Categories
कथा बालविभाग

ग्रेट गडबडगुंडीची गोष्ट

वार्षिकांक - २०१५

एक होती खारकुंडी. तिचं नाव गडबडगुंडी. मैत्रिणी मात्र तिला ‘गुंडी’ म्हणत. बोलक्या, बडबड्या, धडपड्या गुंडीला खूप मित्रमैत्रिणी होत्या. फुगडीबाय, गोंडसगुड्डी, घाबरगुंडी, सिकसिक कितीतरी खारी कापोलीच्या त्या रानात राहायच्या. प्राण्यांच्या शाळेत जायच्या. मधल्या सुट्टीत भुईमुगाच्या शेंगा सगळ्या खारींना वाटल्या जायच्या. गडबडगुंडी फारच धीट होती. तिला भीती हा शब्दच जणू माहीत नव्हता. शहरातली मुलं कापोलीचं कोकणरान बघायला […]

Categories
कथा

मासिक अडचण

वार्षिकांक - २०१५

शाळेची दुपारच्या जेवणाची सुट्टी झाली आणि मुले पाण्याच्या बाटल्या घेऊन वर्गातून बाहेर पडली. दुपारी सव्वा वाजायला आला की, मुलांचं लक्ष सारखे भिंतीवरच्या घड्याळाकडे जात असतं. सकाळी साडेनऊपासून शाळेत आलेल्या मुलांच्या पोटात कावळे ओरडत असतात. माझ्या वर्गातील मुलेही बाहेर पडली. सर्व मुले हात धुऊन रांगेने जेवण खोलीकडे निघाली. रांगेत असली तरी मुलांचा गलका जोरदारच चालतो रोज! […]

Categories
कथा

भारलेले कडे

वार्षिकांक - २०१५

मूळ राजस्थानच्या उदयपूरजवळ डुंगला या खेड्यातील रहिवाशी नंदलाल रावत हे गृहस्थ सुमारे 20 वर्षांपूर्वी उद्योग शोधत कळवण, जि.नाशिक येथे आले. येथेच त्यांनी भाड्याने एक टपरी घेऊन मिठाईचा व्यवसाय सुरू केले. आज स्वत:च्या मालकीच्या गाळ्यात मिठाईचे दुकान कळवणमध्ये प्रसिद्ध आहे. त्यांची मुलगी अनिता ही आमच्या विद्यालयात इ.10 वीच्या वर्गात शिकत आहे. त्या वर्गावर इंग्रजी विषयाची तासिका […]

Categories
कथा

विषफूल

वार्षिकांक – २०१४

‘त्या बाजूला जाऊ नका बाबू!’ जगन्मयबाबू दचकलेच, आसपास कुणी आहे याची त्यांना जाणीवच झाली नव्हती, त्यामुळेच ते दचकले. आता त्यांना दिसलं की, त्यांच्या उजवीकडे वीसेक हात अंतरावर एक तेरा-चौदा वर्षे वयाचा मुलगा उभा आहे, त्याने निळ्या रंगाची हाफपँट घातली आहे, आणि अंगावर एक हिरव्या रंगाची हुलई ओढून घेतली आहे. त्याचा वर्ण काळा होता. केसांचा भांग […]

Categories
कथा

प्रेस पत्रकारिता

वार्षिकांक – २०१४

एक गाव होतं. गावात हवेली होती. सुनसान आणि एकटी. हवेली गावाच्या टोकास होती. त्यात कधीतरी जमीनदाराचं कुटुंब रहात होतं. जमीनदार मरून गेला. त्याची मुलं हवेली विकायच्या गोष्टी करत. भावाभावात वाटणीवरून झालेला वाद कोर्टात पोहोचला आणि मग हवेलीकडे कुणी फिरकेनासं झालं. म्हातारा चौकीदार कोपर्‍यात पडून राहायचा. गावातील तरूण मुलं आयुष्यातील पहिल्या चुंबनाचा अनुभव त्या हवेलीत घेत. […]

