तिकडं जायचं नाही आपल्याला!’ आजी गडबडीने म्हणताच […]

Categories
कथा

बाळक्या आणि देव

वार्षिकांक – २०१३

बाळक्या देवाचा निस्सीम भक्त होता. जसा देवावर त्याचा प्रचंड विश्वास होता तसा स्वत:वर आणि स्वत:च्या कामावरही विश्वास होता. सरळ मनाचा….. भोळा…. भाबडा बाळक्या कामाची सुरवात करताना रोज देवासमोर दोन फुलं ठेवायचा. देवाला प्रदक्षिणा घालायचा. सगळ्या जगाची चिंता आपल्यालाच असल्यासारखा जगाची गार्‍हाणी त्याच्यासमोर मांडायचा. त्याला खात्री होती, कधी ना कधी त्याचे डोळे उघडतील…. त्याची कृपा होईल […]

Categories
कथा

न्याय – निवाडा

वार्षिकांक – २०१३

वारूशी लग्न करायला इंदरने नकार दिला तशी वारू म्हणाली, ‘मी तुझ्या पोराची आई होणार आहे, आणि तू नाही करणार म्हणतोस? अशा अवस्थेत मी काय करणार? ‘काय करायचं तो तुझा प्रश्न आहे… तुझं तू बघ….’ म्हणून इंदरने हात झटकले. ही गोष्ट सगळ्यांना समजली. छोट्याशा गावात गावभर पसरली. आता काय करायचे….? वारू घाबरली. आई-वडील काळजीत पडले. आता […]

Categories
कथा

प्रोफेसर शंकू आणि आदिमानव

वार्षिकांक – २०१३

प्रख्यात दिग्दर्शक सत्यजीत राय हे बंगालीतील लोकप्रिय लेखकही होते. कथा, कादंबर्‍या, लेखसंग्रह अशी त्यांनी पन्नासपेक्षाही अधिक पुस्तके बंगालीत लिहिली आहेत. शास्त्रज्ञ, प्रोफेसर शंकू हे त्यांनी निर्माण केलेले बंगाली साहित्यातील एक प्रसिद्ध पात्र आहे. प्रोफेसर शंकू यांच्या दैनंदिनीच्या स्वरूपात श्री.राय यांनी एकूण 38 दीर्घकथा लिहिल्या आहेत. या कथांना फक्त विज्ञानकथा म्हणणे पुरेसे होणार नाही, कारण त्यांच्यामध्ये […]

Categories
कथा

भुर्दंड

वार्षिकांक – २०१२

            थंडीचे दिवस असल्यामुळे देवळाच्या पाठीमागं शेकोटी पेटवून आम्ही सगळे बहिरल्या वाड्यातली आणि माळीवाड्यातली पोरं तापत बसलो होतो. जिकडं तिकडं वातावरण गारठून गेलं होतं. अंगावर भाळ टाकून, तोंडानं वाफंची धुराडे सोडत, खाकरत-खोकरत तरणी, म्हातारी तांब्या घेऊन रस्त्यानं येत होती.             गडी माणसं मस्ट्यांकड तर बाया पोरी मांगवाड्यापल्याड पांदीला जात होती. रतन महाराज देवळाची झाडलोट करण्यात […]

Categories
कथा

मिळून सार्‍याजणी

वार्षिकांक – २०१२

            ‘काय? हा फलक म्हणजे आपला अपमान आहे!’ उषा गरजली. ‘फक्त आपलाच नाही, तर सर्वच स्त्री जातीचा हा घोर अपमान आहे.’ इंदिराने संताप व्यक्त केला.             9 मैत्रिणींचे हसरे व टवटवीत चेहरे, तो फलक वाचून गंभीर बनले. हसण्या, खिदळण्याची जागा संतापाने घेतली. प्रसंग बिकट बनत चालला होता. नऊपैकी आठ मैत्रिणी अंतर्मुख होऊन अपमानकारक फलकाबद्दल विचार […]

Categories
कथा

भुताचा मळा

वार्षिकांक – २०११

            एका डोंगराच्या पायथ्याशी ऐन माळावर वाकडीतिकडी बाभळींची आणि लिंबांची झाडं उभी होती. त्या झाडांच्या गर्दीत सेवरवाडी एखाद्या वनवाशासारखी दिसत होती.             सेवरवाडीपासून दीड मैलावर बंडू सेवर्‍याचा मळा होता. अगदी गर्द झाडीच्या सावलीत तो मळा गजबजला होता. भरपूर पाणी असलेली विहीर, तिथं नारळीची दोन उंच झाडं अंगात आल्यासारखी आभाळात डोलत होती. त्या मळ्यात पिकाला भलताच […]

Categories
कथा

भुताटकी

वार्षिकांक – २०११

श्री. गो. ना. दातार (1876 ते 1941) यांनी लिहिलेल्या व 1930 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘चतुर माधवराव’ या पुस्तकातील ‘भुताटकी’ ही कथा अंनिसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने वाचावी असे मला वाटते. 1930 मध्ये या लेखकाला इतकी आधुनिक दृष्टी होती, हे विशेष – भारत सासणे, जिल्हाधिकारी बीड             माधवरावांच्या चाणाक्षपणाच्या गोष्टी माझ्यामार्फत कित्येक पुस्तकांतून प्रसिद्ध होऊ लागल्या आणि त्यांचा […]

Categories
कथा

देव घावला! देव पावला!

वार्षिकांक – २०११

            कोंबड्यानं दिलेल्या धारदार बांगेनं यल्लाप्पा खडबडून जागा झाला. लगबगीनं उठून त्यानं आजूबाजूला पाहिलं. अगदी फटफटीत होत आलं होतं. बरीच वर आलेली शुक्राची चांदणी निस्तेज होत चालली होती. मावळतीला झुकलेलं बाजलं पार उलंपालटं झालं होतं. यल्लाप्पानं ते पाहिलं आणि तो स्वगतच बोलला, “आराराऽ पार उजाडलं की!”             अंगावर चादरीची भाळ मारून, तो घरात गेला आणि  […]

Categories
कथा

आदर्श गाव….

वार्षिकांक – २०११

            डुंगाईच्या डोंगरातल्या बामनाच्या शेताच्या कडेवर असलेल्या देवीच्या मांडावर बसून परश्या बोललं, ते शाळा बुडवून शेळ्यांच्या मागं गेलेल्या चोथ्याच्या राम्यानं ऐकून गावभर केलं आणि गावानं पंचक्रोशित पोचवलं. मग घरात-घरात, चौकात, पाणोठ्यावर सगळ्यांचा चर्चेचा एकच विषय. ‘अड्याळच्या देवीला म्हनं गावात यायचे वेध लागलेत.’ म्हणजे त्याचं असं झालं, अड्याळ गाव हे सगळ्या गावच्या गावासारखंच एक गावढं गाव. […]