Categories
भानामती

गावकर्‍यांची करणी भानामतीची भीती अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली दूर

जून - २०१९

आंधळी (ता. पलूस, जि. सांगली) येथील नाईक मळा याठिकाणी अनुप मोहन माने यांच्या शेतात मातीची काळी बाहुली, हिरवे कापड, बांगड्या व पुजेचे साहित्य जमा करून तेथे बोकड बळी दिला होता. हे सर्व अघोरी साहित्य पाहून परिसरातील लोकांच्या मनामध्ये करणी, भानामतीची भीती निर्माण झाली होती. गेल्या चार दिवसांपासून हे सर्व साहित्य शेतातच पडून होते. याबाबतची तक्रार […]

Categories
भानामती

अज्ञान, अंधश्रध्दा असेल ज्यांचे घरी, भूत, भानामती, करणी हमखास तेथे वास करी

जून - २०१९

शनिवारी, दि. 25 मे 2019 दुपारी 1:45 वा. महा. अंनिस लातूरचे जिल्हा प्रधान सचिव सुधीर भोसले यांचा मला फोन आला. आज भानामतीची केस हाताळण्यासाठी जायचे आहे. तोपर्यंत पिडीत मुलीच्या घरून सुधीरला 25- 30 फोन तातडीने येण्यासाठी आले होते. सर्व कामे आटोपून सुधीर भोसले, त्यांच्या पत्नी अनिता भोसले व मी (बाबा हलकुडे) त्या गावात पोहोचलो. घर […]

Categories
भानामती

कपडे जाळणारी भानामती अंनिसने थांबविली

जून - २०१९

जालना जिल्ह्यातील नेर शेवगाजवळील एक छोटेसे गाव. या गावात एका कुटुंब भानामतीच्या घटनाने हैराण झाले होते. नेरचे अंनिस कार्यकर्ते बाळासाहेब गायके यांचा मला फोन आला. त्यांनी माहिती देऊन भगवान भानुसे यांचा संपर्क करून दिला. त्यांनी विक्रम राठोड यांचा अर्ज लिहून घेऊन संपर्क करून दिला व झालेली घटना कथन केली. जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर गायकवाड यांच्याशी चर्चा […]

Categories
भानामती

अंगावर गोटे पडणारी भानामती अंनिसच्या प्रबोधनाने पडली बंद

एप्रिल - २०१९

वर्धा येथे शिक्षण घेण्यासाठी महादेव तोटे (नाव बदलले संपूर्ण कुटुंबाचे) यांची लहान मुलगी वर्ग 6 मध्ये शिकत असलेली, छोटा मुलगा जो बालवाडीत शिकतो व भावाची मुलगी जी बी.एस्सी.च्या प्रथम वर्षाला; गेल्या दोन वर्षांपासून वर्ध्यात वास्तव्याला आहे. अचानक सहा महिने आधी वर्ग 6 मध्ये शिकत असलेल्या मुलीच्या अंगावर गोटे पडण्याचे प्रकार घडू लागले, तर कधी-कधी घरावर […]

Categories
भानामती

नांदेड येथे शाळेमध्ये आग लागणारी भानामती अंनिसने केली बंद

एप्रिल - २०१९

नांदेड जिल्ह्यातील देगलूर या तालुक्याच्या ठिकाणी सुरेश जाधव यांची जी प्लस टू (G + 2) बंगला टाईप बिल्डिंग आहे. बिल्डिंगमध्ये त्यांची स्वत:ची अक्षरधाम नावाची शाळा आहे. शाळेत जवळपास 150 विद्यार्थी संख्या आहे. तळमजल्यावर व पहिल्या मजल्यावर शाळेचे वर्ग आहेत. तसेच पहिल्या व तळमजल्यावर त्यांचे जवळचे नातेवाईक सहकुटुंब राहतात. तळमजल्यावर एक जोडपं व त्यांचा 23 वर्षीय […]

