बुधवार, दिनांक 12 जुलै 2018 रोजी रात्री 12 नंतर शिर्डी येथे द्वारकामाईच्या भिंतीवर साईबाबांची छबी दिसून आल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर तिथे साईभक्तांची गर्दी झाली. सोशल मीडियावर सर्वत्र चमत्काराच्या नावाने प्रसिद्धी मिळाली. याही आधी शिर्डीत व भारतातील इतर ठिकाणीही, कॅनडासारख्या प्रगतशील देशात अशा प्रतिमा दिसल्याचा दावा आहे. त्याचे फोटो व्हिडीओ उपलब्ध आहेत. असे प्रकार घडले […]
कॅटेगरी: अफवा
अफवांनी निर्माण केले अंधश्रध्देचे देऊळ
सोमवार, दिनांक 16 एप्रिल सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बीड जिल्ह्यातील परळी जवळील कन्हेरवाडीच्या शिवारात परळी-अंबाजोगाई रस्त्याचे काम चालू असताना मुरुम खोदकामाच्या ठिकाणी कथित ‘कुबेर देवते’ची नागराजाने फणा काढून वेटोळे घातल्याची मूर्ती सापडल्याची अफवा ‘फोर-जी’ च्या गतीने काही मिनिटांतच महाराष्ट्रभर पसरली. तसेच काही प्रसारमाध्यमांनीही ‘चमत्कार-चमत्कार’चा जप केल्याने एका दिवसातच त्या ठिकाणी अंधश्रध्देचं देऊळं उदयाला आलं. खरं […]
जगाच्या पाठीवर सर्वत्र मृतात्म्यांच्या अस्तित्वाला विविध धर्मात मान्यता आहे. हे आत्मे विविध रूपात भटकत असतात असा समज आहे. विज्ञानात आत्म्याचे अस्तित्व सिद्ध झालेले नाही. तरीही एका मानसिक गरजेपोटी माणूस आपल्या प्रिय व्यक्तीच्या वियोगाला सहन करीत नाही व त्याला आपल्या प्रिय व्यक्तीच्या तथाकथित आत्म्याशी संवाद साधण्याची अनिवार ओढ लागलेली असते. या मानसिकतेचा फायदा घेऊन नसलेल्या […]
घाबरु नका! जगाचा अंत यावर्षी नाही!
घाबरु नका! घाबरु नका! जगाचा अंत यावर्षी नाही! दै. सकाळमधील ही बातमी व त्या अनुशंगाने 3 जानेवारी 2012 रोजी आलेला अग्रलेख ‘बिनधास्त जगा लेको!’ वाचून काही जणांना हायसं वाटणं स्वाभाविकच आहे. वर्तनमानपत्रानं अतिरंजितता सोडून वस्तुस्थितीदर्शक चांगली बातमी दिली त्याबद्दल ‘सकाळ’ वृत्तपत्राचे मन:पूर्वक अभिनंदन. सदरची बातमी ‘माया कॅलेंडरनुसार जगाचा विनाश डिसेंबर 2012 रोजी होणार’ या […]
महाराष्ट्र अंनिस गेली अनेक वर्षे जादूटोणा विरोधी कायदा करण्यासाठी आग्रह करत आहे. शासनाने या बाबत स्पष्ट लेखी आश्वासन दिले आहे. सध्याच्या मंत्रीमंडळाने मंत्री मंडळाच्या बैठकीत हा कायदा पारितही केला. पावसाळी अधिवेशनात तो विधानसभेत मांडण्यातही आला. नागपूरच्या अधिवेशनात तो चर्चेला येवून कायदा संमत होण्याच्या दृष्टीने पाऊल आणखी पुढे सरकरण्याची शक्यता लक्षात घेता समितीने एक भूमिका घेतली. […]