Categories
युवा मानस

ईगो : जनातला आणि मनातला

ऑक्टोबर - २०१९

मानसशास्त्रातील काही संज्ञा आपल्या बोलीभाषेत चांगल्याच रुजल्या आहेत. बोलीभाषेत रुजण्याचे भाग्य ज्या थोड्याबहुत मानसशास्त्रीय संज्ञांना लाभले आहे, त्यात ईगोचा नंबर फार वरचा लागेल. आपल्या दैनंदिन वापरात अनेक वेळा ‘ईगो’ येतो. ‘त्याला जरा ईगोचा प्रॉब्लेम आहे’, ‘अमक्या-तमक्याच ईगो खूप स्ट्राँग आहे’ अशी वाक्ये आपण बोलताना सहजी वापरतो. इथे आपण ‘ईगो’ हा शब्द ‘अहंभाव’ अशा अर्थाने वापरतो. […]

Categories
युवा मानस

मनाची प्रयोगशाळा

जुलै - २०१९

प्रयोगशाळा म्हटले की, आपल्या नजरेसमोर एक विशिष्ट चित्र उभे राहते. पांढरे डगले घातलेले शास्त्रज्ञ, ‘आम्ल’, ‘अल्कली’, ‘लिटमस पेन’, ‘चंचुपात्र’ अशा अनेक गोष्टी नजरेसमोर येतात; पण आपण आज ज्या प्रयोगशाळेविषयी समजून घेणार आहोत ती एक आगळी-वेगळी प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेची लक्षणे म्हणजे ज्या क्षणी आपण जन्म घेतो, त्या क्षणापासून ही प्रयोगशाळा चालू होते आणि शेवटच्या श्वासापर्यंत […]

Categories
युवा मानस

मनाचे खेळ

जून - २०१९

आपले मानसिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी स्वत:कडे अंतर्मुख होऊन पाहण्याची गरज याविषयी आपण मागच्या लेखात पाहिला; पण खरी पंचाईत ही असते की, स्वत:ला अंतर्मुख होऊन तपासायचं म्हणजे काय करायचं, हेच अनेकांच्या लक्षात येत नाही. मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम करताना अशा अनेक व्यक्ती भेटतात की, ज्यांना या क्षणी आपल्याला नक्की काय वाटतं आहे, हे नीट सांगताच येत नाही. ‘काहीतरी […]

Categories
युवा मानस

‘डिप्रेशन’च्या जाळ्यात युवा पिढी

एप्रिल - २०१९

मनाचा फ्लू : ‘स्वाईन फ्लू’च्या साथीमुळे सध्या फ्लूचा आजार सर्वत्र चर्चेमध्ये आहे. फ्लू हा बहुतांश वेळा स्वत:च स्वत: बरा होणारा आजार आहे. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोळ्यांतून पाणी येणे अशी त्याची लक्षणे आपण सर्वांनी अनेक वेळा अनुभवली आहेत. आपल्यातील बहुतांश लोकांना वर्षातून एकदा तरी फ्लू होतो, मग त्या योगाने दोन-तीन दिवसांची सक्तीची विश्रांती मिळते. जे […]

Categories
युवा मानस

चुकली दिशा तरीही हुकले ना श्रेय सारे !

मार्च - २०१९

प्रिय युवा मानसमित्र आणि मैत्रिणींनो, परीक्षांचा मोसम जवळ येऊ लागला आहे. त्यामुळे यावेळी परीक्षा आणि टेन्शन याविषयी जरा संवाद करूया. परीक्षा आणि टेंशन याविषयी मी जेव्हा विचार करायला लागतो, तेव्हा मला माझ्या स्वत:च्या मनोविकारतज्ज्ञ होण्यासाठी दिलेल्या पदव्युत्तर परीक्षेच्या निकालाचा दिवस आठवतो, ज्या परीक्षेमध्ये मी थेट नापासच झालो. अशी माझ्या आयुष्यातील ही पहिलीच परीक्षा होती. स्वाभाविकच […]

