गणेशजन्माच्या पुराणकथेला प्लास्टिक सर्जरीची जोड देणारे मा. पंतप्रधान ते माझ्या बागेतल्या आंब्यांमुळे संततीप्राप्ती होते, असा दावा करणारे श्री. भिडे गुरुजींचे मित्र, व्हाया सत्यपालसिंह (आमच्या पूर्वजांनी माकडाचा माणूस झाल्याचे पाहिले नाही; सबब डार्विन झूठ), बिप्लब देब (संजयाची दिव्यदृष्टी म्हणजेच इंटरनेट) आणि दिनेशसिंह (सीतेचा जन्म हा तर टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग) असा हा मोठा रंजक प्रवास आहे. […]
कॅटेगरी: छद्मविज्ञान
फोबिया : सेलफोन आणि पॉवर लाईनचा
अमेरिकेतील दक्षिणेकडील टेक्सास राज्य. ऑस्टीन ही राज्याची राजधानी. तेथे माझ्या कन्येकडे सपत्नीक गेलोय. प्रशस्त अशा घराच्या बॅकयार्डमध्ये झोपाळ्यावर विचार करीत बसलोय. स्वत: फसणं आणि दुसर्याला फसवणं हा माणसाचा स्वभावधर्म आहे. जगाच्या पाठीवर सर्वत्र तो दृष्टीस पडतो. प्रकाशाच्या वाटा दाखविणारे ज्ञानवंत मानवास शहाणपणाकडे घेऊन जातात; उलट अज्ञानाच्या गुहेकडे नेऊन त्यांच्या मूर्खपणाचा फायदा उपटणारेही कमी नसतात. विज्ञानाच्या […]
छद्मविज्ञान ओळखायचं कसं?
प्रसारमाध्यमे, आपले तथाकथित हितचिंतक आणि अन्य घटकांद्वारे आपल्या समस्या सोडविण्याचा जणू काही मक्ता घेतलेली मंडळी आपल्याला छद्मविज्ञानाच्या वाटाकडे आकर्षित करतात. आपले व्यक्तिगत आणि सामाजिक नुकसान टाळण्यासाठी फसव्या विज्ञानापासून सावध राहायलाच हवे. पण समोर थडकलेली माहिती ही खरंखुरं विज्ञान की, छद्मविज्ञान यातील भेद आपणास ओळखता यायला हवा. छद्मविज्ञान बहुधा तीन प्रकारे आपणांसमोर आणलं जातं. आपल्या आरोग्याबाबतचा […]
छद्मविज्ञानाचा पसारा
मराठी भाषेत ‘सोंग’ हा शब्द हुबेहूब नकूल या अर्थाने वापरला जातो. बहुरुपी हा मारुतीचे सोंग हुबेहूब वठवतो; पण तो अस्सल मारुती नसतो. छद्मविज्ञान हे बहुरुप्याप्रमाणे अस्सल विज्ञानाचे सोंग असते. विज्ञान नसताना किंवा विज्ञानाच्या क्रियेचा अगर लक्षणांचा अभाव असताना त्याचा आभास निर्माण करणे म्हणजे छद्मविज्ञान. बहुरुपी घेत असलेले सोंग हे आपली करमणूक करते; पण छद्मविज्ञान करमणुकीसाठी […]
फलज्योतिषाचे फसवे समर्थन
फलज्योतिषाने धर्म, अध्यात्म, प्रारब्ध, संचित यांचा आधार घेऊन बराच काळ जनमानसावर अधिराज्य गाजवले. अलिकडच्या काळात विज्ञानाचा प्रभाव वाढल्यावर अनेक अंधश्रद्धांना वैज्ञानिक संदर्भ देण्याचे फॅड वाढले. फलज्योतिषानेही तो मार्ग चोखाळला. आपले शास्त्र कसे विज्ञानाधिष्ठित आहे, हे पटवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न बर्याच फलज्योतिषांनी केला. धर्म, अध्यात्म्य, विज्ञान यांची साक्ष काढून झाल्यानंतर आता या शास्त्राने भारतीय राज्यघटनेकडे […]
कुंडली-पत्रिका-मुहुर्तवाले मोकाट कसे?
समाजामध्ये असणार्या अंधश्रद्धा, खोट्या कल्पना कोणताही आधार नसणार्या रुढी परंपरा आणि भाकड कथा हे काहींचे जगण्याचे साधन आहे. त्यामुळे समाजाचे परिर्वतन होवूच नये असे त्यांना वाटते; अंधश्रद्धा हीच त्यांची दुकानदारी आहे. समाज भ्रामक कल्पनेतच राहिला पाहिजे. समाजाने कधीही चिकित्सा करू नये, समाज विज्ञाननिष्ठ बनू नये यासाठी त्यांची सातत्याने धडपड सुरू असते. किंबहुना समाजाचे अज्ञान हीच […]