Categories
कथा

मासिक भविष्य

वार्षिकांक – २०१४

मासिक ‘प्रगती’च्या कचेरीत दाबके लगबगीनं प्रवेशले. आल्या आल्या त्यांनी समोरचाच एक भला मोठा कागद उचलला आणि त्यानं आपल्या टकलावरचा घाम खसाखसा पुसला. मग दुसर्‍या एका अशाच कागदानं चेहरा पुसला. घाम पुसण्यासाठी प्रेसमधला कागद या पद्धतीनं दाबके गेली कित्येक वर्षं वापरत होते. त्यामुळं खिशातल्या रूमालाचं आयुष्य वाढतं, असा त्यांचा सिद्धांत होता. धनकवडीहून लुना ताबडत भर उन्हातान्हात […]

Categories
कथा बालविभाग

राशिभविष्याची ऐशीतैशी!

वार्षिकांक – २०१४

प्रतीकला त्याच्या आईनं आज सकाळी सहा वाजताच उठवलं. एरवी आईनं तीनतीन वेळा हाका मारल्या की मग कुठं तो अंथरुणातून बाहेर पडायचा. पण आज मात्र आईनं एक हाक मारताच तो टुणकन उठून बसला. आज त्याच्या वर्गाची रायगडला सहल होती ना! आठ वाजता सगळ्यांना शाळेच्या मैदानावर जमायचं होतं. “सगळ्यांनी वेळेवर आपापले जेवणाचे डबे घेऊन हजर व्हायचंय. पाच […]

Categories
कथा बालविभाग

हाईना का बैना…

वार्षिकांक – २०१४

छोट्या दोस्तांनो, तुम्हाला ‘मुनिया’ जातीचे पक्षी माहीत आहेत का? रंगीत चिमण्याच म्हणा ना! चॉकलेटी, लाल अशा निरनिराळ्या रंगांच्या मुनिया असतात. पूर्वी त्या पिंजर्‍यात पाळल्या जायच्या. आता त्यावर बंदी आहे. कुठलाही स्वदेशी पक्षी, अगदी पोपटसुद्धा पिंजर्‍यात ‘जन्मठेप’ देऊन ठेवता येत नाही. तर अशीच एक रंगीत मुनिया होती. तिचं नाव होतं मुनू. एका ज्योतिषीबुवाने तिला पिंजर्‍यात ठेवलेलं […]

Categories
कथा

अलमा

वार्षिकांक – २०१३

आभाळ सावळं होतं. सूर्य दूर डोंगराआड लुप्त होता. आणि बर्‍याच छोट्या छोट्या पक्ष्यांचा भलाथोरला थवा आभाळभर बेसुमार उधळत होता. त्यांचं एका लयीत उलट्यासुलट्या गिरक्या घेणं चालू होतं. पाऊस पडण्याची अपेक्षा असलेला एखादा शेतकरी जसा आभाळाकडं आसुसल्या तोंडानं पाहत राहतो, तसा दावल खडकावर बसून त्या पक्ष्यांच्या गिरक्यांकडं पाहत होता. आता लाळ टपकेल अशा रीतीनं उघडं पडलेलं […]

Categories
कथा

बाबूरावांची कथा

वार्षिकांक – २०१३

बाबूराव मंत्रालयात नोकरी करतात, मुंबई येथे. बाबूराव हे त्यांचं खरं नाव नाही. पण आपल्या सोयीसाठी आपण त्यांना बाबूराव म्हणू. त्यांनी सांगितलेली ही हकीकत. सात-आठ महिन्यानंतरच त्यांच्या लग्नाचा सारीपाट उधळला गेला. आता दहा-बारा वर्षे झाली आहेत. अद्याप रितसर घटस्फोट नाही. कोर्ट-कचेर्‍या करायच्या नाहीत असं ठरवलेलं. तिला दुसर्‍याशी लग्न करायचं होतं. तिला हे लग्न मान्यच नव्हतं. तिला […]