Categories
जो.वि.नि युवा मानस

जोडीदाराची विवेकी निवड आणि मानसिक आरोग्य

फेब्रुवारी - २०१९

साधारण दोन वर्षांच्या पूर्वीची गोष्ट आहे. अंनिसच्या एका ज्येेष्ठ कार्यकर्त्यांचा मला फोन आला. त्यांनी मला विचारलेला प्रश्न मला यापूर्वी कुणीच विचारला नव्हता. तो प्रश्न असा होता की, ‘माझ्या मुलीचा पहिला घटस्फोट झालेला आहे आणि त्या सगळ्या प्रक्रियेमधून जाताना आम्हाला खूप मन:स्ताप झाला. आता माझी मुलगी परत लग्न करण्याचा विचार करीत आहे. तर नवरा आणि बायको […]

Categories
युवा मानस

तरुणाईचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी ….

जानेवारी - २०१९

आजच्या धकाधकीच्या व स्पर्धेच्या युगात तरूणांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. तरूणांच्या मानसिक आरोग्यासंबंधी अंनिवातून ‘युवा मन’ हे नवीन सदर आम्ही दरमहा प्रसिद्ध करीत आहोत. आपल्या समाजात मानसिक आरोग्याचे प्रश्न हे कायमच दुर्लक्षित राहिलेले आहेत. जातीच्या उतरंडीची तुलना करायची झाली तर मधुमेह, उच्च रक्तदाब हे तथाकथित उच्चवर्णीय आजार आणि क्षयरोग, मानसिक आजार हे तथाकथित नीचवर्णीय […]

Categories
युवा मानस

अमृता, प्रणय आणि तुम्ही …

ऑक्टोबर - २०१८

प्रिय मित्र–मैत्रिणींनो, मागच्या आठवड्यात प्रणय आणि अमृताची बातमी वाचली आणि मनाचा तळ ढवळला गेला, असे वाटले. तेलंगणातील ही घटना. प्रणयकुमार हा दलित तरुण आणि अमृता वर्शिणी ही उच्च जातीतली, धनाढ्य घरची मुलगी. दोघांचे प्रेम होते आणि अमृताच्या घरच्यांचा लग्नाला विरोध होता. आपल्या धनाढ्य बिल्डर वडिलांच्या धमक्यांना न घाबरता अमृताने प्रणयशी लग्न केले, ही गेल्या जानेवारीतली […]

Categories
युवा मानस

नागपूर येथे युवा परिषद संपन्न

फेब्रुवारी – २०१६

1 नोव्हेंबर हा डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा जयंतीदिन. हे औचित्य साधून दि. 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर अशी राज्यव्यापी युवा संकल्प परिषद नागपूर येथे पार पडली. अंनिस आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर यांनी यांचे संयोजन केले. “नात्यातील सुरेल संवादासाठी जोडीदाराची विवेकी निवड” असे या परिषदेचे सूत्र होते. या परिषदेचे उद्घाटन सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या […]

Categories
युवा मानस

सातारा येथे युवा संवाद शिबीर संपन्न

जून – २०१४

महाराष्ट्र अं.नि.स.च्या युवा विभागामार्फत सातारा येथे युवा कार्यकर्ता संवाद शिबीर घेण्यात आले. दि.13 व 14 मे रोजी ‘तारांगण’, शाहुनगर, सातारा येथे हे शिबीर संपन्न झाले. शिबिराच्या पहिल्या दिवशी अं.नि.स. काय आहे, ती युवकांसाठी कोणते उपक्रम राबवते आणि हे शिबीर घेण्यामागील हेतू काय या गोष्टी एका पत्रकाच्या माध्यमातून स्पष्ट केल्या गेल्या. त्यानंतर उपस्थित युवा कार्यकर्त्यांनी आपल्या […]