Categories
भानामती

भानामती म्हणजे ‘मन्चाऊसन सिन्ड्रोम हा मानसिक आजार

मार्च - २०१९

मन्चाऊसन सिन्ड्रोम हा एक मानसिक विकार असून, या आजाराने ग्रस्त व्यक्ती स्वत:ला शारीरिक अथवा मानसिक आजाराची लक्षणे असल्याचा आभास तयार करून असे वागतात की, जेणेकरून त्यांना गंभीर स्वरुपाचा आजार असल्याचा इतरांचा समज व्हावा; मात्र प्रत्यक्षात ही लक्षणे किंवा परिस्थिती त्यांनी स्वत: कृत्रिमरित्या तयार केलेली असते. या विकाराचे नाव 18 व्या शतकातील जर्मन अधिकारी बेरोन वॉ […]

Categories
भानामती

शेतातल्या पिकांना लागली पनवती, गोठ्यातल्या जीवांवर उठली भानामती!

मे - २०१८

ज्ञान हा माणसाचा विशेष आहे. तर्कबुद्धीचा विकास त्याच आधारे होतो. त्या विकासातून विवेक आणि विवेकातून प्रगती आकार घेत असते, हे जरी पूर्णत: खरे असले, तरी ज्ञान मिळविलेले असो की नसो; आपला समाज अजून कुठेकुठे मागासलेलाच आहे. याची प्रचिती 28 मार्च 2018 रोजी महाराष्ट्र अंनिस सांगली शाखेच्या टीमला आली. ‘अंनिस तारांगण’ चालविणारे एक खंदे कार्यकर्ते भास्कर […]

Categories
भानामती

अल्पवयीन मुलीस शेण खाऊ घालणार्‍या बाबावर गुन्हा दाखल

जुलै - २०१७

धनगरवाडी, ता. चाकूर येथील एक महिला व एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस करणी, भानामती होते, त्यांना ज्यांनी करणी, भानामती केली त्यांची नावे भोंदू बाबाकडून जाहीर करवून घेण्यासाठी त्यांना भोंदू बाबाकडे नेऊन पीडितांचे केस, हात-पाय, नाक दाबून गावातील दोन महिला व एक पुरुषाचे नाव वदवून घेऊन शेण खातो का? शेण खाल्लास तरच सोडतो नाही, तर नाही […]

Categories
भानामती संपादकीय

लताची नाजूक भानामती : काही प्रश्न

जून – २०१३

चेटूक-करणी-भानामतीची प्रकरणे महाराष्ट्रात सर्वत्र आढळून येतात. मराठवाड्यात भानामतीचे मोठे प्रस्थ आहे. भानामती ही अंधश्रद्धा आहे. तिच्या प्रभावाने कुटुंबातील लोक भयभीत होतात, हवालदिल होतात. अघोरी शक्तीमुळे भानामती घडते या चुकीच्या समजुतीपायी तंत्र-मंत्राचे उपचार लोक घेतात व कुटुंबाचे मानसिक व आर्थिक नुकसान करून घेतात. प्रसिद्ध जागतिक विवेकवादी डॉ.अब्राहम कोवूर यांनी ‘भानामती’ प्रकरणे मनोवैज्ञानिक पद्धतीने व विज्ञानदृष्टीकोनाच्या आधारे […]

Categories
भानामती

अंगावर गोटे उठणारी भानामती!

जून – २०१३

            रात्रभर प्रवास करून पहाटे पहाटेच मुंबईहून आलो होतो. एक छोटीशी डुलकी घेऊन आळसावत लोळत पडलो होतो. तेवढ्यात अरूणाने चहा पिण्यासाठी हाक मारली. गरमागरम चहाच्या ओढीने पटकन उठलो अन् तोंड धुतले व चहा पिता पिता जादूटोणाविरोधी कायदा या अधिवेशनातही विधीमंडळात न मांडल्याने सरकारच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ संघटनेने केलेल्या कालच्या मुंबईतील जेलभरो आंदोलनाचा वृत्तांत अरूणाला सांगू लागलो. […]